Thursday 28 January 2010

झेंडा (२०१०)

दिग्दर्शक - अवधुत गुप्ते
बहुचर्चीत ’झेंडा’ सिनेमा पाहिला. सिनेमाच्या सुरुवातिला जरी सर्व पात्रं, कथानक, प्रसंग हे काल्पनिक असल्याचा दावा केला आहे तरिही सर्वांना माहित आहे की ठाकरे घराण्यावर चित्रपट बेतला आहे. पक्षातिल राजकारणासोबतच कार्यकर्त्यांच्या मानसिकतेचा वेध सिनेमात घेण्यात आला आहे.

चित्रपट सुरु होतो, काकासाहेबांनी जनसेना पक्षाचा वारसदार म्हणुन लायक पुतण्या राजेशला सोडुन आपल्या मुलाला पक्षाध्यक्ष घोषीत करण्यापासुन, यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. काही कार्यकर्ते राजेश यांच्या नव्या पक्षाकडे जातात तर काकासाहेबांचा आदेश माननारे निष्ठावंत जनसनेतच राहतात. यामुळे मित्र असणारे संतोष व सिद्धार्थ हया मित्रांमध्ये दुरावा निर्माण होतो. संतोष काकासाहेबांवर नितांत निष्ठा असणारा असतो, तो जनसेनेतच राहतो, तर सिद्धार्थ राजेश यांच्या नविन पक्षात जातो. पण दोघांनाही राजकारणाचा अनुभव येतो.

चित्रपटात उद्धव ची भुमिका करणार्‍या पुष्करला जास्त काही वाव नाही आहे, त्यामानाने राज बनलेल्या राजेशच्या भुमिकेची लांबी जास्त आहे, पण तो राज ठाकरे हुबेहुब नाही वाटत. त्याची भुमिका बर्‍यापैकी ग्रे शेड वाली आहे. बाकी सर्वांचा देखिल अभिनय चांगला आहे.

पक्षांच्या दबावामुळे म्हणा कि अजुन काही, चित्रपट काही पुर्ण वाटला नाही, शेवट गुंडाळल्यासारखा झाला आहे. कथानकाची एकुण गोळाबेरीज पहाता निष्कर्ष असा निघतो की कार्यकर्ते बनण्यापेक्षा आपलं शिक्षण आणि करियर महत्वाचं. काही काही वेळा मॅग्निफाईड/स्ट्रेट्च्ड कॅमेरावर्क का केलं आहे हे कळत नाही. ’विठ्ठला’ हे गाणे तर हायलाईट आहे, चित्रिकरणही उत्तम. बाकी दिग्दर्शनाच्या पहील्या प्रयत्नात अवधुत गुप्तेनी चांगलं काम केलं आहे.

Tuesday 19 January 2010

अमेरिकन हिस्ट्री एक्स(१९९८)

दिग्दर्शक - टोनी के

अमेरिकेतल्या वांशिक भेदावर अनेक चित्रपट येवुन गेले आहेत, अश्यातच एडवर्ड नॉर्टन अभिनीत, टोनी के दिग्दर्शित ’अमेरिकन हिस्ट्री एक्स’ पाहण्यात आला.

कथा आहे, डेरेक(एडवर्ड नॉर्टन) आणि त्याचा लहान भाउ डॅनियल, डॅनी(एडवर्ड फर्लॉग) याची. दोघेही अत्यंत हुशार, पण विचारसरणी मात्र जहाल. त्यांचा अफ्रो-अमेरिकनांवर अत्यंत राग असतो, कारण त्यांच्या वडिलांचा खुन कुणी एका (काळ्या ड्रग माफिया) व्यक्तीने केला असतो. डेरेक निओ-नाझी गॅंगचा मेंबर बनतो जी कॅमेरॉन नावाच्या एका स्वार्थी माणसाने चालवलेली असते. मुळातच हुशार असलेला डेरेक वक्त्रुत्वाच्या जोरावर मर्जी संपादन करतो, यातच एका रात्री ३ अफ्रो-अमेरिकन तरुण डेरेकच्या घरासमोर कार चोरायच्या उद्देशाने येतात त्यांची चाहुल डॅनीला लागते व तो डेरेकला उठवतो, डेरेक दोघांना मारतो आणि क्रांतिकारकाच्या थाटात पोलिसांना शरण जातो. याप्रसंगामुळे तो गोर्‍या तरुणांमध्ये हिरो बनतो, नकळत डॅनीवर याचे संस्कार होतात आणि तो पण नाझी गॅंग मध्ये सामिल होतो.

