दिग्दर्शक - परेश मोकाशी.
ऑस्करसाठी या वर्षीचा भारतातर्फेची अधिकृत प्रवेशिका असलेला बहुचर्चीत मराठी चलचित्रपट ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’ पाहण्याचा योग आला.
भारतिय चित्रपट सृष्टीचे जनक असणार्या दादासाहेब फाळके यांच्या चित्रपट बनविण्याच्या प्रवास म्हणजे हा चित्रपट.
वर्ष १९११, इंग्रजांच्या राजवटीत केळफा (फाळके) इंग्लंडचा ख्रिस्तावरिल मुकपट पाहुन प्रभावित होतात आणि भारतात मुकपट उद्योग सुरु करायचा असा चंग बांधतात.
पण हे सगळे इतके सोपे नसते. प्रिंटींगप्रेसचा धंदा सोडलेल्या फाळक्यांच्या घरात पैसे नसतात, मात्र अजोड चिकाटी आणि महत्वकांक्षा असते. घरातील पै-नी-पै गोळा करुन आणि वर घरातील सामान विकुन ते या विषयीचा अभ्यास करतात आणि एक प्रोजेक्टर विकत घेतात (ज्यात फक्त फोटो पहायची सोय असते).
मुकपटाविषयी अधिक माहीती करुन घ्यावी यासाठी ते लंडनला जायचा बेत करतात व त्यासाठी कर्ज काढतात, वर बायकोचे दागीने गहाण टाकतात. लंडनला जाउन तिथे चित्रपटावर लिहिणार्या मासिकाच्या ऑफिसात जाउन सरळ चित्रपट निर्मितीविषयी माहीती घेतात, आणि भारतात परत येवुन पहिल्या मुकपट बनविण्याच्या तयारित लागतात.
लंडनहुन कॅमेरा येतो, आणि मग कुठला मुकपट बनवावा यावर विचार सुरु होतो, मग ते राजा हरिश्चंद्रावर मुकपट बनविण्याचे ठरवितात, त्यानुसार कलाकारांसाठी शोध सुरु होतो, आणि अनेक अडथळ्यांसहीत चित्रपट पुर्ण होतो. पहिल्या एक-दोन दिवसात फारसा प्रतिसाद मिळत नाही, मग गल्लोगल्ली जाहीरात वगैरे करुन, आणि लकी ड्रॉ सारख्या योजना चालवुन अखेरीस मुकपट प्रचंड यशस्वी होतो. यानंतर फाळके अनेक धार्मिक चित्रपटांची निर्मीती करतात.
फाळकेंचा चित्रपट युरोपात सुद्धा प्रदर्शीत होतो, आणि इंग्रंजांकडुन प्रशंसा होते, तिथे चित्रपट बनविण्याचे त्यांना आमंत्रण मिळते पण फाळके ते सोडुन मायदेशात चित्रपट निर्मिती उद्योगाला चालना देण्यासाठी भारतात परत येउन चित्रपट निर्मिती चालु ठेवतात...
हा प्रवास चित्रपटात विनोदी अंगाने सादर केला आहे. तारामतीच्या भुमिकेसाठी स्त्री कलाकार शोधण्यासाठीचा शोध आणि प्रत्यक्ष मुकपटाच्या निर्मिती दरम्यानचे सिन तर झकास जमले आहेत. स्त्री पात्र साकारणार्या कलाकारांची मिशी कापण्यास केलेली टाळाटाळ, कारण केवळ बाप मेल्यावर मिशी काढतात असे समज...त्यावर दादासाहेबांचे स्पष्टीकरण वगैरे सिन्स अत्यंत मनोरंजक.
परेश मोकाशींचे दिग्दर्शन सुरेख आहे, तांत्रीक बाजु अगदी उत्तम आहेत. १९११-१९१५ चा काळ सुरेखपणे उभा केला गेला आहे, यासाठी नितिन देसाई यांच्या कलादिग्दर्शनाची मोलाची साथ मिळाली आहे. मला विशेष आवडलं ते सिनेमाचे पार्श्वसंगीत, आनंद मोडक आणि नरेंद्र भिडे यांचे खास अभिनंदन. प्रत्येक कलाकाराचा अभिनय उत्तम झाला आहे, फाळके झालेले नंदु माधव आणि त्यांच्या पत्नी असलेल्या विभावरी देशपाण्डे यांचे तर विशेष कौतुक. युटीवी सारख्या भक्कम निर्मिती संस्थेमुळे चित्रपटाचा स्टॅण्डर्ड अतिशय छान आहे...बघावाच असा...
Showing posts with label मराठी. Show all posts
Showing posts with label मराठी. Show all posts
Monday, 15 February 2010
Thursday, 28 January 2010
झेंडा (२०१०)
दिग्दर्शक - अवधुत गुप्ते
बहुचर्चीत ’झेंडा’ सिनेमा पाहिला. सिनेमाच्या सुरुवातिला जरी सर्व पात्रं, कथानक, प्रसंग हे काल्पनिक असल्याचा दावा केला आहे तरिही सर्वांना माहित आहे की ठाकरे घराण्यावर चित्रपट बेतला आहे. पक्षातिल राजकारणासोबतच कार्यकर्त्यांच्या मानसिकतेचा वेध सिनेमात घेण्यात आला आहे.

