Sunday, 23 May 2010

काईट्स (२०१०)

दिग्दर्शक - अनुराग बसू

राकेश रोशनचा सिनेमा, ऋतिक, जोडीला मेक्सिकन हॉटी बार्बरा मोरी आणि जोडीला सुमधुर संगीत या सर्व गोष्टींमुळे अत्युच्य अपेक्षा असलेला काईट्स सिनेमा.
मी स्वत: सिनेमाला जाताना फारशा अपेक्षेने गेलो नाही, कारण राकेश रोशनचे सिनेमे हिंदी सिनेमांच्या टिपिकलनेस मध्येच जास्त रमतात, त्यामुळे वेगळे काही असण्याची अपेक्षा नव्हतीच.
सिनेमाची नायीका मेक्सिकन आहे आणि जाहीराती पाहुन सिनेमा वेगळा असावा असे वाटले, पण असे काहीही नाही, सिनेमा एक नेहमीचीच प्रेमकथा आहे.

कथा म्हणजे जे(हो, हे ऋतिकचे नाव आहे) हा अमेरिकेतल्या लासव्हेगास या शहरात डान्सर असतो, त्याच बरोबर त्याच्या एका मित्राबरोबर अमेरिकेत ज्या मुलींना ग्रिनकार्ड हवे आहे, त्यांच्यासोबत लग्न करुन त्यांना कार्ड मिळवुन देऊन दलाली मिळवणारा असतो.  श्रीमंत होण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असणारा जे, प्रसिद्ध कसिनोच्या मालकाच्या मुलीला (कंगना) पटवितो व तिच्यासोबत लग्नाचा घाट घालतो, याच वेळी टोनी ह्या कंगनाच्या भावासोबत नताशा (बार्बरा मोरी) ही सुद्धा जवळीक साधते. पण जे चे नताशावर आधीच प्रेम असते( तिला आगोदर त्याने ग्रीनकार्ड मिळवुन दिलेले असते), मग ’जे’ला प्रेमाचा साक्षात्कार होतो आणि तो टोनीशी वैर पत्करुन नताशाचे प्रेम मिळविण्याकरीता सर्वांशी लढतो, त्यात तो यशस्वी होतो का नाही, हा पुढचा सिनेमा.

ही कथा नविन नक्कीच नाही, बरं कथानकात काही टप्पे, वळणं नाहीत, एकदम सरधोपटपणे कथा समोर सरकते.  मात्र सरधोपट कथानकाला (किंबहुना पटकथेला) थोडाबहुत सावरतो तो सिनेमाचा लूक.
एकदम स्टाईलाइज्ड लूक दिला आहे सिनेमाला.  सरळ कथानक न दाखवता फ्लॅशबॅक अधुन मधुन वापरुन, थोडी उत्सुकता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे पण कथानक त्यावर सराईतपणे बोळा फिरवितो.  साहसदृष्ये अप्रतिम असली तरी कुठेतरी ते खोटं आहे ही भावना राहतेच.  पावसात गुंडांना स्टेनगनने ऋतिक ज्यापद्धतीने मारतो (तो दुसरा विचार करत आहे, आणि तो सिनेमाचा हिरो आहे हे त्याला माहित असल्यागत १०-१२ मुळ गॅन्गस्टर लोकांचे नेम चुकतात, तो निधड्या छातीने सगळ्यांवर चाल करून जातो आणि त्याला साधं खरचटत देखील नाही) ते नक्कीच पटत नाही.  परत फ्लॅशबॅकमुळे पाठलाग सुरु असताना मध्येच प्रेमकथेमुळे चित्रपट स्लो होतो, त्यात परत गाणी येतात. गाणी जरी बर्‍यापैकी असली आणि त्यांचे चित्रिकरण उत्तम असले तरी तिथे ती जागा चुकल्यासारखी वाटतात.

