Saturday, 1 May 2010

लव, सेक्स और धोखा (२०१०)

दिग्दर्शक - दिबाकर बॅनर्जी

नावावरुन बिचकुन जाऊ नका. हे सिनेमाचं नाव जरी हिंदी वृत्तवाहीन्याच्या तृतीय दर्जीय कार्यक्रमाचं वाटत असलं तरी हा सिनेमा उथळ विषयावर आधारीत नाही आहे.
’खोसला का घोसला’ आणि ’ओय लक्की लक्की ओय’ सारखे उत्तम चित्रपट बनविणारे दिबाकर बॅनर्जी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत, यावरुन सिनेमा उथळ नसनार अशी खात्री होती आणि अपेक्षेप्रमाणे चित्रपट खुपंच चांगला निघाला.

साधारण चित्रपट पाहतान आपण कॅमेराच्या जागी असतो, पण कॅमेरा हा सिनेमाचा, त्याच्या कथेचा भाग असतो असे फार क्वचित पाहायला मिळते. हॉलीवूडमध्ये ’क्लोवरफिल्ड’, ’माय लिटील आय’, ’द ब्लेअर विच प्रोजेक्ट’, आणि ’पॅरानॉर्मल अक्टीवीटी’ सारखे प्रयत्न वारंवार झालेले आहेत. माझ्या पाहण्यातला हिंदीतला हा पहीलाच प्रयत्न, आणि अगदी कौतुकास्पद असा.

या चित्रपटात तीन कथा कॅमेराच्या साथीनं आपल्याला दिसतात, पहिली ’लव’ प्रेमाची गोष्ट, एक तरुण दिग्दर्शक ’चोप्रा’ पद्धतीने भारावलेला चित्रपट बनवत असतो, त्याच्या कॅमेराने हा भाग आपल्याला दिसतो. दुसरी कथी , ’सेक्स’, एका छोट्याश्या मॉलमधील क्लोज सर्कीट कॅमेरांतर्फे दिसते आणि तिसरी, ’धोखा’, ही कास्टींग काऊच आणि मिडीयाच्या कॅमेरातुन दिसते.

तीनही कथांमध्ये कुठे ना कुठे इतर कथांचा संदर्भ येतो पण त्याचा कथेवर काहीही परिणाम नाहीये, तीनही स्वतंत्र म्हणाव्या अश्या कथा. सुरुवातीला खेळीमेळीत जाण्यार्‍या, हलक्या फुलक्या प्रसंगाच्या, प्रासंगी विनोद वापरणार्‍या, पण शेवटाकडे अतिशय गंभीर होत जाणार्‍या अश्या मांडल्या आहेत, यामुळे आपल्यावर परिणाम मात्र खुप खोलवर होतो.

एकही पात्र ओळखिच्या चेहर्‍यांनी न केल्या मुळे आणि सर्वांनी अतिशय खरा अभिनय केल्यामुळे हा चित्रपट वाटतच नाही, वास्तवातल्याच काही घटना पाहत असल्यासारखे वाटते हे चित्रपटाचे प्रमुख यश, काही सिन्स तर अगदी अंगावर येतात. पटकथा अतिशय घट्ट आहे, कुठेच ताबा सुटत नाही. स्टिंग ऑपरेशन्स, हॅण्डहेल्ड कॅमेरा असल्यामुळे कॅमेरा सतत हालतो, पडतो, कधी कधी काहीही दिसत नाही, गरगर फिरतो वगैरे पण ह्याच सगळ्या गोष्टी त्याला त्याचा परिणाम गाठुन देतात.

बॉलीवूडसाठी असा प्रामाणिक आणि वेगळा प्रयत्न केल्याबद्दक दिवाकर बॅनर्जींचे अभिनंदन करायलाच हवे. चकचकीत करमणुकची अपेक्षा केली तर निराशा येईल, आणि अर्थातच नावामुळे चित्रपटात ते पहायला मिळेल अशी अपेक्षा एकदमच फोल आहे.

22 comments:

  1. बघितला आहे मी एल्सडी. एक उत्तम प्रयत्‍न आहे. खूपजण बोल्ड सीन असतील या विचाराने थियेटर्सकडे वळली होती पण त्यांच्या हाती निराशाच आली...असो मी बघितला आवडला..दिबाकर बॅनर्जीच्या आधीच्या सिनेमातून त्याने स्व:ताच एक स्टेटस निर्माण केलाय..’खोसला का घोसला’ आणि ’ओय लक्की लक्की ओय’ दोन्ही आवडलेले चित्रपट...अप्रतिम

    ReplyDelete
  2. अरे आजच दुपारी पाहिला हा चित्रपट. अगदी ओरिजिनल दिग्दर्शका कडून आलेला ओरिजिनल चित्रपट.
    खरच हा त्याचा नवीन प्रयत्न अप्रतिम. नावाजलेले कलाकार आणि अगदी भव्य दिव्यता नसताना हि
    मस्त बनवलाय चित्रपट.