चित्रपट सुरु होतो, काकासाहेबांनी जनसेना पक्षाचा वारसदार म्हणुन लायक पुतण्या राजेशला सोडुन आपल्या मुलाला पक्षाध्यक्ष घोषीत करण्यापासुन, यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. काही कार्यकर्ते राजेश यांच्या नव्या पक्षाकडे जातात तर काकासाहेबांचा आदेश माननारे निष्ठावंत जनसनेतच राहतात. यामुळे मित्र असणारे संतोष व सिद्धार्थ हया मित्रांमध्ये दुरावा निर्माण होतो. संतोष काकासाहेबांवर नितांत निष्ठा असणारा असतो, तो जनसेनेतच राहतो, तर सिद्धार्थ राजेश यांच्या नविन पक्षात जातो. पण दोघांनाही राजकारणाचा अनुभव येतो.
चित्रपटात उद्धव ची भुमिका करणार्या पुष्करला जास्त काही वाव नाही आहे, त्यामानाने राज बनलेल्या राजेशच्या भुमिकेची लांबी जास्त आहे, पण तो राज ठाकरे हुबेहुब नाही वाटत. त्याची भुमिका बर्यापैकी ग्रे शेड वाली आहे. बाकी सर्वांचा देखिल अभिनय चांगला आहे.
पक्षांच्या दबावामुळे म्हणा कि अजुन काही, चित्रपट काही पुर्ण वाटला नाही, शेवट गुंडाळल्यासारखा झाला आहे. कथानकाची एकुण गोळाबेरीज पहाता निष्कर्ष असा निघतो की कार्यकर्ते बनण्यापेक्षा आपलं शिक्षण आणि करियर महत्वाचं. काही काही वेळा मॅग्निफाईड/स्ट्रेट्च्ड कॅमेरावर्क का केलं आहे हे कळत नाही. ’विठ्ठला’ हे गाणे तर हायलाईट आहे, चित्रिकरणही उत्तम. बाकी दिग्दर्शनाच्या पहील्या प्रयत्नात अवधुत गुप्तेनी चांगलं काम केलं आहे.

Monday, 16 November 2009
"टिंग्या" (2008)

बहुचर्चित 'टिंग्या' पाहिला, अतिशय आवडला. विषय तर उत्तम आहेच वर सर्व कलाकारांनी उत्तम काम केले आहे. विशेष म्हणजे बाल कलाकार टिंग्या(शरद गोयेकर) यांनी अतिशय प्रामाणिकपणे ही भूमिका साकारली आहे. (अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे). असे कितीतरी सीन आहेत कि ज्यामध्ये डोळ्यात पाणी येते. त्यातही टिपिकल भडक पार्श्वसंगीत नसने ही जमेची बाजू . तांत्रिक बाजू थोड्या कमजोर वाटल्या पण एकूण परिणाम सुंदर आहे. सीन बदलला कि लगेच पार्श्वसंगीत थांबणे, किंवा बदलणे, हे बर्याच जागी खटकते. (ही बर्याच वास्तवदर्शी सिनेमात दिसणारी , खटकणारी गोष्ट मला वाटते.) ते एकदम बदलण्या ऐवजी लीलया मिसळल पाहिजे. असो, बहुतेक मला हे नीट सांगता आलं नाही. मंगेश हाडवळे यांच दिग्दर्शन चांगल आहे, त्यांचा पुढील प्रोजेक्ट हे सिद्ध करेलच. सिनेमा पाहताना स्वतःचा कितीदा तरी राग आला, आणि आपण किती कोरडे झाले आहोत याची लाज वाटली. आताही माहित आहे कि हा सिनेमा फक्त एकट्यात मी पाहू शकतो कारण कुणा समोर रडण्यात आपण (मी) कमीपणा मानतो.
आपलासिनेमास्कोप परीक्षण
http://apalacinemascope.blogspot.com/2008/05/blog-post_30.html
अधिकृत दुवा
http://tingya-a-film.blogspot.com/
लोकप्रभा परीक्षण
Subscribe to:
Posts (Atom)