या कथेकडे पाहता, बार्बरा मोरी ऐवजी एखादी हिन्दी नायिका असली असती तर काहीच फरक पडला नसता, मग विदेशी नायिकेची गरज पटत नाही, असे असले तरी बार्बरा मोरी हिचं काम मात्र सुंदर झाले आहे.  ती दिसते सुद्धा छान, अपवाद काही सिनचा जिथे ती थोडी ओव्हरएजेड वाटते.  ऋतिक आणि तिची जोडी उत्तम वाटली आहे, दोघांना एकत्र पाहणे ही एक ट्रीट आहे.  अपेक्षेप्रमाणेच ऋतिक सिनेमाचा श्वास आहे आणि तो त्याप्रमाणे जबरदस्त अदाकारी दाखवितो.  एक विशेष गोष्ट म्हणजे केवळ हिंदी सिनेमा आहे म्हणुन बार्बराच्या तोंडी टिपिकल (स्पॅनिश) हिन्दी संवाद नाही आहेत, तिला तिच्या स्पॅनिश ऎसेंट मध्ये बोलायला वाव दिला आहे.  खाली इंग्रजी सबटायटल्स आहेत ज्याचा थोडा प्रतिकुल परिणाम होऊ शकतो, पण सिनेमात विदेशी लोकं बोलतात तश्या कंटाळवाण्या हिन्दी पासुन आपण वाचतो.  पण यात देखील एक मेख आहेच, प्रत्येक स्पॅनिश संवादाला सबटायट्ल्स न देता मर्जीप्रमाणे काही संवादांना ते काटले आहेत, त्याचंही कारण आहे, जे संवाद नायकाला नाही समजले ते आपल्याला देखिल समजू नये, पण हा प्रकार वात आणतो, मोरी बोलताना दरवेळेस आपले लक्ष सबटायट्ल्स कडे जात असल्यामुळे आणि क्वचित ते दिले नसल्यामुळे थोडा अपेक्षाभंग होतो.

कंगना आणि कबिर बेदी सारख्या कलाकारांना अक्षरश: वाया घातले आहे.  प्रमुख खलनायक निक ब्रॉउन अक्रस्ताळी भुमिका तितक्याच अक्रस्ताळेपणाने निभावतो.  बाकी सहकलाकारांचा अभिनयसुद्धा जाणविण्या इतपत कच्चा वाटतो.   एकुणात अपेक्षाभंग करणारा अनुभव.

22 comments:

  1. माझा भाउ गेला होता आता दुपारी, तो तर हृतिकचा डाइ हार्ट फॅन, मला सनागतो तू जाच मी टिकिट काढतो तुझ..पण मी आधीच नाही ठरवला होता..असो बघू आता सीडी आली की..तोपर्यंत तुझा रिव्यू वाचून मनाला समजावेन :)

    ReplyDelete
  2. सुहास, ऋतिकचा मी डायहार्ड फॅन नसलो तरी मला तो, त्याचा अभिनय बर्‍यापैकी आवडतो. पण हा सिनेमा त्याच्या कर्तुत्वावर बॉळा फिरवितो. इतक्या झटपट प्रतिक्रियेकरीता धन्यवाद.

    ReplyDelete
  3. मी तर लगेच बझ्झ टाकला होता पतंग फाटका आहे...पण हृतिक जबरदस्त आहे...अन मोरी काही विशेष नाही वाटली ..असो

    ReplyDelete
  4. आनंद, एकदम सही लिहिलंस..

    मला पण असेच रिव्ह्यूज कळले की 'कटी पतंग पण हृतिक अप्रतिम'. मीही हृतिकचा डायहार्ड नाही पण ब-यापैकी मोठा पंखा आहे.. त्यामुळे आता डीव्हीडी मिळवणं क्रमप्राप्त आहे !!

    ReplyDelete
  5. मी हा पिक्चर पाहणार नव्हतो पण मित्र तिकिट काढतो म्हणटल्यावर पहिला. असे वाटत होते की बिच्याऱ्या एकट्या ऋतिकलाच ह्या पिक्चर चे पडले होते कारन तोच लै इमानदारिने एक्टिंग करत होता. नेहमीचीच स्टोरी फक्त विदेशी हिरोइन बास.आणि हो ऋतिक ची साइड एकदम परफेक्ट आहे कारन तो जेव्हा बार्बरा वर प्रेम करतो (म्हणजे मुव्ही मधे) तेव्हा असे वाटते, हा अत्ता खरच तिच्या कड़े आकर्षित झालाय, अत्ता तो खरच तिच्या प्रेमात पडलाय, अत्ता तिच्या साठी जिव देण्यासाठी तयार झालाय वगेरे वगेरे....पण बार्बरा बद्दल तसे कही वाटतच नव्हते पण एंड ला थोड़े कष्ट घेतली तिने तसे दाखवण्याचे आणि कंगना ला जो एकदा ऋतिक सोडून जोतो..परत तिचे कोण टेंशन घेतले नहीं, ना ऋतिकने , ना अनुराग बसुने, ना राकेश रोशन ने..खरे तर तिच्यात खुप पोटेन्शिअल आहे पण विचार कोण करतोय सर्वे लागलेत बार्बरा च्या मागे. असो.
    शेवट जरी वेगळा असला तरी कही ख़ास नाही.बाकी हे दिल्ली चे पब्लिक फारच इमोशनल आहे, पिक्चर संपल्यावर दोन मिनिट शांतता होती थिअटर मधे. म्हंटले रडण्याचे हुंदके ऐकाला येण्याचा अगोदर सटका येथून.

