Sunday, 13 December 2009
ब्लड सिंपल (१९८५)
ब्लड सिंपल (१९८५)
दिग्दर्शक - जोएल कोएन, एथन कोएन
सध्या कोएन ब्रदर्स सिरिज पाहत आहे, त्यांचा दिग्दर्शकीय प्रवास सुरु झाला ’ब्लड सिंपल’ पासुन.
टेक्सास मध्ये ह्याचे कथानक घडते, ’मार्टी’ हा एक बार मालक, त्याच्या पत्नि ’ऍबी’चे आणि बार मॅनेजर ’रे’ यांचे अफ़ेअर असल्याची कुणकुण मार्टीला लागते, तो एका खाजगी गुप्तहेर ’लॉरेन’ला हायर करतो. सत्य कळाल्यावर तो लॉरेनला त्या दोघांना मारण्याची सुपारी देतो. लॉरेन त्यांना न मारता, त्यांच्या फ़ोटोमध्ये छेड्छाड करुन (खुनाचा देखावा तयार करुन) मार्टी कडुन पैसे घेतो, मार्टीचा खुन करुन, तिथे ऍबीची पिस्तुल टाकतो, जेनेकरुन खुन तिने केला असा देखावा तयार व्हावा. काही वेळानंतर ’रे’ येतो व मार्टीचा खुन झाला पाहुन आणि ’ऍबी’ ने केला समजुन तो प्रेताची विल्हेवाट लावतो.
लॉरेनला कळते की त्याच्या फ़ोटो मधील एक फ़ोटो नाहिये, आणि त्याचे सिगारेट लायटर सुद्धा बार मध्येच राहाते. तो बार मध्ये येतो, आणि तिथे ’ऍबी’ येते, लॉरेन लपुन बसतो. सेफ़ला असलेले डॅमेज पाहुन ’ऍबी’ला वाटते की हा सेफ़ रे नी तोडायचा प्रयत्न केला. ती घरी परत येते व याच्यामुळे रे आणि ऍबी मध्ये वादावादी होते, रे वर लॉरेन दुरुन हल्ला करतो आणि ऍबी आडोसा घेते, लॉरेन येतो आणि ऍबी त्याला मार्टी समजुन त्याचा खुन करते.
हिंसक वातावरणात जास्त वेळ वावरल्याने जी भित्री मानसीक अवस्था बनते त्याला ब्लड सिंपल म्हणतात. (विकीपीडीया http://en.wikipedia.org/wiki/Blood_Simple)
सिनेमाची पटकथा अत्यंत व्यवस्थीत विणली आहे, ताण कायम राहतो. समज, गैरसमज यातुन पात्र घडवले जातात, चित्रपट मात्र खिळवुन ठेवतो.
मला ७०-८० च्या दशकातला लूक खूप आवडतो. रिकमेंडेड.
Subscribe to:
Post Comments (Atom)
हा चित्रपट पाहिलेला वाटत नाही. पाहून कसा वाटला ते सांगते. लिहिलंय छान, त्यामुळे चित्रपट पहावासा वाटतोय.
ReplyDeleteकांचन, तुमच्या उत्तेजनाबद्दल धन्यवाद, माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठीची तुमची लाखमोलाची मदत मी कधी विसरणार नाही.
ReplyDeleteमलाही हा चित्रपट पाहिल्याचे आठवत नाही. उत्कंठावर्धक व रहस्यमयी चित्रपटांची मी चाहती आहे. तुमच्या लिखाणामुळे आता पाहावा लागेलच.:)
ReplyDeleteभाग्यश्रीजी प्रतीक्रीयेकारिता आभार...
ReplyDelete