Sunday, 20 December 2009

रॉकेट सिंग - सेल्समन ऑफ़ द ईयर (२००९)

रॉकेट सिंग - सेल्समन ऑफ़ द ईयर (२००९)
दिग्दर्शक - शिमीत अमीन.
शिमीत अमीन, जयदीप सहानी, यश राज बॅनर, आणि रणबीर कपुर...अजुन काय हवं.
अपेक्षेने गेलो होतो. पण काही अंशी निराशा हाती पडली.
हरप्रीत सिंग (रणबीर कपुर) काठा-काठावर पास होत कॉमर्स डिग्री पास करतो, आणि सेल्समनशिप करिअर म्हणुन निवडतो.
कम्प्युटर विकणार्या कंपनी मध्ये ट्रेनी सेल्समन म्हणुन रुजु होतो. अतिशय सरळमार्गी असल्यामुळे कोर्पोरेट जगातल्या राजकारणात हरप्रीत गोंधळु लागतो.
टार्गेट्स, लाचखोरी पाहुन त्याविरुद्ध आवाज उठावतो, पण त्यात स्वत:च फ़सतो, बॉस, स्टाफ़चा राग ओढवुन घेतो. मग मात्र त्यातुन मार्ग काढत ओफ़िसमधील काही गुणी लोकांना हाताशी धरुन स्वत:चा बिजनेस सेट करतो.
कथा सरळ साधी असली तरी ट्रीटमेंट मस्त आहे. सेल्स ओफ़िस, सेल्समन, बॉसेस, क्लायंट्स अतिशय व्यवस्थीत रंगवले आहेत.
सेल्स हेड सोबत केलेली पहिली क्लायंट भेट, बॉस सोबत केलेले इनडायरेक्ट संभाषण, असेम्ब्लर (डी. संतोष) सोबतचे सर्व सीन खुप छान आहेत.
इतक्या वेळ फ़ॉर्मात असणारा सिनेमा गोड होण्याच्या नादात शेवटी काहीसा प्रेडिक्टेबल होतो. काही अनाकलनीय सोपे मार्ग शोधल्या जातात आणि सुफ़ळ होतो.
इतक्या मोठ्या कंपनीचा मालक खुपच लवकर हार मानतो बुवा, त्यात काहीही जास्त कष्ट न घेता.
असो, बाकी अभिनयाच्या बाबतीत मात्र रणबीर केवळ अप्रतिम. अजुन काय सांगु, तुम्हीच अनुभवा. डी. संतोष, नवीन कौशीक, गौहर खान मस्त साथ देतात.
रोमॅन्स साईडलाईन्ड आहे, शाझान पद्मश्रीला जास्त काही वाव नहिये. आणि सुखद धक्का म्हणजे फ़ालतु गाण्यात वगैरे वेळ नाही घालवलाय. सर्वांना आवडेल का नाही, शंकाच आहे.
पण मला बर्याच प्रमाणात आवडला, शेवटचे १५-२० मिनीटे सोडुन....

अभिनेत्यांची नावं - रेडिफ़.कॉम साभार.

Saturday, 19 December 2009

वेक अप सिड (२००९)

वेक अप सिड (२००९)
दिग्दर्शक - अयान मुखर्जी.
वेक अप सिड, गोष्ट आहे, सिडची.  सिड श्रीमंत बापाचा (वाया गेलेला) मुलगा, ज्याला आयुष्याची फ़िकर नसते.
मित्रांसोबत पार्ट्या, मजा करण्यात मग्न.  अभ्यासाचा कंटाळा, नेहेमी काठावर पास होणे वगैरे (छंद?)
वडिलांच्या कामात मदत न करता केवळ स्वच्छंदी आयुष्य जगत असतो.  एमबीए मध्ये नापास झाल्यानंतर, मित्र आणि वडिलांपासुन तो दुरावतो, रागात घर सोडतो व मुंबईला स्वत:च्या पायावर उभ्या रहायला आलेल्या आयेशा( कोंकणा सेन शर्मा) कडे जाउन राहतो.
आयेशा आणि सिड मध्ये एकाही गोष्टीचे साम्य नसते.  आयेशा स्वत:बद्द्ल आत्मविश्वास असणारी व गोल निश्चीत असणारी असते, असे असतानाही त्यांची केमिस्ट्री जमते आणि ते एकमेकात गुंतत जातात.
एकमेकांना समजुन उमजुन घेताना, घट्ट मानसिक आधार देतात, व सक्सेसफ़ुल होतात.  अयान मुखर्जीचे दिग्दर्शन पहिल्या प्रयत्नातच खुप उजवं आहे.  कलाकारांकडुन हवं ते काम करवुन घेण्यात तो यशस्वी होतो.
कोंकणा सेन शर्माचा वावर सहज आहे, दु:खि, हसरे, प्रेमळ, हळवे सारे सारे एक्सप्रेशन्स आरामात देते.  कमाल करतो तो रणबीर,  अफ़लातुन ऍक्टींग, अतीशय सहज वावर, दिसण्यापासुन ते मानसिकतेत तो सिडच्या भुमिकेत लिलया शिरतो. 
रणबीर, मानलं बुवा तुला. 
सावरीया सोडुन झाडुन सर्व सिनेमे पाहिले, झकास अभिनय करतो पठ्ठा.
उद्या ’रॉकेट सिंग’ बुक केलायं....