    ReplyDelete
  6. हो सागर, मी बघीतला तुझा बझ पण सिनेमा पाहिल्यानंतर, त्यामुळे काही इलाज नव्हता ;-)

    ReplyDelete
  7. हो हेरंब, यु कॅन सेफली इग्नोर धिस. ;-)

    ReplyDelete
  8. ब्लॉगवर स्वागत सुशील. खरंय, ऋतिकने खुप मन लाऊन काम केलं आहे. पोस्ट मध्ये आधीच लिहिल्याप्रमाणे विदेशी नायिकेची गरज पटत नाही, आणि इतक्या छोट्या रोलसाठी कंगनाची गरज नव्हती, कुणीही चालली असती. शेवटच्या सिनबद्दल, त्या प्रसंगाला लोकांना हसु आलं इथं हैदराबादला (मला सुद्धा), हाच चित्रपट फसल्याची मोठी साक्ष होता.

    प्रतिक्रियेकरीता धन्यवाद.

    ReplyDelete
  9. my friend had put a hilarious review about this movie >> "Kites" - Its better to fly it on the terrace than to watch it in theatre... such a hyped movie...
    सध्यातरी हा चित्रपट पहाण्याचा विचार नाही.

    ReplyDelete
  10. सौरभ,
    Agreed to some extent with your friend :-)
    वेळ असेल तर वेळ घालावा.

    धन्यवाद!

    ReplyDelete
  11. काईट्स...
    मॅग्नम ओपस म्हटलं की मला नेहमीच टेन्शन येतं...कारण भरपूर पैश्यांचा(पक्षी - रुपयांचा) चुराडा होणार आणि हाताला किती लागणार ते कुणालाच ठाऊक नाही...टेन्शन मला येण्याचं कारण की एवढ्या पैश्यांत बरेच चांगले सिनेमे बनू शकतात...
    इथेही तेच झाल्याचं दिसतंय....पण हरकत नाही....
    गावाला जाऊन बघेन..मस्त २५ रुपयांत बाल्कनी...पुन्हा शिट्ट्या, आरोळ्या फ्री!

    ReplyDelete
  12. हाहा प्रॉफेटा..
    मस्त २५ रुपयांत बाल्कनी...पुन्हा शिट्ट्या, आरोळ्या फ्री!

    एकदम मस्त!

    ReplyDelete
  13. आनंद, हा सिनेमा पाहावा असे मनात होते पण आता तुझा व इतरही काही जणांचे मत ऐकल्यावर केवळ हृतिकसाठीच पाहायचा.

    ReplyDelete
  14. आनंद,
    मला खूप इच्छा होती हा सिनेमा पहाण्याची पण सगळे रिव्ह्युज ऐकुन थेटरला पहायला जाणार नाही असे ठरवले आहे. घरी बघेन सिडी/डीव्हीडी वर.
    सोनाली केळकर

    ReplyDelete
  15. Anurag Basu again proved that he really can't take movie to excellence.But his efforts at climax was really appriciable,atleast not typical Bolly movies.Talking about other sectors Hrithik is soul of the movie.
    I think Barbara Mori was accurate casting because that particular accent in language is very important.Again,most ridiculous thing about movie-Kangana--She is one of the worst actress in this industry

    ReplyDelete
  16. पतंग कटी. सिनेमा चकाचक असणार ते प्रोमो वरून दिसतच होते. मला फक्त दिग्दर्शक - अनुराग बसू आहे म्हणून पाह्यचा होता.
    असो आता सीडी साठी वाट पाहतो.
    नाहीतर २५ रु बाल्कनी.

    ReplyDelete
  17. भाग्यश्रीताई, हो गं, सिनेमा केवळ ऋतिकसाठी बघण्यासारखा आहे.

    ReplyDelete
  18. सोनाली ब्लॉगवर स्वागत.
    होय, थेटरात जाऊन अपेक्षाभंग होईल हे निश्चित.

    प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

    ReplyDelete
  19. Yes Aniket, definitely. This is the second time I've seen anurag letting film away from perfection.
    Barbara was accurate choice, but if you see the story line on whole there is no need of a special 'FOREIGN' actress there, a normal Indian cast would have done the justice.
    Well, I don't think kangana is worst actress, yes but in this film she doesn't have scope to show her strengths.

    Thanks for your comments.

    ReplyDelete
  20. होय सचिन.. अतिशय सामान्य स्टोरीलाईन मुळे पतंग खरंच कटी.

    ReplyDelete
  21. See Barbara's casting was like killing two birds with same stone;it gave movie an international appeal plus as demand of script her culture and accent of language was different.

    ReplyDelete
  22. Definitely Aniket, that was benefit to fetch initial crowd, but with that expectations also increased. With very simple and beaten to death storyline film could not stand on it's own feet.

    ReplyDelete