Sunday, 1 May 2011

द नेक्स्ट थ्री डेज (२०१०)

दिग्दर्शक - पॉल हॅगिस
स्वभावाने अतिशय शांत, आणि अगदी साधी दिसणारी माणसं प्रतिकूल परिस्थितीत असामान्य आणि अनपेक्षीत कामं करून जातात.
स्वभावाने अतिशय शांत आणि कुटूंब वत्सल जॉनचं (रसेल क्रो) आयुष्य एका घटनेने अचानक बदलते.  त्याच्या बायकोला, लाराला (एलिझाबेथ बॅंक्स) तिच्या महिला बॉसच्या खुनाबद्दल दोषी ठरवून तुरूंगात टाकलं जातं, त्याच्या आधी तिचं बॉससोबत भांडण झालेलं असतं आणि तिच्या कपड्यांवर रक्ताचे डागही असतात.  एकही पुरावा तिच्या बाजुने नसल्याने तिची सुटका अशक्य असते.
त्याचा  मुलगाही हे स्विकारू शकत नाही, तो त्याच्या आईला भेटी दरम्यान बोलत नाही,  आपला मुलगा आईपासून दुरावतो आहे आणि पत्नी तुरुंगात त्रास भोगतेय हे जॉनला छळत असतं.  एकदा कॉलेजमध्ये शिकवताना जॉन मुलांना विचारतो 'निराशावादी जगण्यापेक्षा, स्वतःला खरं वाटणार्‍या जगात राहणं, अमानवीय आहे का?' ("If we choose to exist in our own reality, are we insane? And if we are, isn't that better than a life of despair?"). त्यातच बरेच प्रयत्न करूनही आणि मित्र असलेल्या त्याच्या वकीलाने जेंव्हा आशा सोडून देण्याचा सल्ला दिल्यानंतर, आपली पत्नी १००% निर्दोष आहे ह्या वर अत्यंत विश्वास असणारा जॉन तिला तुरुंगातून सोडवण्याचा कट करण्याच्या मागं लागतो.  त्यासाठी आधी तब्बल सातवेळा तुरूंगातून पळालेल्या डेमनची (लियाम निसॉन) मदत घेतो.  अतिशय मेहनत आणि अभ्यास करून तो लाराला पळवण्याचा अतिमहत्वकांक्षी प्लॅन तयार करतो. 
जालावरून साभार
फ्रेंच सिनेमा पॉर एल्ले (तिच्यासाठी काहीही  Anything for her) चा इंग्रजी रिमेक असलेला रसेल क्रो अभिनीत 'द लास्ट थ्री डेज' हा चांगला थ्रीलर सिनेमा आहे.  सुरूवात जरी संथ असली तरी सुटकेच्या प्लॅन पासून ते शेवटापर्यंत सिनेमा मस्त पकड घेतो.  रसेल क्रो अपेक्षेप्रमाणेच अप्रतिम अभिनय करतो, जॉनच्या व्यक्तीरेखेत प्राण ओतलाय त्याने.. बायकोवरचा गाढ विश्वास, नेहमी डोळ्यात, चेहर्‍यावर दिसणारा दृढ संकल्प, मुलासाठी होणारी ओढाताण त्याने अप्रतिम दाखवली आहे.  सिनेमा थोडा मोठा वाटतो, बाकी नक्की पाहण्यासारखा.

10 comments:

  1. रसेल क्रो आहे म्हणजे चांगला असेल असं नवराही म्हणतोय....आता कधी पाहातोय त्याची वाट पाहायची...:)

    ReplyDelete
  2. कथानक मला आवडलं होतं. फक्त एकच बाब खटकली - सातवेळा तुरूंगातून पळालेल्या व्यक्तीकडून टीप्स मिळालेल्या असोत वा नसोत, सामान्य माणूस पुरावे नष्ट करण्यात कुचराई करत नाही. इथे तर पोलिसांच्या हातात अक्षरश: घबाड सापडतं. बाकी कथानक मस्तच. सुरूवातीला सरळमार्गाने बदमाशांकडून मदत मिळवू पहाणारा जॉन नंतर कसा त्यांचीच भाषा त्यांना शिकवतो, हे छान दाखवलं आहे.

    ReplyDelete
  3. खरंय अपर्णा.. पटकथेतल्या त्रुटी अभिनयाने भरून काढणार्‍या दुर्मीळ अभिनेत्यांपैकी रसेल क्रो आहे... जमल्यास नक्की पहा...

    ReplyDelete
  4. होय कांचन... पटकथेत त्रुटी नक्कीच आहेत, तरीही पाहण्याजोगा वाटला मला सिनेमा...

    ReplyDelete
  5. अप्पा, छान लिहिलं आहेस..

    रसेल क्रो आणि थ्रिलर या भन्नाट कॉम्बोसाठी नक्की बघणार हा.

    ReplyDelete
  6. आप्पा छान रे ..... डालो टाकतो.

    ReplyDelete
  7. धन्स सपा.. वहिनी बघू देतील का? मी बायकोला माहेरी पाठवून सिनेमा पाहिला ;)

    ReplyDelete
  8. जरा पोस्टांची फ्रिक्वेन्सी वाढवा की भाऊ! हाही सिनेमा पाहूच आम्ही! :D

    ReplyDelete
  9. धन्स पंत... अहो सिनेमा पाहण्याची फ्रिक्वेंसी आधी वाढवली पाहिजे... ;)

    ReplyDelete