Sunday 10 July 2011

द मॅटाडोर (२००५)

दिग्दर्शक - रिचर्ड शेफर्ड


दोन भिन्न प्रवृत्तीची माणसं, एक हिटमॅन..ज्युलियन नोबल( पिअर्स ब्रॉसनन) बेफिकरी वृत्तीचा.. घर.. बायको, मुलंबाळं नसणारा.. आयुष्यात नेहमी मौजमजा करणारा.. दुसरा डॅनी राईट (ग्रेग किन्नर) स्वभावाने शांत.. अगदी घरघुती.. नाकासमोर चालणारा.   योगायोगाने दोघांचीही भेट मेक्सिकोच्या एका बारमध्ये होते.  डॅनी नौकरीतील अपयशाने खचलेला असतो आणि एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टसाठी क्लायंट भेटीवर मेक्सिकोला आलेला असतो, तर ज्युलियन त्याच्या कामानिमित्त (असासिनेशन) तिथे आलेला असतो.  


सुरुवातीच्या अडखळ्यानंतर दोघं सोबत फिरू लागतात आणि त्यांच्यातली मैत्री वाढू लागते.  ज्युलियन हिटमॅन आहे हे डॅनीला पटत नाही पण मेक्सिकन बुल फाईटच्या सामन्यात ज्युलियन त्याला एक कट रचून दाखवतो,  डॅनी घाबरतो पण ज्युलियन तो कट पुर्णत्वास नेत नाही.   नंतर बोलताना ज्युलियन डॅनीला त्याच्या कामात मदत करण्यासाठी सांगतो, कारण अश्यात त्याच्या कामात चुका होऊ लागत असतात.  डॅनी एकदम घाबरतो आणि ज्युलियनला परत भेटत नाही.

चार वर्षानंतर डॅनीच्या घरी ख्रिसमसच्या वेळी अचानक ज्युलियन आगंतुकपणे येतो, त्याच्याशी त्याच्या बायकोशी आपुलकीने बोलून मर्जी संपादन करतो आणि परत एकदा डॅनीला त्याच्या कामात शेवटची मदत करण्यास सांगतो, आणि हे काम फत्ते झाल्यावर त्याच्या जीवाचा धोका पुर्ण नाहीसा होईल असं सांगतो.  डॅनी परत नकार देताच तो त्याला म्हणतो की डॅनी वर त्याचं एक ऋण आहे आणि ते परत करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. ते ऋण कोणतं आणि डॅनी त्याला मदत करतो का? हे चित्रपटात पाहणं मजेचं आहे.


ज्युलियनच्या भुमिकेत पिअर्स ब्रॉसनन अगदी भन्नाट आहे, डॅनी रंगवलेला ग्रेग किन्नर त्याच्या नेहमीच्याच टेलरमेड भुमिकेत आहे, पण सगळा सिनेमा पिअर्स ब्रॉसननने खाऊन टाकला आहे.  त्याला कॉमिक रोल मध्ये पहिल्यांदाच पाहिलंय आणि तो खूप आवडून जातो.  शेवटाच्या अर्ध्या तासात सिनेमा अत्त्युच्च पातळी गाठतो अन कथानक भरपूर वळणं घेतं.    पिअर्स ब्रॉसननच्या शानदार भुमिकेसाठी नक्की पाहावा असा...

9 comments:

  1. सहीच.. हा पण मस्तच वाटतोय.. डालो करतो आता.

    ReplyDelete
  2. पिअर्स ब्रॉसनन, माझा आवडता. त्यातून तू उत्कंठा वाढवलीस आता शोधून पाहायलाच हवा.

    आनंद, कालपासून प्रचंड वेळा ट्राय केला पण एकदाही कमेंट गेली नाही. :( कधीकधी ब्लॉगर फारच त्रास देते.

    ReplyDelete
  3. धन्स हेरंबा...

    पिअर्स ब्रॉसनन माझाही आवडता.. सर्वात फेव्हरेट बॉण्ड.. पण विनोदी भुमिकेत सुद्धा तितकाच परफेक्ट वाटला.. जबरदस्त ऍक्टींग केलीये त्याने... आभार श्रीताई...
    ब्लॉगर हल्ली खूप त्रास देतंय... :(

    ReplyDelete
  4. >> सर्वात फेव्हरेट बॉण्ड.

    +१

    ReplyDelete
  5. Actually I will prefer Sean Connery or Roger Moore myself than Brosnan.
    Haven't watched this one,is it really a must watch?

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. Aniket it's definitely a personal choice. My first bond movie is "Golden Eye".. now that's where he immediately created an impression and I started identifying Brosnan as Bond. That didn't changed even after I saw other star's bond movies :)

    I really liked this movie, If you like good comedies then I guess you can give it a try.

    Thanks for commenting.

    ReplyDelete
  8. मस्त लिहिलंयस रे..
    पण ते जरा 'ग्रेग किन्नर' चा उच्चार एकदा चेक कर रे!

    ReplyDelete
  9. मलाही ते वाटलंच.. तुला ठाऊक आहे का खरा उच्चार? धन्स..

    ReplyDelete