एनग्लोरीयस बास्टर्ड्स (२००९)

एनग्लोरीयस बास्टर्ड्स (२००९)
’क्वेंटीन टॅरंटीनो’ दिग्दर्शीत ’एनग्लोरीयस बास्टर्ड्स’ चा अनुभव एकदा घ्यायलाच हवा.
टॅरंटीनो स्टाईलचा हा सिनेमा, ’किल बिल’ प्रमाणे चॅप्टर बाय चॅप्टर उलगडतो.  परत, कथा एकदम छोटीशी, ’ज्युं’ची एक छोटी सैनिक तुकडी (बास्टर्ड्स) नाझी विरुद्ध लढते, मारते.
पण ट्रीटमेंट पाहण्यासारखी आहे.  बरेचसे प्रसंग लक्षात राहतात.  अभिनयाच्या बाबतीत Christoph Waltz ने कमाल केली आहे, ब्रॅड पिट त्याच्या ’स्नॅच’ स्टाईल मध्ये बोलतो, त्याला जास्त वाव नाही आहे.  सिनेमाचे नाव जरी बास्टर्ड्स या त्याच्या संघटनेवर असले तरी ती बर्याच वेळा बॅकग्राउंडलाच असते. सिनेमाचा शेवट तर मस्तच.
जरूर बघावा असा.

Thursday, 17 December 2009

’किल बिल’ (2003-2004)

बर्याच दिवसांपासुन ’किल बिल’ सिनेमा बद्दल ऐकुन होतो, पण पाहण्याचा कधी योग आला नाही.
’क्वेंटीन टॅरंटीनो’ दिग्दर्शक असल्यामुळे सिनेमा विशेष असणार याची अपेक्षा होती.
पण पार्ट १ आणि २ म्हणजे केवळ हिंसाचार, एकदम मसाला. 
कथा नॉन-लिनीअर आहे, कथा आहे ब्राइड (उमा थर्मन) ची जिच्या लग्न समारंभात बिल आणि त्याचे साथीदार सर्वांचा खुन करतात,  बिल ब्राइडला डोक्याजवळ गोळी मारतो.
त्यामुळे ती ४ वर्ष कोमा मध्ये जाते, नंतर ती बिल आणि साथीदारांचा कसा बदला घेते तो म्हणजे किल बिल १ आणि २.
जवळपास ४-५ तासांच्या या दोन भागात वेगवेगळ्या प्रकारच्या हाणामारीच्या पद्धती वापरल्या गेल्या आहेत, जसे चाईनीज कुंग-फ़ु, जपानीज समुराई.
अशक्य आणि अतर्क्य, फ़ॅंटसीच्या जवळ जाणार्या घटनांची रेलचेल आहे, पण डोकं नं वापरता पाहीला तर एकदम छान मसाला (हॉलिवूडी) मिळतो.
ब्राइडच्या भुमिकेत उमा थर्मन फ़िट बसली आहे,  बाकी स्टारकास्ट पण समर्पक काम करते.  एकदम स्टाइलाइज्ड लूक आहे.

ऍक्शन चा अतिरेक सहन करु शकत असाल तरच याच्या वाटेला जाणे...

