Saturday, 16 January 2010

ऑफिस स्पेस (१९९९)

ऑफिस स्पेस (१९९९)
दिग्दर्शक - माईक जज.
कुणाला आपल्या ऑफिसचे काम आवडते?, बहुतांशी नाइलाजाने पर्याय नसल्यामुळे सर्व रेटत असतात, याच थीम वर आणि आय.टी. इंडस्ट्रीवर २००० साली आलेल्या मंदी यावर आधारीत असणारा ’ऑफिस स्पेस’ नुकताच पहाण्यात आला.  मी ही त्या क्षेत्रात असल्यामुळे सिनेमाला रिलेट करु शकलो. विनोदी अंगाने कुठेही बोजड न होता मस्त मनोरंजन पुरवतो.

कथा आहे, इनिटेक या सॉफ्टवेअर कंपनीत काम करणार्या पीटर, समीर, माइकल आणि मिल्टन यांची.  पीटर ’वाय२के’ प्रॉब्लेम वर काम करणारा रि-प्रोग्रामर. कामामुळे. ताणामुळे, डिप्रेस्ड, आणि बोअर झालेला असतो, त्यातच त्याची प्रेयसीचे संबंध अजुन कुणाबरोबर असल्याचा त्याचा संशय असतो, त्यामुळे तो जिवनाला कंटाळतो. यातच सप्ताहांत त्याचा बॉस त्याला कामावर येण्यास सांगतो, पीटर अजुन चिडतो.  त्यांच्या कंपनीत कंसल्टंट म्हणुन ’दि बॉब्स’ या दोघांची नेमनुक होते, त्यांचे काम म्हणजे सर्व कर्मचा‍र्‍यांशी बोलने, कामाची पद्धत समजावुन घेणे आणि आवश्यक नसलेल्यांना बाहेरचा रस्ता दाखवणे. यासर्व त्रासामुळे आणि त्यातुन बाहेर पडण्यासाठी पीटर एका संमोहक तज्ञाची मदत घ्यायची ठरवितो.  संमोहन थेरेपी अर्ध्यात असताना  हृदय विकारामुळे तज्ञाचा मृत्यु होतो, आणि पीटर अर्धवट संमोहीत असताना तिथुन उठुन घरी जातो.

दुसर्या दिवशी पीटर अतिशय उशीरा पर्यंत झोपुन रहातो, त्याच्या बॉस आणि प्रेयसीचे अनेकदा कॉल येवुन जातात, पीटर सोयीस्कररित्या तिकडे दुर्लक्ष करतो.  त्याऐवजी त्याला आवडणार्‍या गोष्टी म्हणजे काहीही न करणे, आणि त्याला आवडणार्‍या जॉना या वेट्रेस बरोबर लंच ला जातो.  जॉनादेखिल तिच्या कामाला कंटाळलेली असते, कारण त्यांचे काही विचित्र नियम ज्यात तिला नको वाटणारे बिल्ले आपल्या युनिफॉर्मवर लावावे लागत असतात, ति सुद्धा बॉस बरोबर भांडुन नोकरी सोडते. 

पीटर सगळी भिती सोडुन ऑफिसमध्ये आपल्या मनाप्रमाणे वागायला सुरुवात करतो.  बॉसच्या आरक्षीत पार्कींगच्या जागी आपली कार लावतो, खिडकी दिसत नाही म्हणुन आपल्या क्युबिकलची एक भिंत तोडतो.  कामाऐवजी गेम्स वगैरे खेळत बसतो.  कंसल्टंट सोबतच्या मिटींग मध्ये तो आपली मते निर्भिडपणे मांडतो आणि आपल्याला वरिष्ठांकडुन जास्त मोटिवेशन नाही मिळाल्यामुळॆ जास्त काम नाही होवु शकत असे सांगतो, बहु-बॉस पद्धतीमुळे एकाच गोष्टीसाठी सर्वांकडुन कसे वेग-वेगळे शेरे कसे मिळतात आणि ते कामावर कसे परिणाम करतात हे सांगतो, यामुळे बॉब द्वयींवर आपली छाप पाडतो.  यामुळे त्याचे प्रमोशन होते आणि सरळमार्गी काम करणारे समीर आणि मायकल यांना पिंक स्लीप देण्यात येते.  मिल्टनची पगार बंद केली जाते आणि त्याचे क्युबिकल तळघरात हलविण्यात येते, यामुळे मिल्टन नाराज असतो आणि ऑफिस जाळुन टाकण्याबद्दल स्वत:शी पुटपुटतो.