डॅनीने लिहिलेला नाझी धर्जीना निबंध पाहुन त्याचे शिक्षक स्विन मुख्याध्यापकाकडुन परवानगी घेवुन त्याचे इतिहास शिक्षक बनतात आणि पहिली असाइन्मेन्ट म्हणुन डेरेक वर निबंध लिहुन आणायला सांगतात, या इतिहासाचे नाव ठेवतात ’अमेरिकन हिस्ट्री एक्स’.

३ वर्षाच्या कैदेतुन बाहेर आल्यावर डेरेक संपुर्ण बदललेला असतो. प्रत्येक क्षणी डॅनीला तो गॅंग पासुन दुर ठेवण्याचा प्रयत्न करतो, डेरेकच्या ह्या वागण्यामुळे गॅंगचे लोकं, त्याची प्रेयसी सर्व दुर जातात आणि डॅनी गोंधळुन जातो, त्याच्याशी वाद-विवाद करतो, तेंव्हा डेरेक तुरुंगातील अठवणी सांगतो जे त्याच्या बदलाला कारणीभुत असते.

तुरुंगात डेरेक गोर्‍या लोंकांच्या गॅंगचा मेंबर असतो, काही काळ व्यतित केल्यानंतर त्याला समजते की काही गोरी मंडळी ड्रग्स करिता मेक्सिकन काळ्या गॅंगसोबत व्यवहार करित आहेत, इतर गोर्‍या लोकांना सांगितल्यावर देखिल ते दाद देत नाहीत आणि यामुळे तो त्यांच्यापासुन दुर होतो, यातच त्याची गट्टी लेमंट या काळ्या कैद्यासोबत होते, या दोघांवर तुरुंगातिल चादरी सांभाळायचे काम असते. हे सर्व गोर्‍या कैद्यांना सहन होत नाही आणि अंघोळीच्या वेळेला डेरेकवर अतिप्रसंग करतात. या मानसिक धक्क्याने डेरेक खचतो, दवाखान्यात असताना शिक्षक स्विन येतात आणि डॅनीच्या विचारसरणी बद्दल डेरेककडे चिंता व्यक्त करतात. स्विन सांगतात की त्यांच्या तरुणपणी ते देखिल गोर्‍या लोकांचा असाच द्वेष करायचे पण कालांतराने कळलं की यात काहीच मिळत नाही. केवळ द्वेष करण्यापेक्षा आपलं जिवन चांगलं करण्यासाठी काहीतरी केलं पाहीजे. डेरेकवर याचा परिणाम होतो आणि तो या चक्रातुन बाहेर पडतो.

डेरेकचे तुरुंगातले अनुभव ऐकुन डॅनी गॅंग सोडण्याचा निर्णय घेतो...... चित्रपटाचा शेवट सकारात्मक नाही, आणि अनपेक्षीतही...त्यामुळे इथे नाही सांगत.

खास एडवर्ड नॉर्टन चा अभिनय पहाण्यासारखा आहे, आधिचा काळ्यांवरिल विखार आणि नंतरचा बदललेला डेरेक त्याने उत्तम साकारला आहे, या भुमिकेसाठी त्याला ऑस्कर नॉमिनेशन मिळालं होतं.
सिनेमा मला खुप आवडला, पाहिला पाहिजे असा...

Saturday 16 January 2010

ऑफिस स्पेस (१९९९)

ऑफिस स्पेस (१९९९)
दिग्दर्शक - माईक जज.
कुणाला आपल्या ऑफिसचे काम आवडते?, बहुतांशी नाइलाजाने पर्याय नसल्यामुळे सर्व रेटत असतात, याच थीम वर आणि आय.टी. इंडस्ट्रीवर २००० साली आलेल्या मंदी यावर आधारीत असणारा ’ऑफिस स्पेस’ नुकताच पहाण्यात आला.  मी ही त्या क्षेत्रात असल्यामुळे सिनेमाला रिलेट करु शकलो. विनोदी अंगाने कुठेही बोजड न होता मस्त मनोरंजन पुरवतो.

