Monday, 4 January 2010

ऍज गुड ऍज इट गेट्स (१९९७)


दिग्दर्शक - जेम्स ब्रुक्स
जॅक निकोल्सन, हेलेन हंट अभिनीत ऑस्कर विजेता ’ऍज गुड ऍज इट गेट्स’ बर्याच दिवसांपासुन पाहायचा होता, त्याचा योग काल आला. अपेक्षेप्रमाणे खुप छान देखिल आहे.
जॅक, हेलेन अभिनयात कमाल करतात. 
जॅक हा एक लेखक असतो, त्याला जर्मफोबिया असतो, तो फटकळ आणि हेकेखोर स्वभावाचा असल्यामुळे अपार्टमेंट मध्ये कुणाशीच त्याचे जमत नसते, तो रोज एकाच रेस्टारेंट मध्ये जेवायला जात असतो, जिथे हेलेन वेट्रेस म्हणुन काम करीत असते.  तिचा मुलगा नेहमी आजारी असल्यामुळे तिची ओढाताण चालु असते.  जॅकला तिची इतकी सवय असते कि मुलाच्या तब्येतीमुळे ती कामावर येवु शकत नाही तेव्हा जॅक तिच्या घरी जाउन तिच्या मुलाच्या खर्चाचं सर्व भार स्वत:वर घेतो. यात त्याचा स्वार्थ असा की मुलाची काळजी घेणारे कोणी असेत तर ती कामावर येवु शकेल आणि खाण्याची सोय होइल.  यातच त्याच्या फ्लॅट्च्या बाजुला असणार्या चित्रकाराकडे चोरी होते व यात त्याला चोर गंभीर चोप देतात, यामुळे त्याचा कुत्रा जॅकला सांभाळावा लागतो, त्यात त्या कुत्र्यासोबत याची गट्टी जमते, चित्रकाराच्या घटनेमुळे तो कफल्लक होतो आणि त्याला सुद्धा जॅक कडे रहावे लागते, मग दैवयोगाने या सर्वांच्या एकत्र ट्रिपमुळे ते एकमेकाच्या जवळ येतात आणि आयुष्याच्या कटू गोष्टी विसरुन नवीन आयुष्याला सामोरे जातात.
खुपच मस्त सिनेमा आहे, तेव्हा सोडु नका...

No comments:

Post a Comment