Sunday, 13 December 2009

ब्लड सिंपल (१९८५)


ब्लड सिंपल (१९८५)
दिग्दर्शक - जोएल कोएन, एथन कोएन
सध्या कोएन ब्रदर्स सिरिज पाहत आहे, त्यांचा दिग्दर्शकीय प्रवास सुरु झाला ’ब्लड सिंपल’ पासुन.
टेक्सास मध्ये ह्याचे कथानक घडते, ’मार्टी’ हा एक बार मालक, त्याच्या पत्नि ’ऍबी’चे आणि बार मॅनेजर ’रे’ यांचे अफ़ेअर असल्याची कुणकुण मार्टीला लागते, तो एका खाजगी गुप्तहेर ’लॉरेन’ला हायर करतो. सत्य कळाल्यावर तो लॉरेनला त्या दोघांना मारण्याची सुपारी देतो. लॉरेन त्यांना न मारता, त्यांच्या फ़ोटोमध्ये छेड्छाड करुन (खुनाचा देखावा तयार करुन) मार्टी कडुन पैसे घेतो, मार्टीचा खुन करुन, तिथे ऍबीची पिस्तुल टाकतो, जेनेकरुन खुन तिने केला असा देखावा तयार व्हावा. काही वेळानंतर ’रे’ येतो व मार्टीचा खुन झाला पाहुन आणि ’ऍबी’ ने केला समजुन तो प्रेताची विल्हेवाट लावतो.
लॉरेनला कळते की त्याच्या फ़ोटो मधील एक फ़ोटो नाहिये, आणि त्याचे सिगारेट लायटर सुद्धा बार मध्येच राहाते. तो बार मध्ये येतो, आणि तिथे ’ऍबी’ येते, लॉरेन लपुन बसतो. सेफ़ला असलेले डॅमेज पाहुन ’ऍबी’ला वाटते की हा सेफ़ रे नी तोडायचा प्रयत्न केला. ती घरी परत येते व याच्यामुळे रे आणि ऍबी मध्ये वादावादी होते, रे वर लॉरेन दुरुन हल्ला करतो आणि ऍबी आडोसा घेते, लॉरेन येतो आणि ऍबी त्याला मार्टी समजुन त्याचा खुन करते.

हिंसक वातावरणात जास्त वेळ वावरल्याने जी भित्री मानसीक अवस्था बनते त्याला ब्लड सिंपल म्हणतात. (विकीपीडीया http://en.wikipedia.org/wiki/Blood_Simple)

सिनेमाची पटकथा अत्यंत व्यवस्थीत विणली आहे, ताण कायम राहतो. समज, गैरसमज यातुन पात्र घडवले जातात, चित्रपट मात्र खिळवुन ठेवतो.
मला ७०-८० च्या दशकातला लूक खूप आवडतो. रिकमेंडेड.

Saturday, 28 November 2009

One Flew Over the Cuckoo's Nest (1975)


बर्याच मित्रांनी सजेष्ट केल्या मुळे ’वन फ़्ल्यु ओवर द कुक्कूज नेस्ट’ पाहिला.
सिनेमा छान आहेच, त्याबद्दल काही वादचं नाही. जॅक निकोल्सनचा, नर्स रचेल वठवलेल्या अभिनेत्रीचा अभिनय उत्तम.
सर्व सहकलाकाराचे अभिनय सुद्धा वाखानन्याजोगे.
'क्यों की' हा प्रियदर्शनचा हिंदी सिनेमा ह्याच्यावरून ढापला होता...

Saturday, 21 November 2009

Orphan (2009)


ऑर्फ़न - बर्यापैकी थ्रिलर
सिनेमाची रचना जरी हॉरर पटाची असली तरी हा एक थ्रीलर आहे. चांगला आहे. सर्व कलाकारांचे काम छान झाले आहे.

2012 (2009)


२०१२ - जगप्रसिध्द जगबुडीच्या तथाकथित भाकितावर आधारीत असणारा ’रोनाल्ड एमरीच’ दिग्दर्शित ’२०१२’ हा चित्रपट अस्सल हॉलिवूड मसाला आहे.

चित्रपट अतिशय सर्वसाधारण आहे. पठकथा अतिशय ठिसुळ आहे. कॉम्प्युटर ग्राफ़िक्स वगळता कशातही विशेष दम नहिये. काही द्रुश्ये मात्र अप्रतीम जमली आहेत. भारतीय शास्त्रज्ञ असलेला कलाकाराची हिन्दी ऐकुन हसू येते...

टायटॅनिक, द डे आफ़्टर टुमारो वगैरे पाहिले असतील तर यात वेगळे काही सापडणार नाही.

