रॉकेट सिंग - सेल्समन ऑफ़ द ईयर (२००९)
दिग्दर्शक - शिमीत अमीन.
शिमीत अमीन, जयदीप सहानी, यश राज बॅनर, आणि रणबीर कपुर...अजुन काय हवं.
अपेक्षेने गेलो होतो. पण काही अंशी निराशा हाती पडली.
हरप्रीत सिंग (रणबीर कपुर) काठा-काठावर पास होत कॉमर्स डिग्री पास करतो, आणि सेल्समनशिप करिअर म्हणुन निवडतो.
कम्प्युटर विकणार्या कंपनी मध्ये ट्रेनी सेल्समन म्हणुन रुजु होतो. अतिशय सरळमार्गी असल्यामुळे कोर्पोरेट जगातल्या राजकारणात हरप्रीत गोंधळु लागतो.
टार्गेट्स, लाचखोरी पाहुन त्याविरुद्ध आवाज उठावतो, पण त्यात स्वत:च फ़सतो, बॉस, स्टाफ़चा राग ओढवुन घेतो. मग मात्र त्यातुन मार्ग काढत ओफ़िसमधील काही गुणी लोकांना हाताशी धरुन स्वत:चा बिजनेस सेट करतो.
कथा सरळ साधी असली तरी ट्रीटमेंट मस्त आहे. सेल्स ओफ़िस, सेल्समन, बॉसेस, क्लायंट्स अतिशय व्यवस्थीत रंगवले आहेत.
सेल्स हेड सोबत केलेली पहिली क्लायंट भेट, बॉस सोबत केलेले इनडायरेक्ट संभाषण, असेम्ब्लर (डी. संतोष) सोबतचे सर्व सीन खुप छान आहेत.
इतक्या वेळ फ़ॉर्मात असणारा सिनेमा गोड होण्याच्या नादात शेवटी काहीसा प्रेडिक्टेबल होतो. काही अनाकलनीय सोपे मार्ग शोधल्या जातात आणि सुफ़ळ होतो.
इतक्या मोठ्या कंपनीचा मालक खुपच लवकर हार मानतो बुवा, त्यात काहीही जास्त कष्ट न घेता.
असो, बाकी अभिनयाच्या बाबतीत मात्र रणबीर केवळ अप्रतिम. अजुन काय सांगु, तुम्हीच अनुभवा. डी. संतोष, नवीन कौशीक, गौहर खान मस्त साथ देतात.
रोमॅन्स साईडलाईन्ड आहे, शाझान पद्मश्रीला जास्त काही वाव नहिये. आणि सुखद धक्का म्हणजे फ़ालतु गाण्यात वगैरे वेळ नाही घालवलाय. सर्वांना आवडेल का नाही, शंकाच आहे.
पण मला बर्याच प्रमाणात आवडला, शेवटचे १५-२० मिनीटे सोडुन....
अभिनेत्यांची नावं - रेडिफ़.कॉम साभार.
तुला टॅगलंय
ReplyDelete