कथा आहे, इनिटेक या सॉफ्टवेअर कंपनीत काम करणार्या पीटर, समीर, माइकल आणि मिल्टन यांची.  पीटर ’वाय२के’ प्रॉब्लेम वर काम करणारा रि-प्रोग्रामर. कामामुळे. ताणामुळे, डिप्रेस्ड, आणि बोअर झालेला असतो, त्यातच त्याची प्रेयसीचे संबंध अजुन कुणाबरोबर असल्याचा त्याचा संशय असतो, त्यामुळे तो जिवनाला कंटाळतो. यातच सप्ताहांत त्याचा बॉस त्याला कामावर येण्यास सांगतो, पीटर अजुन चिडतो.  त्यांच्या कंपनीत कंसल्टंट म्हणुन ’दि बॉब्स’ या दोघांची नेमनुक होते, त्यांचे काम म्हणजे सर्व कर्मचा‍र्‍यांशी बोलने, कामाची पद्धत समजावुन घेणे आणि आवश्यक नसलेल्यांना बाहेरचा रस्ता दाखवणे. यासर्व त्रासामुळे आणि त्यातुन बाहेर पडण्यासाठी पीटर एका संमोहक तज्ञाची मदत घ्यायची ठरवितो.  संमोहन थेरेपी अर्ध्यात असताना  हृदय विकारामुळे तज्ञाचा मृत्यु होतो, आणि पीटर अर्धवट संमोहीत असताना तिथुन उठुन घरी जातो.

दुसर्या दिवशी पीटर अतिशय उशीरा पर्यंत झोपुन रहातो, त्याच्या बॉस आणि प्रेयसीचे अनेकदा कॉल येवुन जातात, पीटर सोयीस्कररित्या तिकडे दुर्लक्ष करतो.  त्याऐवजी त्याला आवडणार्‍या गोष्टी म्हणजे काहीही न करणे, आणि त्याला आवडणार्‍या जॉना या वेट्रेस बरोबर लंच ला जातो.  जॉनादेखिल तिच्या कामाला कंटाळलेली असते, कारण त्यांचे काही विचित्र नियम ज्यात तिला नको वाटणारे बिल्ले आपल्या युनिफॉर्मवर लावावे लागत असतात, ति सुद्धा बॉस बरोबर भांडुन नोकरी सोडते. 

पीटर सगळी भिती सोडुन ऑफिसमध्ये आपल्या मनाप्रमाणे वागायला सुरुवात करतो.  बॉसच्या आरक्षीत पार्कींगच्या जागी आपली कार लावतो, खिडकी दिसत नाही म्हणुन आपल्या क्युबिकलची एक भिंत तोडतो.  कामाऐवजी गेम्स वगैरे खेळत बसतो.  कंसल्टंट सोबतच्या मिटींग मध्ये तो आपली मते निर्भिडपणे मांडतो आणि आपल्याला वरिष्ठांकडुन जास्त मोटिवेशन नाही मिळाल्यामुळॆ जास्त काम नाही होवु शकत असे सांगतो, बहु-बॉस पद्धतीमुळे एकाच गोष्टीसाठी सर्वांकडुन कसे वेग-वेगळे शेरे कसे मिळतात आणि ते कामावर कसे परिणाम करतात हे सांगतो, यामुळे बॉब द्वयींवर आपली छाप पाडतो.  यामुळे त्याचे प्रमोशन होते आणि सरळमार्गी काम करणारे समीर आणि मायकल यांना पिंक स्लीप देण्यात येते.  मिल्टनची पगार बंद केली जाते आणि त्याचे क्युबिकल तळघरात हलविण्यात येते, यामुळे मिल्टन नाराज असतो आणि ऑफिस जाळुन टाकण्याबद्दल स्वत:शी पुटपुटतो.