सिनेमॅक्स

Monday, 16 November 2009

"टिंग्या" (2008)


बहुचर्चित 'टिंग्या' पाहिला, अतिशय आवडला. विषय तर उत्तम आहेच वर सर्व कलाकारांनी उत्तम काम केले आहे. विशेष म्हणजे बाल कलाकार टिंग्या(शरद गोयेकर) यांनी अतिशय प्रामाणिकपणे ही भूमिका साकारली आहे. (अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे). असे कितीतरी सीन आहेत कि ज्यामध्ये डोळ्यात पाणी येते. त्यातही टिपिकल भडक पार्श्वसंगीत नसने ही जमेची बाजू . तांत्रिक बाजू थोड्या कमजोर वाटल्या पण एकूण परिणाम सुंदर आहे. सीन बदलला कि लगेच पार्श्वसंगीत थांबणे, किंवा बदलणे, हे बर्याच जागी खटकते. (ही बर्याच वास्तवदर्शी सिनेमात दिसणारी , खटकणारी गोष्ट मला वाटते.) ते एकदम बदलण्या ऐवजी लीलया मिसळल पाहिजे. असो, बहुतेक मला हे नीट सांगता आलं नाही. मंगेश हाडवळे यांच दिग्दर्शन चांगल आहे, त्यांचा पुढील प्रोजेक्ट हे सिद्ध करेलच. सिनेमा पाहताना स्वतःचा कितीदा तरी राग आला, आणि आपण किती कोरडे झाले आहोत याची लाज वाटली. आताही माहित आहे कि हा सिनेमा फक्त एकट्यात मी पाहू शकतो कारण कुणा समोर रडण्यात आपण (मी) कमीपणा मानतो.

आपलासिनेमास्कोप परीक्षण
http://apalacinemascope.blogspot.com/2008/05/blog-post_30.html

अधिकृत दुवा
http://tingya-a-film.blogspot.com/

लोकप्रभा परीक्षण

Wednesday, 11 November 2009

अजब प्रेम की गजब कहानी (२००९)


फार काही अपेक्षेने 'अजब प्रेम की गजब कहानी' पाहायला गेलो नव्हतो, तसा मी विनोदी चित्रपटाचा जास्त चाहता नाही, पण 'राजकुमार संतोषी' चा विनोदी सिनेमा आणि विशेष 'रणबीर कपूर' साठी गेलो... अपेक्षा नसल्यामुळे निराशा काही पदरी नाही पडली.. पण बरेचसे gags हसवून गेले... कतरिना वात आणते...बाकी कुणाला जास्त स्कोप नाही...

एकच गोष्ट पाहण्यासारखी ती म्हणजे 'रणबीर', त्याने अतिशय सुंदर काम केले आहे...विनोदी ते इमोशनल expressions लीलया करतो. जिम कॅरी सारखी अक्टिंग केलेला सिक़्वेन्स तर अतिशय उत्तम... बाकी बिनडोक विनोदाचे सगळे मसाले यात आहेत. गीत संगीत ठीक ठाक, पण चित्रपट पाहताना हास्यात गतिरोध प्रमाणे काम करतो. शेवट परत विनोदी सिनेमाची टिपिकल प्रियदर्शन स्टाईल... आणि एकदम अपेक्षित...नाविन्य काही नाही.. थोडक्यात या कहाणी मध्ये गजब काही शोधू नका....(रणबीर सोडून)

स्थळ - प्रसाद

Saturday, 31 October 2009

अमेली(Amelie) - फ्रेंच
आशयात्मक आणि दृश्यात्मक श्रीमंती असलेला फ्रेंच चित्रपट, अतिशय सुंदर आहे. विशेष म्हणजे सिनेमाची सिनेमॅटोग्राफी. अत्यंत सुंदर अश्या फ्रेम्स.
जरूर पाहावा असा... सध्या युटीवी वर्ल्ड मुवीज वर दाखवला जातो...

लोकप्रभाच्या चित्रदृष्टी या सदरात अमेली चा आढावा
http://www.loksatta.com/lokprabha/20091009/chitradrushti.htm

http://www.imdb.com/title/tt0211915/

http://en.wikipedia.org/wiki/Am%C3%A9lie

Sunday, 18 October 2009

ब्लू (२००९)


काल परभणीच्या 'नरेश' चित्र मंदिर मध्ये पाहिला, बिलो अवरेज सिनेमा आहे....... फक्त underwater फोटोग्राफी चांगली आहे....बाकी दिग्दर्शन सामान्य आहे..... मसाला सिनेमा आहे म्हणजे तर्क तर नाहीतच..... पण ज्या ट्रेजर हंट साठी सिनेमा आहे तो तर अगदीच पाचकळ आहे.....अभिनय सर्वांचा अतिशय सामान्य आहे.

Sunday, 11 October 2009

UP (अप) - २००९


धन्यवाद everybody@ PIXAR.....
अत्यंत सुरेख सिनेमा..... हसता हसता पापण्याच्या कडा ओलावणारा....
मला आवडलेले काही विशेष सिन्स:
कार्ल आणि एली यांचा जीवनपट १० मिनिटात जो घडतो....एकाही डायलॉग विना .... speechless...
उडणारे घर जेव्हा वादळातून जाते...आणि त्यायोगे घरातील महत्वाचे सामान खराब न होवू देण्याची धडपड करताना कार्ल...

animations एकदम परफेक्ट.... एक एक व्यक्तिरेखा उत्तम आहे....

