Tuesday, 19 January 2010

अमेरिकन हिस्ट्री एक्स(१९९८)

दिग्दर्शक - टोनी के

अमेरिकेतल्या वांशिक भेदावर अनेक चित्रपट येवुन गेले आहेत, अश्यातच एडवर्ड नॉर्टन अभिनीत, टोनी के दिग्दर्शित ’अमेरिकन हिस्ट्री एक्स’ पाहण्यात आला.

कथा आहे, डेरेक(एडवर्ड नॉर्टन) आणि त्याचा लहान भाउ डॅनियल, डॅनी(एडवर्ड फर्लॉग) याची. दोघेही अत्यंत हुशार, पण विचारसरणी मात्र जहाल. त्यांचा अफ्रो-अमेरिकनांवर अत्यंत राग असतो, कारण त्यांच्या वडिलांचा खुन कुणी एका (काळ्या ड्रग माफिया) व्यक्तीने केला असतो. डेरेक निओ-नाझी गॅंगचा मेंबर बनतो जी कॅमेरॉन नावाच्या एका स्वार्थी माणसाने चालवलेली असते. मुळातच हुशार असलेला डेरेक वक्त्रुत्वाच्या जोरावर मर्जी संपादन करतो, यातच एका रात्री ३ अफ्रो-अमेरिकन तरुण डेरेकच्या घरासमोर कार चोरायच्या उद्देशाने येतात त्यांची चाहुल डॅनीला लागते व तो डेरेकला उठवतो, डेरेक दोघांना मारतो आणि क्रांतिकारकाच्या थाटात पोलिसांना शरण जातो. याप्रसंगामुळे तो गोर्‍या तरुणांमध्ये हिरो बनतो, नकळत डॅनीवर याचे संस्कार होतात आणि तो पण नाझी गॅंग मध्ये सामिल होतो.

डॅनीने लिहिलेला नाझी धर्जीना निबंध पाहुन त्याचे शिक्षक स्विन मुख्याध्यापकाकडुन परवानगी घेवुन त्याचे इतिहास शिक्षक बनतात आणि पहिली असाइन्मेन्ट म्हणुन डेरेक वर निबंध लिहुन आणायला सांगतात, या इतिहासाचे नाव ठेवतात ’अमेरिकन हिस्ट्री एक्स’.

३ वर्षाच्या कैदेतुन बाहेर आल्यावर डेरेक संपुर्ण बदललेला असतो. प्रत्येक क्षणी डॅनीला तो गॅंग पासुन दुर ठेवण्याचा प्रयत्न करतो, डेरेकच्या ह्या वागण्यामुळे गॅंगचे लोकं, त्याची प्रेयसी सर्व दुर जातात आणि डॅनी गोंधळुन जातो, त्याच्याशी वाद-विवाद करतो, तेंव्हा डेरेक तुरुंगातील अठवणी सांगतो जे त्याच्या बदलाला कारणीभुत असते.

तुरुंगात डेरेक गोर्‍या लोंकांच्या गॅंगचा मेंबर असतो, काही काळ व्यतित केल्यानंतर त्याला समजते की काही गोरी मंडळी ड्रग्स करिता मेक्सिकन काळ्या गॅंगसोबत व्यवहार करित आहेत, इतर गोर्‍या लोकांना सांगितल्यावर देखिल ते दाद देत नाहीत आणि यामुळे तो त्यांच्यापासुन दुर होतो, यातच त्याची गट्टी लेमंट या काळ्या कैद्यासोबत होते, या दोघांवर तुरुंगातिल चादरी सांभाळायचे काम असते. हे सर्व गोर्‍या कैद्यांना सहन होत नाही आणि अंघोळीच्या वेळेला डेरेकवर अतिप्रसंग करतात. या मानसिक धक्क्याने डेरेक खचतो, दवाखान्यात असताना शिक्षक स्विन येतात आणि डॅनीच्या विचारसरणी बद्दल डेरेककडे चिंता व्यक्त करतात. स्विन सांगतात की त्यांच्या तरुणपणी ते देखिल गोर्‍या लोकांचा असाच द्वेष करायचे पण कालांतराने कळलं की यात काहीच मिळत नाही. केवळ द्वेष करण्यापेक्षा आपलं जिवन चांगलं करण्यासाठी काहीतरी केलं पाहीजे. डेरेकवर याचा परिणाम होतो आणि तो या चक्रातुन बाहेर पडतो.

डेरेकचे तुरुंगातले अनुभव ऐकुन डॅनी गॅंग सोडण्याचा निर्णय घेतो...... चित्रपटाचा शेवट सकारात्मक नाही, आणि अनपेक्षीतही...त्यामुळे इथे नाही सांगत.

खास एडवर्ड नॉर्टन चा अभिनय पहाण्यासारखा आहे, आधिचा काळ्यांवरिल विखार आणि नंतरचा बदललेला डेरेक त्याने उत्तम साकारला आहे, या भुमिकेसाठी त्याला ऑस्कर नॉमिनेशन मिळालं होतं.
सिनेमा मला खुप आवडला, पाहिला पाहिजे असा...

4 comments:

  1. barech diwasapurvi pahilay ha cinema, mast aahe

    ReplyDelete
  2. सिनेमा छान तर आहेच पण एडवर्ड नॉर्टन लाजवाब!
    प्रतिक्रियेकरिता धन्यवाद!

    ReplyDelete
  3. चित्रपट पाहून कळवते, कसा आहे ते. ब्लॉगचं विजेट बनव लवकर. मला हवं आहे.

    ReplyDelete
  4. @ कांचन,
    जरुर पहा, नक्कीच आवडेल.
    विजेट तयार करण्यासाठी मला लोगो लागेल ना? माझ्याकडे लोगो नाहीये आणि कॉपीराइटेड लोगो नाही वापरायचाय...तुम्ही मदत करु शकाल ?

    ReplyDelete