पीटर, मायकल आणि समीर यामुळे चिडुन कंपनीवर बदला घॆण्याचे ठरवितात, आणि एक वायरस बनवुन सर्वर वर अपलोड करतात, जेणेकरुन प्रत्येक पैसे देवाण-घेवाणीत यांच्या खात्यात एक छोटी रक्कम जमा होत जाईल, जि कालांतराने खुप मोठी होइल व कुणाला संशयही येणार नाही.  पण काही दिवसात वायरस मधील अपुर्णांकाच्या चुकीमुळे खुप मोठी रक्कम जमा होते, जेणेकरुन कंपनीला संशय नक्कीच येणार असतो. काहीही न सुचुन ते रक्कम बॅंकेतुन काढुन बॉसच्या केबिन मध्ये रात्री एका पाकीटात घालुन ठेवतात. 

दुसर्या दिवशी पीटर असे ठरवितो की गुन्ह्याचा पुर्ण दोष स्वतः वर घ्यायचा, त्यासाठी तो ऑफिसला येतो आणि पहातो की संपुर्ण ऑफिसला आग लागलेली आहे, त्याचे सर्व प्रॉब्लेम सुटतात.  प्रत्यक्षात मिल्टनने बॉसवर राग म्हणुन ऑफिस पेटविलेले असते कारण बॉस त्याचा आवडता स्टेप्लर घेतो, तत्पुर्वी तो पीटरने ठेवलेले पैश्याचे पाकीट उचलतो, आणि हवाईत जाउन मजा करतो.  पीटर कंस्ट्रक्शन मध्ये आवडता जॉब करतो, आणि समीर, मायकल दुसर्या आय.टी. कंपनीत रुजु होतात.

आपल्या ऑफिसच्या काही खाणा-खुणा यात मिळतात का ते पहा.... :)

आय.एम.डी.बी. : http://www.imdb.com/title/tt0151804/

Monday 4 January 2010

द बकेट लिस्ट (२००७)

दिग्दर्शक - रॉब रेनर
मॉर्गन फ्रीमन, जॅक निकोल्सन यांचा ’द बकेट लिस्ट’ कालच पाहण्यात आला.  सिनेमा आवडला.  मेकॅनिक कार्टर (फ्रीमन), आणि हॉस्पीटल मालक एडवर्ड (निकोल्सन) हे कॅन्सर पिडीत एकाच हॉस्पीटल मध्ये उपचारार्थ येतात, आणि त्यांना रुम शेअर करावी लागते.  यातुन त्यांची मैत्री जमते, काही टेस्ट्स नंतर दोघांकडे ६-८ महीन्यापेक्षा वेळ नाही असे कळते.
कार्टर अपुर्या ईच्छा कागदावर उतरवुन ठेवतो, आणि तो कागद एडवर्ड्च्या हातात पडतो, त्यात आपल्या काही ईच्छा टाकुन ते दोघे आपली विश लिस्ट पुर्ण करण्यासाठी बाहेर पडतात.
मग ते युरोप, इजिप्त, भारत, चीन, नेपाळ, हॉंग-कॉंग करत हिमालय सगळी सैर करुन येतात आणि या ऍड्वेंचर दरम्यान एकमेकाचे फॅमिली प्रॉब्लेम सोडवतात आणि म्रुत्युला हसत सामोरे जातात....
मॉर्गन फ्रीमन, जॅक निकोल्सन यांची अदाकारी बघण्यासारखी आहे.
आपल्याकडील ’दसविदानिया’ याचीच आव्रुत्ती होती.  मिळाला तर चुकवू नका.

ऍज गुड ऍज इट गेट्स (१९९७)


