दिग्दर्शक - जॉन फ्रॅन्केहायमर
१९६२ सालचा कृष्णधवल सिनेमा ’द मंचुरियन कॅन्डिडेट’ नुकताच पहाण्यात आला. फ्रॅन्क सिनाट्रा, लॉरेन्स हार्वी आणि ऍन्जेला लांसबरी यांच्या अदाकारीने सजलेला हा थ्रिलर चित्रपट बघण्यासारखा आहे.
कोरियन युद्धावरुन परतलेल्या सैनिकांमध्ये रेमंड शॉ याला मेडल ऑफ ऑनर देण्यात येते, त्याची शिफारस करणारे कॅ. मार्को यांना नेहमी एक विचित्र स्वप्न पडत असते, ज्यात त्याची आर्मीची टीम कॅम्युनिस्ट रशियन्स आणि कोरियन्स पुढे बसलेली आहे, आणि त्यांच्यावर हिप्नॉटीझम प्रयोग होत आहेत, आणि सार्जेंट रेमंड शॉ हा दोन साथीदारांची संमोहीत अवस्थेत हत्या करतो. मार्को यांना यामुळे असे वाटते की कोरियन युध्दादरम्यान असे काही झाले आहे की रेमंड शॉ सारक्या नावडत्या माणसाला त्यांनी शिफारस केलेली चुकीची आहे. नेहमी ह्या स्वप्नांमुळे हैराण झालेले मार्को मिलिटरी ऑफिसर्सची मदत घेउ इच्छीतात, पण केवळ एक स्वप्न म्हणुन त्याला दुर्लक्षीण्यात येते. साधारण अश्याच स्वरुपाचे स्वप्न अजुन एका साथीदाराला पडल्यानंतर मात्र आर्मी मार्को यांच्या मदतीला तयार होते.
रेमंड शॉचे आपल्या आईबरोबरचे संबंध व्यवस्थित नसतात, त्याची आई मिसेस आईस्लिन हीचा आपल्या सिनेटर नवर्यावर पुर्ण पगडा असतो आणि त्याची राजकिय काराकिर्द ह्याच चालवत असतात. आपल्या स्वार्थापायी आपल्या मुलाचा प्रेमभंग करायला देखिल मागे पुढे पाहत नाहीत आणि वेळ प्रसंगी फायद्याकरिता आपली भुमिकाही बदलतात. रेमंडला सगळं कळुनही तो नेहमी त्यापुढे नतमस्तक होत असतो, याच कारण म्हणजे त्याच्यावर कोरियन युद्धादरम्यान संमोहनाचा प्रयोग झालेला असतो.
ह्या संमोहनाचा त्याच्यावर काय परिणाम असतो आणि या सगळ्याचा मार्कोच्या स्वप्नांशी काय संबंध असतो आणि सगळ्यांची उकल मार्को कसा करतो तो चित्रपटाचा उत्तरार्ध. चित्रपट उत्तम आहे आणि आपल्याला शेवटपर्यंत खिळवुन ठेवतो.
अरे वा. मस्तच वाटतोय हा चित्रपट. आणि BnW तर मला जामच आवडतात. लवकरच बघतो..
ReplyDeleteहो हेरंब, चित्रपट चांगला आहे..जरुर पहा...
ReplyDeleteI saw this nearly a year ago ;
ReplyDeletebut still cannot forgot the scene when he ties Congressional Medal of Honor around his neck,Whoa!!
What you liked most in the movie?
Thanks Aniket for the comment, and welcome to the blog. The last scene is what you mentioned, I liked the most.
ReplyDelete