Wednesday, 11 November 2009

अजब प्रेम की गजब कहानी (२००९)


फार काही अपेक्षेने 'अजब प्रेम की गजब कहानी' पाहायला गेलो नव्हतो, तसा मी विनोदी चित्रपटाचा जास्त चाहता नाही, पण 'राजकुमार संतोषी' चा विनोदी सिनेमा आणि विशेष 'रणबीर कपूर' साठी गेलो... अपेक्षा नसल्यामुळे निराशा काही पदरी नाही पडली.. पण बरेचसे gags हसवून गेले... कतरिना वात आणते...बाकी कुणाला जास्त स्कोप नाही...

एकच गोष्ट पाहण्यासारखी ती म्हणजे 'रणबीर', त्याने अतिशय सुंदर काम केले आहे...विनोदी ते इमोशनल expressions लीलया करतो. जिम कॅरी सारखी अक्टिंग केलेला सिक़्वेन्स तर अतिशय उत्तम... बाकी बिनडोक विनोदाचे सगळे मसाले यात आहेत. गीत संगीत ठीक ठाक, पण चित्रपट पाहताना हास्यात गतिरोध प्रमाणे काम करतो. शेवट परत विनोदी सिनेमाची टिपिकल प्रियदर्शन स्टाईल... आणि एकदम अपेक्षित...नाविन्य काही नाही.. थोडक्यात या कहाणी मध्ये गजब काही शोधू नका....(रणबीर सोडून)

स्थळ - प्रसाद

4 comments:

  1. खरंच बुवा, रणबीरकडून इतक्या उत्कृष्ठ अभिनयाची बिलकूल अपेक्षा नव्हती.

    पण मिडीयाकृपेने (न्युज चॅनल्स) चित्रपटाच्या यशाचे श्रेय परत एकदा कॅटरीनाला मिळाले.

    ReplyDelete
  2. प्रतीक्रीयेकारिता धन्यवाद सौरभ. रणबीर कडून मला तरी अपेक्षा होत्या, (ऋषी कपूरचा मुलगा आहे नं)... :)

    ReplyDelete
  3. रणवीरने खरोखरंच सुंदर काम केलं आहे. मला हा चित्रपट श्री ४२० आणि अनाडीचं मिश्रण वाटला. चित्रपटाची कथा मला अजिबात आवडली नाही. हिरोला खूपच भोळाभाबडा दाखवण्याच्या नादात तो बिच्चारा दिसतो असं मला वाटलं.

    ReplyDelete