दिग्दर्शक - जेम्स ब्रुक्स
जॅक निकोल्सन, हेलेन हंट अभिनीत ऑस्कर विजेता ’ऍज गुड ऍज इट गेट्स’ बर्याच दिवसांपासुन पाहायचा होता, त्याचा योग काल आला. अपेक्षेप्रमाणे खुप छान देखिल आहे.
जॅक, हेलेन अभिनयात कमाल करतात. 
जॅक हा एक लेखक असतो, त्याला जर्मफोबिया असतो, तो फटकळ आणि हेकेखोर स्वभावाचा असल्यामुळे अपार्टमेंट मध्ये कुणाशीच त्याचे जमत नसते, तो रोज एकाच रेस्टारेंट मध्ये जेवायला जात असतो, जिथे हेलेन वेट्रेस म्हणुन काम करीत असते.  तिचा मुलगा नेहमी आजारी असल्यामुळे तिची ओढाताण चालु असते.  जॅकला तिची इतकी सवय असते कि मुलाच्या तब्येतीमुळे ती कामावर येवु शकत नाही तेव्हा जॅक तिच्या घरी जाउन तिच्या मुलाच्या खर्चाचं सर्व भार स्वत:वर घेतो. यात त्याचा स्वार्थ असा की मुलाची काळजी घेणारे कोणी असेत तर ती कामावर येवु शकेल आणि खाण्याची सोय होइल.  यातच त्याच्या फ्लॅट्च्या बाजुला असणार्या चित्रकाराकडे चोरी होते व यात त्याला चोर गंभीर चोप देतात, यामुळे त्याचा कुत्रा जॅकला सांभाळावा लागतो, त्यात त्या कुत्र्यासोबत याची गट्टी जमते, चित्रकाराच्या घटनेमुळे तो कफल्लक होतो आणि त्याला सुद्धा जॅक कडे रहावे लागते, मग दैवयोगाने या सर्वांच्या एकत्र ट्रिपमुळे ते एकमेकाच्या जवळ येतात आणि आयुष्याच्या कटू गोष्टी विसरुन नवीन आयुष्याला सामोरे जातात.
खुपच मस्त सिनेमा आहे, तेव्हा सोडु नका...

Saturday 2 January 2010

टर्टल्स कॅन फ्लाय (२००४) - पर्शीयन


दिग्दर्शक - बाहमन घोब्दी
युद्धाचे परिणाम किती भयंकर असतात, त्यात मुलांचे जीवन कसे होरपळुन निघते. लहान मुलांच्या द्रुष्टीकोनातुन युद्धावर आधारीत एक सिनेमा पाहण्यात आला, टर्टल्स कॅन फ्लाय.
अमेरीकेने इराक मध्ये प्रवेश करुन सद्दाम हुसेन ला अटक करण्याच्या वेळेच्या आसपास हा सिनेमा घडतो, इराण-टर्की सीमेवरच्या खुर्दीश भागात.
http://en.wikipedia.org/wiki/Turtles_Can_Fly

आपला सिनेमास्कोप

थॅंक यु फॉर स्मोकिंग (२००६)


दिग्दर्शक - जेसन रिट्मन

सिगरेट आणि तंबाकू सेवनाच्या परिणामाबद्दल तिरकस विनोदी अंगाने भाष्य करणारा ’थॅंक यु फॉर स्मोकिंग’ पाहण्यासारखा आहे.
कथासार: ऍकाडमी ऑफ टोबको स्टडीज चा वाइस प्रेसिडेंट आणि स्पोकपर्सन निक नेलर स्मोकर्सच्या अधिकारांबद्दल काम करत असतो.
बोलण्यात अतिशय हुशार निक सार्वजनिक कार्यक्रमात आणि टिवी प्रोग्राम मध्ये तंबाकू सेवनाच्या अनुकुल बोलतो.
सिनेटर सिनेटमधे एका बिल पास करण्याच्या मागे असतात ज्यात सिगारेट पॅक वर "डेंजर" (कवटी) चिन्ह लावण्याची सक्ती असते.
याच्यामुळे सिगरेट खपात होणारी तुट भरुन काढण्याकरीता निक असे सुचवतो की हॉलीवुड सिनेमा मध्ये ऍक्टर्सनी ऑन-स्क्रीन सिगरेट ओढली तर खप वाढेल...
त्यासाठी तो हॉलीवूड सुपर ऍजंट ला भेटतो आणि या ट्रीप मध्ये आपल्या मुलाबरोबर त्याला संवाद साधण्याचा वेळ मिळतो.
एका टिवी कार्यक्रमामध्ये निक ला जिवे मारण्याची धमकी येते, पण त्याला न घाबरता निक सेक्युरिटी न बाळगण्याचे ठरवतो, त्यातच त्याच अपहरण करुन त्याच्या सर्वांगाला निकोटीन पट्ट्या चिकटवल्या जातात जेणेकरुन त्याला तंबाकू आणि सिगारेट बद्द्ल बोलण्याची शिक्षा मिळावी, त्यातुन दैवयोगाने तो वाचतो त्याचे शरीर निकोटीन सहन करु शकते कारण त्याची सिगरेट ओढण्याची सवय, पण आता तो एकही सिगरेट ओढु शकणार नसतो.  या अपहरण नाट्यामुळे निक ला पब्लिक सिंपथी मिळते.
एक टिवी रिपोर्टर निक सोबत अफेअर करते व त्याच्याकडुन ऍकाडमी आणि सिगरेट कंपन्याची बरीचशी सिक्रेट्स निक तिला सांगतो, त्याला वाटते की हे ऑफ रिकॉर्ड आहे पण ती सगळं  छापते, आणि ऍकाडमी निक ला काढुन टाकते, त्याच्यावरची सिंपथी मावळते.
निक नाराज होतो पण त्याचा मुलगा त्याला दिशा देतो.  त्यानंतर तो प्रेस ला मुलाखत देतो आणि सिनेट समोर बिल वर बोलायचे असल्याचे सांगतो.  सिनेट मध्ये आपल्या वाक:चातुर्याने तो आपला मुद्दा पटवुन देतो. 
सिनेमाचे बलस्थान म्हणजे स्क्रिनप्ले आणि डायलॉग्स.  टिवी शो आणि शेवटचा सिनेट मधील प्रसंग तर मस्तच!
 सविस्तर परिक्षण - आपला सिनेमास्कोप

