दिग्दर्शक - राम गोपाल वर्मा
’ब्रेकिंग न्युज’ आणि संसेशनल न्युज या आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग झाले आहेत, प्रत्येक जण न्युज चॅनल्सना दोष देतो पण दिवस आणि रात्र तेच पहातो, आपण त्यांच्या इतक्या आहारी गेलो आहोत की त्यांच्या डोळ्यांनी आज आपण वास्तव पाहत आहोत, जे की वास्तवाचा केवळ आभास आहे, राजकारणी आणि पैसेवाल्या लोकांनी पत्रकारीता विकत घेवुन आपल्या डोळ्यांपुढे मायावी जाळे निर्माण करुन ठेवले आहे, मुळ झापडं बंद राहतील याची पुरेपुर काळजी घेतलेली आहे. याच ज्ञात(?) विषयावर रामगोपाल वर्मांचा ’रण’ आधारीत आहे.
विजय मलिक (अमिताभ बच्चन) इंडीया २४*७ या व्रुत्तवाहिनीचे मालक जे पत्रकारीता करताना मुल्य सांभाळुन, मसाला न घालता केवळ घडेल ते लोकांपुढे मांडत असणारे, व्रुत्त हे मनोरंजानेचे साधन मानणार्या लोकांच्या मानसिकतेमुळे त्यांच्या वाहिनीची लोकप्रियता घसरु लागते. नुसत्या बातम्या सांगन्यापेक्षा प्रेजेंटेशन महत्वाचे मानणार्या अमरिश (मोहनिश बहल) याची वाहिनी मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असते.
त्यातच नविन मालिका काढण्याचे प्लॅन सुरु झाले की त्याच धर्तीवरचे कार्यक्रम आधीच अमरिशच्या वाहिनीवर रुजु होतात.
विजय मलिकचा मुलगा जय (सुदीप) वाहिनीच्या रेटींग वाढविण्यासाठी जे जे प्रयत्न करतो ते अमरिश हाणुन पाडतो. जयला हाताशी धरुन जयचा भावोजी अश्वीन (रजत कपुर), आणि विरोधी पक्षनेता मोहन पांडे (परेश रावळ) या वाहिनीला हाताशी धरुन सत्ताधारी पक्षावर आतंकवादाचा खोटा आळ घालतात, आणि मोहन पांडे आपल्या मुख्यमंत्री पदाची वाट मोकळी करुन घेतो. अश्वीन सुद्धा आपल्या पडीक प्रोजेक्ट्सला मंजुरी मिळेल म्हणुन यात सामिल असतो. यानंतर हळुहळु विजय पेक्षा जय वाहिनीचा कारभार सांभाळु लागतो. त्यांच्या वाहिनीवर मोहन पांडे बद्दल गुणगाण सुरु असते, नेमके हेच पुरब (रितेश) या नवपत्रकारला पचत नाही, ज्याचा विजय यांच्या सारख्या पत्रकारीतेवर विश्वास असतो.
याप्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे आणि ते शोधले पाहीजे म्हणुन तो सेल्फ रिसर्च सुरु करतो आणि मोहन पांडे, अश्विन, जय आणि अमरिश यांचा पर्दाफाश करतो.
तसं पाहायला गेलं तर कथेत काही नाविन्य नाही, पण मिडियाच्या काळ्याबाजुंवर आधी प्रकाश कुणी टाकण्याचा प्रयत्न केला नव्हता. राजकारणी मंडळी पत्रकारीतेला हाताशी धरुन न्युज तयार करतात आणि त्यांना पाहिजे तसे लोकांना नाचवतात. या सर्वात आपण तद्दन मुर्ख ठरतो, हे कळुन आपल्याला वळत नाही, हीच शोकांतिका.
