Sunday, 11 April 2010

ट्रायांगल (२००९)

दिग्दर्शक - क्रिस्टोफर स्मिथ

कधी स्वत:चा सामना केला?  स्वत:ला समोर बघुन काय अवस्था होईल?  तुम्ही एका अनोळखी जागी जाता, पण आत कुठेतरी वाटतेय की आधी इथे भेट दिली आहे?  काही वेळापुर्वी घडलेले प्रसंग परत घडत आहेत?  आपल्या जीवनात असे काही विचित्र घडले तर आपली काय अवस्था होईल, ’ट्रायांगल’ हा सिनेमा अशीच एक गुंतागुंतीची कथा आहे...

जेस आपल्या आजारी मुलामुळे कायम दु:खी असते, ग्रेग तिचा मित्र तिला स्वत:च्या बोट वर समुद्र सफरीसाठी आमंत्रित करतो, जेणेकरुण एका दिवसाकरिता ती थोडी रिलॅक्स होऊ शकेल.  त्याच बोटीवर ग्रेगचे मित्र सॅली, डॉवनी, हिथर आणि त्याचा सहायक विक्टर सुध्दा सफरीला निघतात.

आरामात त्यांची सफर चालु असताना एकाएकी हवा स्थिर होते, त्यामुळे त्यांची बोट थांबते. अचानक दुरवर त्यांना घोंगावत येणारे वादळ दिसते, ग्रेग रेडीओ वरुन सागरी सहायक कक्षाला बोलतो पण वादळाचे कोणतेही निशान त्यांना त्यांची यंत्रे दाखवत नाहीत. काही क्षणातच त्या वादळाचा रोख त्यांच्याकडे वळतो त्याच्यापासुन वाचण्याचे त्यांचे प्रयत्न पुर्ण व्यर्थ जातात आणि सर्व पाण्यात पडुन बोट उलटते, काही क्षणातच वादळ निघुन जाउन स्वच्छ सुर्यप्रकाश पडतो, हिथर सोडुन सर्वांना ग्रेग पलटलेल्या बोटीवर ओढुन घेतो, हिथर मात्र कुठेच दिसत नाही.

हताश होऊन उपड्या बोटवर बसलेल्या सर्वांना आशेचा किरण म्हणुन एक महाकाय जहाज त्यांच्याकडे येताना दिसते, त्या जहाजावर ते चढतात.  आश्चर्यकारकरित्या त्या महाकाय जहाजावर कुणीच दिसत नाही, पण कुणीतरी मागावर आहे असा संशय जेसला नेहमी सतावत राहतो, ती जहाज आतुन पहाताना आधी ती इथे होती असे तिला नेहमी वाटत राहते.  अचानक त्यांच्यावर हल्ले व्हायला सुरुवात होते....

..... यापुढे पटकथेत काळाच्या मर्यादा तोडुन अनेक प्रसंग येतात आणि ते निस्तरता निस्तरता नायिकेबरोबर आपण सुध्दा थकुन जातो.  सिनेमा संपल्यावर सुध्दा आपल्याला ठळक कथा कळत नाही कोडे शोधण्याचा विचार सतत रहातो.  कधी कधी सगळं समजणे आवश्यक सुद्धा नसते ना? 

अत्यंत क्लिष्ट अशी कथा, पटकथा लिहिण्यासाठी आणि तितक्याच ताकदीने दिग्दर्शीत करण्यासाठी क्रिस्टोफर स्मिथचे अभिनंदन करायला हवे.  सिनेमाचा लुक चांगला आहे, प्रमुख जेसच्या भुमिकेत मेलिसा जॉर्ज या अभिनेत्रीने उत्तम कामगिरी केली आहे,  बाकी योग्य साथ देतात.  डोक्याला मनोरंजक खुराक द्यायचा असेल तर हा अनुभव घ्यायलाच हवा.

12 comments:

  1. अरे वाचतानाच माझा गोंधळ उडालाय. बघताना तर काय होईल. अशी क्लिष्ट कथा आणि पटकथा लिहिण्यासाठी खरंच जाम ताकदीचा माणूस पाहिजे.

    ReplyDelete
  2. phar kichkat ahe ha cinema, mi loop madhye gelo hoto shewati pahila kasa tari
    chan ahe, 4 mahinypurvi pahila hota

    ReplyDelete
  3. kupch kichkat aahe..mi pan pahilay...shevati forward kela ..

    ReplyDelete
  4. या वेगळ्या चित्रपटाची माहिती दिल्याबद्दल आभार. बघतोच आता हा चित्रपट !

    ReplyDelete
  5. चित्रपट अगदी सुरूवातीला थोडा संथ आहे पण जहाज दिसलं की वेगवान घटनाक्रमाला सुरूवात होते. चित्रपटाची कथा खरंच चांगली आहे पण ती अतिशय क्लिष्ट पद्धतीने पडद्यावर आणली आहे. पहाताना आपल्याही क्रम लक्षात ठेवणं कठीण जातं आणि जेव्हा क्रम लक्षात रहातो, तो पर्यंत चित्रपट संपून गेलेला असतो. चित्रपटातील थरार मात्र उत्कृष्ट आहे. चित्रपट संपला तरी मनावरचा गढूळपणा चटकन झटकून टाकता येत नाही.

    ReplyDelete
  6. हेरंब,बघताना मेंदुला गोड झिनझिन्या येतील ः)... तु पहाच..

    ReplyDelete
  7. खरंय अजय, किचकट पटकथा आहेच, पण थरार आपल्याला खिळवुन ठेवतो.

    ReplyDelete
  8. सागर, मला तर बघताना मजा आली, एकदाही पुढे सरकवण्याची इच्छा नाही झाली.

    ReplyDelete
  9. अभिजीत जरुर पहा, तुला नक्कीच आवडेल.

    ReplyDelete
  10. कांचन, क्रोनोलॉजी तोडनारे चित्रपट क्लिष्ट असतात आणि म्हणुनच जास्त मजा देतात. खरंय यातला थरार मजा आणतो.

    ReplyDelete
  11. wow!! वाचतानाच झकास वाटली कथा. आता या वीकएंडला नक्की पहाणार? आणि हे मात्र अगदी खरं आहे की बर्याचदा आपल्यालाही असं वाटच असतं की आत्ता घडलेलं याआधिही असंच घडलेलं आहे. म्हणूनच चित्रपट बघण्याची उत्सुकता जास्त वाढलीय.

    ReplyDelete
  12. शिल्पा ब्लॉगवर स्वागत, खरंय देजावू होतं खुपदा. हा सिनेमा पहा, आवडेल तुम्हाला...

    ReplyDelete