दिग्दर्शक - डेव्हिड मॅमेट
IMDB : http://www.imdb.com/title/tt0120176/
can you really trust anyone?
दिसतं तसं नसतं हेच खरं, कुणावर किती भरवसा ठेवायचा, हे ठरविणे खुप कठीण काम आहे.
'स्पॅनिश प्रिजनर'या नावावरून दुसर्या देशाच्या कायद्यात फसलेल्या नायकाची कथा असावी वाटते. प्रत्यक्षात हा लक्षवेधी थरारपट 'स्पॅनिश प्रिजनर' या फसवणुकीच्या प्रकाराचा वापर करतो.
'स्पॅनिश प्रिजनर' म्हणजे स्पेन मध्ये एक श्रीमंत माणसाला फसवून तुरूंगात डांबल्या गेला असल्याची अफवा एका सावजाला सांगायची. तो तिथुन सुटण्याचा प्रयत्न करत आहे, आणि त्यासाठी त्याला काही पैसे मोजावे लागणार आहेत, तर तात्पुरती जो मदत करेल त्याला श्रीमंत माणुस सुटल्यावर जबरदस्त बक्षीस देण्याचे लालूच.
इथे जास्त माहीती आहे. यात सावजाला संशय येऊ नये म्हणुन ही बातमी सांगणार्याला अत्यंत काळजीपुर्वक सावजाचा विश्वास संपादन करायचा असतो.
या सिनेमात सावज, जो रॉस ह्याने एक अशी प्रक्रिया तयार केली असती ज्यामुळे कंपन्यांचा करोडोंचा फायदा होणार असतो, अत्यंत मेहनतीने तयार केलेल्या या प्रक्रियेमुळे आणि त्याचा महत्वामुळे ती अतिशय सुरक्षीत जागी ठेवलेली असते. जो मात्र त्याच्या मानधनाबाबत संतुष्ट नसतो. वारंवार विचारूनही कंपनीचे मालक त्याला मानधनाविषयी जास्त काही सांगत नाही,केवळ योग्य वेळी योग्य मिळेल यावर बोळवण करीत असतात.
एका व्यावसायिक सहलीवर जो'ची ओळख अतिशय श्रीमंत उद्योगपती जिमी डेल बरोबर होते, जिमी सोबत ओळ्ख वाढवताना जिमी त्याला त्याच्या प्रक्रियेबद्दल कंपनी जास्त पैसे देणार नाही, आणि त्याने ओळखीच्या वकीलाचा सल्ला घ्यावा असे सांगतो, प्रक्रियेची मुळ प्रत सुद्धा सोबत आणायला सांगतो. दरम्यान कंपनीत नव्याने रुजू झालेली एक मुलगी सुसानशी जो'ची जवळीक वाढायला लागलेली असते, ती मात्र जिमीच्या वागण्यावर शंका घेत असते.
त्यातच जो'ला जिमी हा फसविणारा आहे असे कळते आणि तो एफबीआय एजंटला बोलतो, आणि ते जिमीला पकडण्यासाठी सापळा रचतात, पण जो ज्यांना बोलावतो आणि विश्वासाने प्रत त्यांकडे देतो ते एफबीआयचे एजंट नसून फसवेच असतात. त्यातच त्याला सहकार्याच्या खुनाच्या आरोपात अत्यंत शिफातीने गोवण्यात येते. तिथुन तो पळुन जातो व सुसानची मदत घेऊन जिमीचं रहस्य उघडायला आणि स्वतःला निष्पाप सिद्ध करायला जातो, त्यात तो यशस्वी होतो का, हा सिनेमाचा पुढचा भाग.
सिनेमा अतिशय उत्कंटावर्धक आहे, सुरुवातीच्या सत्रात थोडा संथ आहे, पण पहील्या २० मिनिटांनंतर मस्त वेग पकडतो. पटकथा अतिशय घट्ट विणली आहे आणि कुठेही सैल होत नाही. अगदी शेवटच्या मिनिटांपर्यंत पटकथेत वळणं, धक्के आहेत. कुठेही सिनेमा प्रेडिक्टेबल होत नाही. अभिनयात सर्वांनी कमाल केली आहे, नेहमी विनोदी भुमिकेत असणार्या स्टीव मार्टीनने सुद्धा गंभीर अभिनय चांगल्या रितीने केलाय.
चांगला थरारपट पाहण्याची इच्छा असेल तर पहावाच असा.
झक्क वाटतोय...
ReplyDeleteबघावा लागेल!
सही सही.. एकदम मस्त वाटतोय. तू काल म्हणाल्या म्हणाल्या डाउनलोड केलाय. वीकांतात बघतो.
ReplyDeleteथरारपट आमच्याकडे धावतात, :). पाहतेच लवकर.
ReplyDelete@ विद्याधर, हेरंब आणि श्रीताई,
ReplyDeleteनक्की पहा, तुम्हा सगळ्यांना आवडेलच.
Movie was full of hitchcock techniques but yet it wasn't copy of that.If you've observed Joe's process and its refusal was intelligently plotted mcguffin,which takes movie to an another perspective.But nice attempt to show corporate backstabbing.
ReplyDeleteYes Aniket. It resembles hitchcock techniques.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteवॉव, मस्तच रीव्ह्यू लिहीलाय.
ReplyDeleteपाहावाच लागेल आता.
जरूर.. आवडेल नक्कीच
ReplyDelete