अमिताभने विजय मलिक अतिशय प्रभाविपणे साकारला आहे, शेवटच्या स्पिच आणि काही वेळा केवळ देहबोलीने तो असामान्य अभिनयाचे दर्शन देतो, त्याच्या व्यक्तीरेखेला मात्र सिनेमाच्या मध्याला कोपर्यात ढकललेले आहे. परेश रावळ टिपिकल राजकारणी म्हणुन चोख भुमिका निभावतो. रितेश आणि सुदिप यांनी कमाल केली आहे, दोघांनीही आपल्या भुमिकांना न्याय दिला आहे, रजत कपुर छोट्या भुमिकेत आहे, त्याला लिमिटेड स्कोप आहे. मोहनिश बहल उत्तम. गुल पनाग आणि नितु चंद्राला काही विशेष वाव नाही. राजपाल यादव नेहेमीची ओवर ऍक्टींग करतो, पण आजकालचे न्युज रिडर तेच करत असल्यामुळे शोभुन दिसते... :)
रामगोपाल वर्माच्या सिनेमात नेहेमी असणारे वैशिष्ट्यपुर्ण कॅमेरा ऍंगल्स आणि ’गोविंदा’ टाईप पार्श्वसंगीत इथे सुद्धा आहे. त्याची कॅमेरास्टाईल मला पर्सनली आवडत असली तरी कधी कधी ती अती टेक्निकल होते आणि पात्रांच्या चेहर्यावरच्या भावाकडे लक्ष न जाता आपण (मी ?) त्यातच भारावुन जातो, कधी कधी ते इरिटेटिंग सुद्धा होते, स्पेशली जेंव्हा हातांनी घेतलेल्या शॉट्स च्या वेळेस. बाकी वेळेस मात्र खुप सही वाटते. पार्श्वसंगीत बरेचदा भयानक सिनेमा प्रमाणे वाजते आणि संवाद एकण्यात व्यत्यय आणते. बाकी तांत्रिक गोष्टी उत्तम आहेत.
शेवट परत थोडासा भरकटल्यासारखा... पण एकुण परिणाम ठीक. मला आवडला, टिकाकारांसाठी ’कमेंट्स’ सेक्शन आहे ;-)
आनंद, तुझा उत्तम आढावा वाचल्यामुळे आता नक्कीच ’रण ’पाहायला हवा.:)
ReplyDeleteमी रामूचा एके काळचा die-hard पंखा. पण आता त्याचे पिक्चर बघायचे म्हणजे धडकी भरते. (horror नसतील तरीही :)).. खूप मानसिक तयारी कारवाई लागते. पण तू रण बद्दल हे एवढं छान लिहिलेलं बघून नक्कीच बघावासा वाटतोय. मस्तच
ReplyDelete@ भानस,
ReplyDeleteचित्रपटाकडुन फार अपेक्षा ठेवुन पाहीला तर कदाचित निराशा हाती येवु शकते.
हा फुल-प्रुफ सिनेमा नाही आहे, पण मला आवडला. प्रतिक्रियेकरिता आभार.
@ हेरंब,
ब्लॉग वर स्वागत! मी सुद्धा त्याचा फॅनच होतो (किंबहुना आहे), म्हणुनच कदाचित जास्त चांगलं लिहिले गेलं असावं. :)
कठीण आहे. पहाय़ची इच्छाच संपली. रटाळ दिसतोय सिनेमा..
ReplyDeleteरामूच्या चित्रपटात भूत हा प्रकार नसेल, तर तो ब-यापैकी बघणेबल असतो. टेक्निकल ’पब्लिक’ ला कळत नाही, हे रामूला अजूनही समजत नाही बहुधा. चित्रपट पाहिला की काय नवीन केलंय हे कळेलच. धन्यवाद!
ReplyDelete@ महेंद्रजी,
ReplyDeleteब्लॉगवर स्वागत! पहिल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
@ कांचन (जी?),
रामु त्याच्या मनाला येईल ते बनवतो, कधी भट्टी जमते तर कधी फसते (अश्यात फक्त फसत आहे ;D)
वेळ मिळाला की बघेन पण चित्रपट मीमांसा छान लिहिली आहे.
ReplyDeleteधन्यवाद! अनुजाताई.
ReplyDeleteब्लॉगवर स्वागत!