दिग्दर्शक - अवधुत गुप्ते
बहुचर्चीत ’झेंडा’ सिनेमा पाहिला. सिनेमाच्या सुरुवातिला जरी सर्व पात्रं, कथानक, प्रसंग हे काल्पनिक असल्याचा दावा केला आहे तरिही सर्वांना माहित आहे की ठाकरे घराण्यावर चित्रपट बेतला आहे. पक्षातिल राजकारणासोबतच कार्यकर्त्यांच्या मानसिकतेचा वेध सिनेमात घेण्यात आला आहे.
चित्रपट सुरु होतो, काकासाहेबांनी जनसेना पक्षाचा वारसदार म्हणुन लायक पुतण्या राजेशला सोडुन आपल्या मुलाला पक्षाध्यक्ष घोषीत करण्यापासुन, यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. काही कार्यकर्ते राजेश यांच्या नव्या पक्षाकडे जातात तर काकासाहेबांचा आदेश माननारे निष्ठावंत जनसनेतच राहतात. यामुळे मित्र असणारे संतोष व सिद्धार्थ हया मित्रांमध्ये दुरावा निर्माण होतो. संतोष काकासाहेबांवर नितांत निष्ठा असणारा असतो, तो जनसेनेतच राहतो, तर सिद्धार्थ राजेश यांच्या नविन पक्षात जातो. पण दोघांनाही राजकारणाचा अनुभव येतो.
चित्रपटात उद्धव ची भुमिका करणार्या पुष्करला जास्त काही वाव नाही आहे, त्यामानाने राज बनलेल्या राजेशच्या भुमिकेची लांबी जास्त आहे, पण तो राज ठाकरे हुबेहुब नाही वाटत. त्याची भुमिका बर्यापैकी ग्रे शेड वाली आहे. बाकी सर्वांचा देखिल अभिनय चांगला आहे.
पक्षांच्या दबावामुळे म्हणा कि अजुन काही, चित्रपट काही पुर्ण वाटला नाही, शेवट गुंडाळल्यासारखा झाला आहे. कथानकाची एकुण गोळाबेरीज पहाता निष्कर्ष असा निघतो की कार्यकर्ते बनण्यापेक्षा आपलं शिक्षण आणि करियर महत्वाचं. काही काही वेळा मॅग्निफाईड/स्ट्रेट्च्ड कॅमेरावर्क का केलं आहे हे कळत नाही. ’विठ्ठला’ हे गाणे तर हायलाईट आहे, चित्रिकरणही उत्तम. बाकी दिग्दर्शनाच्या पहील्या प्रयत्नात अवधुत गुप्तेनी चांगलं काम केलं आहे.
कदाचित प्रदर्शनापुर्वीच झेंड्याची प्रमानापेक्षा जास्त "हवा" झाली हेही एक कारन असू शकते चित्रपट कमी आवडण्याचे. कार्यकर्त्याच्या नजरेतून दाखविन्यापेक्शा सरळ ठाकरे घरन्याच्या घटना चित्रित झाल्या असत्या तरी भरपुर यश मिळालं असतं.
ReplyDeleteसचिन,
ReplyDeleteप्रतिक्रियेकरिता धन्यवाद!
मी स्वत: हा सिनेमा केवळ हवा आहे म्हणुन नाही पाहीला.
कार्यकर्त्यांच्या नजरेतुन पाहील्यामुळे हा चित्रपट जास्त प्रभावी झाला आहे, नुसते प्रसंग दाखवले असते तर कदाचित एक सामान्य राजकिय पट म्हणुन राहीला असता.
असो, चित्रपट चांगला आहे, केवळ राजकिय सेंसर पायी त्याचा शेवट गळा दाबल्यासारखा केला आहे, तोच तेव्हडा खटकला....
पण तरीही हा चित्रपट मला पाहायचाय कारण अवधुतची त्यामागची भूमिका मला पटलीय...आता कशी मांडलीय ते अर्थातच पाहिल्यावरच कळेल पण...
ReplyDeleteमाझ्याकडे काटछाट करण्याअगोदरची कॉपी आहे, त्यामुळे ओरीजनल सिनेमा पहायचं भाग्य मला मिळणार आहे.
ReplyDelete"...कोणता झेंडा घेऊ हाती ?" एकदा बघायचाच आहे.
-अजय
मलाही हा सिनेमा पहायचाच आहे. अजय तुझी कॊपी जपून ठेव रे. म्हणजे आम्हाला पाहता येईल.अवधुतचे दिग्दर्शन...मला फार उत्सुकता आहे.
ReplyDeleteहा चित्रपट पहायचा आहे. अवधूतचं पहिलं दिग्दर्शन म्हणून आणि राजकारणावरील चित्रपट म्हणून.
ReplyDeleteअजय, मित्रा. माझ्याकडे काटछाट करण्याअगोदरची कॉपी आहे, असे नुसतं सांगतोयंस म्हणजे आमच्यासाठी लंकेत सोन्याच्या विटा.
@अपर्णा,
ReplyDeleteअवधुतने स्वत:चा संभ्रम सिनेमाद्वारे मांडला आहे...जरुर पहा आणि कळवं तुला कसा वाटला ते.
@अजय,
अन्कट वर्शन तुला कुठे मिळाले यार, मला पहायला आवडेल ते.
@भाग्यश्री,
अवधुतने पहिल्या प्रयत्नात चांगली कामगिरी केली आहे, राजकिय सेंसर आड आला नसता तर कदाचित खुप काही छान बघायला मिळालं असतं.
@कांचन,
जरुर पहा, आणि लिहा यावर.
प्रतिक्रियेकरिता सर्वांचे आभार!
आत्ताच आलाय apalimarathi.com वर. आता बघतो १-२ दिवसात. परीक्षण बाकी एकदम मस्तच !!
ReplyDeleteधन्यवाद हेरंब!
ReplyDeleteनालेमागुनच्या घोड्यासारखी ही प्रतिक्रीया वाटेल पण ब्लॉग कालपासूनच वाचायला सुरवात केल्यामुळे प्रतिक्रीया उशिरा.
ReplyDeleteया चित्रपटाचं कथानक प्रचंड ओळखिचं असल्यानं त्याच्याबद्दल उत्सुकता नव्हतीच. पण अवधुत हे सगळं प्र्करण कसं निभावून नेतो ते पहायचं होतं. मला तर त्याचा हा पहिलाच प्रयत्न आवडला. संतोषची भुमिका तर चकचकीत आहे. राजकारण गेलं चुलित म्हणजे काय हे यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि तो बर्यापैकी जमला आहे. एरविही भारतातल्या राजकाराणाला किती नितीमत्ता राहिलेली आहे हा आणखी एक वेगलाच मुद्दा आहे.
"विठ्ठला"वर प्रतिक्रीया दिल्याशिवाय थांबणं म्हणजे झेंडावर अन्याय होईल. गाणं अक्शरश: अंगावर येतं आणि थरथरवतं. द्न्यानेश्वरनं जबरी म्हणलंय. गाणं डोक्यातून जायला दोन तीन दिवस लागले यातच काय ते आलं.
शिल्पा, आवर्जुन प्रतिक्रिया दिली यातच सर्व आले... खुप आभार.
ReplyDeleteतुमचं मत १००% पटले.
mala Zenda jaast awaadala (i mean compared to Natrang that I watched during same week)
ReplyDeleteदोन्ही चित्रपटांची आपापली बलस्थानं आहेत तसेच काही अवगूण सुद्धा आहेत.. दोन्हीत नटरंग मला चांगला वाटला...
ReplyDelete