पीटर, मायकल आणि समीर यामुळे चिडुन कंपनीवर बदला घॆण्याचे ठरवितात, आणि एक वायरस बनवुन सर्वर वर अपलोड करतात, जेणेकरुन प्रत्येक पैसे देवाण-घेवाणीत यांच्या खात्यात एक छोटी रक्कम जमा होत जाईल, जि कालांतराने खुप मोठी होइल व कुणाला संशयही येणार नाही.  पण काही दिवसात वायरस मधील अपुर्णांकाच्या चुकीमुळे खुप मोठी रक्कम जमा होते, जेणेकरुन कंपनीला संशय नक्कीच येणार असतो. काहीही न सुचुन ते रक्कम बॅंकेतुन काढुन बॉसच्या केबिन मध्ये रात्री एका पाकीटात घालुन ठेवतात. 

दुसर्या दिवशी पीटर असे ठरवितो की गुन्ह्याचा पुर्ण दोष स्वतः वर घ्यायचा, त्यासाठी तो ऑफिसला येतो आणि पहातो की संपुर्ण ऑफिसला आग लागलेली आहे, त्याचे सर्व प्रॉब्लेम सुटतात.  प्रत्यक्षात मिल्टनने बॉसवर राग म्हणुन ऑफिस पेटविलेले असते कारण बॉस त्याचा आवडता स्टेप्लर घेतो, तत्पुर्वी तो पीटरने ठेवलेले पैश्याचे पाकीट उचलतो, आणि हवाईत जाउन मजा करतो.  पीटर कंस्ट्रक्शन मध्ये आवडता जॉब करतो, आणि समीर, मायकल दुसर्या आय.टी. कंपनीत रुजु होतात.

आपल्या ऑफिसच्या काही खाणा-खुणा यात मिळतात का ते पहा.... :)

आय.एम.डी.बी. : http://www.imdb.com/title/tt0151804/

5 comments:

  1. चांगला चित्रपट वाटतोय. माझ्याकडे असूनही मी का बरं नाही पाहिला :-? आज नाहीतर उद्या पहातेच आणि कळवते, कसा वाटला ते.

    (वॉन्टेड नावाचा इंग्रजी मारधाडपट, मी केवळ ऍंजेलिना जोलीचं नाव वाचून पाहिला. खूप पश्चात्ताप झाला.)

    ReplyDelete
  2. जरुर पहा, मला तरी आवडला.
    वॉन्टेड मी सुद्धा पाहीला पण टिव्हीवर, मसाला अजुन विशेष काही नाही.
    जोलीचा ’चेंजलिंग’ पहा, खुप सुंदर सिनेमा आहे, अर्थात क्रेडीट गोज टु ’क्लिंट इस्ट्वुड’

    ReplyDelete
  3. आनंदः ऑफीस मध्ये फ्रस्ट्रेट्र (frustrate) झालास की काय ? ऑफीस स्पेस मी कितीतरी वेळा पाहिला असेन. त्यातल एकनएक कॅरॅक्टर अगदी तोंडपाठ आहेत. खुप मस्त आहे हा सिनेमा. छान वाटलं इथं वाचून.

    ReplyDelete
  4. @ अजय... हा...हा...हा...फ्रस्ट्रेट नाही रे, पण खरंच काही गोष्टी होत्या बरं त्यात ज्या माझ्या ऑफिस मध्ये सुद्धा घडतात, आता जास्त डिटेल्स मध्ये नाही जात, तुझ्यासारख्या सुज्ञास जास्त सांगने न लगे :)

    ReplyDelete
  5. चेंजलिंग पाहिला. अ‍ॅंजी अभिनय सुद्धा करते यावर विश्वास बसेना! काय काम केलंय तिनं! btw अजून ऑ.स्पे. पाहिलेला नाही. कारण काही नाही. डोक्यातून निघून गेलं इतकंच. काल द नटक्रॅकर पाहिला. छान आहे. पण सिनेमापेक्षा नटक्रॅकरचा बॅले जास्त छान वाटला होता.

    ReplyDelete