Ratatouille, WALL-E आणि आता अप ..... hats off to PIXAR....

3D मध्ये पहिला नाही याची खंत आहे......let's see when it will be released in 3D @ HYD।

आत्ताच wikipedia मध्ये पिक्सर बद्दल अजून चांगली माहिती मिळाली ....

In addition to the positive critical reviews the film received, Up highlights Pixar's corporate image as an altruistic company through its charitable acts. In June 2009, a 10-year-old girl from Huntington Beach, California was suffering from the final stages of terminal vascular cancer. It is reported her dying wish was to "live to see the movie" despite the advanced stage of her disease. However, due to her deteriorating condition, the girl was unable to leave the family home. As a result, a family friend contacted Pixar and arranged for a private screening. A Pixar employee flew to the Huntington Beach home with various Up tie-in toys and a DVD copy of the film। The child could not open her eyes, so her mother described the film to her scene by scene. The young girl died approximately seven hours after the screening ended.ओरिजनल स्टोरी :
http://www.cbsnews.com/stories/2009/06/19/national/main5098924.shtml

Thursday, 8 October 2009

डाऊन बाय लौ (१९८६)


कालच मोसरबेर डीवीडी वर 'डाऊन बाय लौ' पाहिला... एकदम मस्त सिनेमा आहे.....रोबेर्तो बेनिग्नी ची अफलातून अक्टिंग आहे....त्याची ती फ्रेंच इंग्लिश मजा आणते......'आय स्क्रीम, यु स्क्रीम, वुई आल स्क्रीम फोर आईसस्क्रीम' वाला सीन मस्त आहे.....

Wednesday, 2 September 2009

द एस्केपिस्ट (२००८)

द एस्केपिस्ट - सिनेमाची थोडक्यात कथा अशी की कही कैदी तुरुंगातून कसे पलायन करतात. स्टोरी लिनिअर नाहीये, एक सीन पलायानाची तयारीचा तर दूसरा अक्चुअल सुटकेचा. पद्धत चांगली आहे. बाकि शेवटी अनपेक्षित, त्यामुले लक्षात राहतो.

Friday, 28 August 2009

Monday, 3 August 2009

हेन्री पूल इज हिअर (२००८)

आपला सिनेमास्कोप ब्लॉग वर ह्या सिनेमा बद्दल वाचले आणि मग तो पाहिला. कथेची मांडणी चांगली आहे. "एस्परेंझा, हेन्री आणि डॉन ही पात्रं अनुक्रमे आस्तिक,नास्तिक आणि त्रयस्थ वृत्तीचं प्रतिनिधित्त्व करतात. प्रेक्षकांतला प्रत्येक जण यातल्या कोणत्या ना कोणत्या पात्राच्या व्यक्तिमत्त्वाशी समरस होऊ शकतो आणि ब-याच प्रमाणात इतर दोघांच्या बाजूदेखील त्याच्यापर्यंत पोहोचतात." - हे गणेश यांचे मत पटले.

दिल्ली ६

'रंग दे बसंती' नंतर राकेश ओमप्रकाश मेहरा कडून अपेक्षा वाढल्या होत्या. त्यातच प्रोमो वरून 'दिल्ली ६' हा मसाल्यासोबत सामाजिक संदेश देणारा सिनेमा असेल असे वाटले. बर्याच दिवसानंतर (रिलीज नंतर) पहाण्याचा योग आला, यात सामजिक संदेश असला तरी हा 'रंग दे बसंती' सारखा पकड़ घेऊ शकला नाही. बाकी जुनी दिल्ली मस्तपैकी जमली आहे. अभिनयाच्या बाबतीत मात्र अभिषेकनी जास्त प्रभाव पाडला नाही, सोनम बरी दिसते आणि काम करते. ऋषि कपूर तोकड्या वेळात प्रभाव पाडून जातो, प्रमुख छाप पड़ते ती 'पवन मल्होत्रा', दिल्लीकर अगदी मस्त रंगवाला आहे. दिव्या दत्ता, विजय राज यांनी योग्य न्याय दिला आहे. एकून ठीक ठाक.

Friday, 31 July 2009

द रीडर

द रीडर पाहिला, उत्तम सिनेमा आहे. केट विंस्लेटचा नितांत सुंदर अभिनय आणि उत्कृष्ट दिग्दर्शन या जमेच्या बाजू.