ए वल्ड विदाउट थिव्ज (२००४) - चाइनिज


दिग्दर्शक - Feng Xiaogang
अत्यंत सुंदर असा हा चाइनिज सिनेमा काल पाहण्यात आला. 
जगात फक्त चांगले लोकं असतात आणि चोर अस्तित्वात नसतात अशी याची धारणा असणारा मुलगा जो लग्न करण्यासाठी घरी जात असतो, आणि त्याच ट्रेन मध्ये चोरांच्या दोन टोळ्या त्याच्या पैशावर डोळे ठेवुन असतात.  माणुसकी, चांगुलपणा आणि चोरांच्या टोळ्यांमधील संघर्ष, त्यांचे कायदे, स्पर्धा, धोका अश्या अनेक घटनांतुन सिनेमा घडतो.  मिळाला तर जरुर पहा.

३ इडीयट्स (२००९)

३ इडीयट्स (२००९)
दिग्दर्शक - राजकुमार हिरानी.
२००९ वर्षीचा सर्वाधिक प्रतिक्षा असलेला सिनेमा म्हणुन ’३इडीयट्स’ चे नाव होते.
चेतन भगतांच्या ’फाइव पॉइण्ट्स समवन’ वर बेतलेला (सद्ध्या वाद चालु आहे यावरुन).
मुन्नाभाई सिरिजचे यशस्वी दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आमीर खान...
सिनेमाची कथा तर सर्वांना एव्हाना माहीत आहेच.  सिनेमाचा कंसेप्ट छान आहे, बर्याच गोष्टी छान आहेत आणि आपल्याला शिकवतात,
या ब्लॉगवर डिटेल्स आहेत...

आमीर खान, करीना कपुन आणि बोमन इरानी यांचा अभिनय उत्तम आहे. शर्मन जोशी छान, पण त्याच्यासाठी नेहमिचीच भुमिका, माधवन ठिकठाक.
पण माझ्या मते तरी हा सिनेमा ब्रेकथ्रु वगैरे नाहीये, मुन्नाभाई एम.बी.बी.एस च्या चौकटीबाहेर काही जात नाही.
३ इडियट्स @ मोगरा फुलला
मेडीकल सोडुन इंजीनीरिंग कॅम्पस आहे, बाकी सगळे सारखेच.  शाळा/कॉलेज चा हुकुमी प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवुन पटकथा रचल्यामुळे बरेचशे व्रात्य जोक्स, काही अतिशयोक्तीपुर्ण सिन्स मुळे सिनेमा बर्याच जागी सुटतो.  करीनाच्या बहीणीची डिलिवरी सारखे सिन तर अतिशय पाचकळ वाटले.  बोमन इराणीला खलनायक करायचे म्हणुन त्याची हास्यास्पद आव्रुत्ती, त्यामुळे त्याला करावा लागलेली ओवर ऍक्टींग काही वेळाने नकोशी वाटते.
माझ्या अपेक्षेपेक्षा बराच खाली... :(