    ReplyDelete
  3. सुहास, दिबाकर बॅनर्जीने अपेक्षा तर खुप वाढविल्यात आता. LSD ला धरुन त्याचे तीनही चित्रपट मला खुप आवडले.

    ReplyDelete
  4. सचिन, चित्रपट ओरिजिनल आहे का नाही माहित नाही, पण कॅमेराच्या माध्यमातुन अनेक चित्रपट हॉलीवूड मध्ये आहेत. पण बॉलीवूडच्या मानाने स्तुत्य प्रयत्न.

    ReplyDelete
  5. सहीच. त्या भयानक नावामुळे मी आधी गंडलो होतो. पण नंतर जेव्हा कळलं की 'द ब्लेअर विच प्रोजेक्ट' सारखा आहे तेव्हा न बघितल्याबद्दल हळहळ वाटली.. :(

    ’खोसला का घोसला’ मला तुफ्फान आवडला होता पण ’ओय लक्की लक्की ओय’ अजिबात नाही.

    ReplyDelete
  6. हो, नावावरुन मलाही विचीत्र वाटलं होतं, कुठला तरी "बी" ग्रेड सिनेमा वाटला होता. पण दिबाकर बॅनर्जी नाव ऐकताच हा सिनेमा पाहीला आणि चांगला सिनेमा पाहिल्याचं समाधान लाभलं... खोसला का घोसला सही आहेच पण 'ओय लक्की, लक्की ओय' सुद्धा खुप छान सिनेमा होता....

    ReplyDelete
  7. baghayla pahije.. tase pepar madhye vagaire wachaley aani aata he dekhil wachale.. kevhapasun wel kadhun baghu mhantey!

    ReplyDelete
  8. मेघा ब्लॉगवर स्वागत, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
    तूला सिनेमा आवडेल अशी अपेक्षा आहे.

    ReplyDelete
  9. बघायचा आहे रे केव्हाचा...बर्‍याच जणांनी तारीफ केलीय ह्याची. आता तूही म्हणतोयस म्हटल्यावर बघावाच लागेल. लागतो शोधकार्याला.

    ReplyDelete
  10. खोसला का घोसला कितीतरी वेळा पाहिलाय रे अगदी मनापासून...आणि दरवेळेस आवडतो. त्यामूळे हा ही पहावा असे वाटतेय आता... खरं तर नावामुळे बिचकून होते ईतके दिवस :) आता लागेलच कुठल्या तरी च्यानलावर तेव्हा मात्र पाहीन. :)

    ReplyDelete
  11. विद्याधर, नक्कीच पहा, आवडेल तुला.

    ReplyDelete
  12. तन्वी, प्रतिक्रियेकरीता आभार.

    ReplyDelete
  13. माहीतीबद्दल् धन्यवाद. नावावरुन फारच टुकार फालतु सिनेमा असेल असे वाटुन पाहीला नव्हता, पण हे परीक्षण वाचुन आता पाहीन म्हणतो :-)

    अनिकेत

    ReplyDelete
  14. अनिकेत ब्लॉगवर स्वागत. नावावरुन मी सुद्धा फसलो होतो, पण दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी आहे कळल्यावर लगेचच पाहीला.

    ReplyDelete
  15. अरेरे...नावावरून सी ग्रेड वाटला होता अगदी, पण पहायला हवा होता नाही? मला तर वाटलं होतं ते इमोशनल अत्याचार छाप काहीतरी असेल. :(

    ReplyDelete
  16. शिनु, बरोबरंय...
    नावात काय आहे हे म्हणने परवडनारे नाही सिनेमा इंडस्ट्रीला... ;-)

    ReplyDelete
  17. For me best part was direction,because whenever you're handling different stories there is big chance of loosing grip of the movie,causing a complete mess!& Dibakar really did extremly good job keeping it in control.A really refreshing movie after long time.

    ReplyDelete
  18. अनिकेत तुझ्या प्रतिक्रियेसोबत १००% सहमत...

    ReplyDelete
  19. कालच पाहिला... टाईमपास चांगला झाला... पिक्चर बघुन डोक्याच भजं नाही होत.

    ReplyDelete
  20. सौरभ, प्रतिक्रियेकरिता धन्यवाद!

    ReplyDelete
  21. नावावरून मी पण बिचकलो होतो व या वाटेला गेलो नव्हतो! एकटा असतो तर गेलो असतो नक्की. पण सहकुटुंब धाडस झालं नाही. आता ह्या तुझ्या पोस्टचा दाखला देऊन बघतो.

    ReplyDelete
  22. ब्लॉगवर स्वागत सिताराम.
    सिनेमाचा विषय जरी प्रौढ असला तरी हाताळणी भान ठेऊन केलेली आहे.

    प्रतिक्रियेकरीता धन्यवाद.

    ReplyDelete