दिग्दर्शक - विजय लालवानी.
दिल चाहता है, लक्ष्य, डॉन, हनिमुन ट्रॅवल्स प्रा.लि., रॉक ऑन, आणि लक बाय चान्स असे जवळपास सुंदर सिनेमा देणार्या एक्सेल एंटरटेन्मेंटचा या वर्षीचा सिनेमा 'कार्तिक कॉलींग कार्तिक' त्याच्या प्रोमोजवरुन एक चांगला थ्रीलर असल्याची साक्ष देत होता. कुणाला एक फोन येतो, त्यात बोलणार्याचा आवाज अगदी तसाच असतो, त्याला आपली सगळी रहस्ये, गुप्त माहिती माहित असते, थोडक्यात आपल्याला आपणच कॉल करतोय ही सुंदर कल्पना आहे एका थ्रीलरपटाची.
'कार्तिक कॉलींग कार्तिक' मध्ये कार्तिक (फरहान अख्तर) अतिशय साधा, नाकासमोर चालणारा असतो. चांगुलपणामुळे जास्तीची कामे ओढुन घेणे, काम करूनही बॉसचा ओरडा खाणे, कुणी मित्र नसने, ऑफिसात काडीचीही किंमत नसने, घरमालकाने सतावणे अश्या असंख्य समस्यांनी ग्रस्त असतो. यातच त्याला एक नेहमी स्वप्न पडत असते ज्यात त्याचा त्रास देणारा भाऊ विहिरीत पडुन मरतो. या मृत्यु साठी कार्तिक स्वतःला दोषी समजत असतो. यासाठी तो मानसोपचार तज्ञाची मदत सुद्धा घेत असतो.
एकदा रात्रभर जागुन काम करुन देखील बॉस कार्तिकला फोनवर खुप सुनावतो, आणि त्याला नोकरीवरुन कमी करतो. रागाच्या भरात कार्तिक फोन तोडतो आणि राग शांत झाल्यावर नविन फोन बसवतो.
दुसर्या दिवशी सकाळी एका फोन कॉल मुळे त्याची झोपमोड होते, कॉल उचलल्यावर पलीकडुन कार्तिक म्हणजे त्याचा स्वतःचाच कॉल असल्याचे त्याला कळते. पहिल्याप्रथम त्याला हे सर्व खोटं; एक विनोद वाटतो. पण फोन करणारा अशी काही सिक्रेट्स सांगतो जी केवळ कार्तिकलाच माहित असतात. त्या कॉलरचा आवाज देखील कार्तिक सारखाच असतो.
तो कॉलर कार्तिकला त्याच्या सर्व पेचप्रसंगातुन सोडवितो. त्याला जशास तसे वागायला शिकवितो. त्याचं प्रेम मिळवुन देतो, पण त्याबरोबर एक अट देखिल ठेवतो, की हा कॉल त्याला येतो हे कुणाला सांगायचं नाही.
कार्तिक प्रेमापुढे झुकुन प्रेयसीला हे सगळं सांगतो आणि मग तो कॉलर कार्तिकलाच संपवायला निघतो.
हा कॉलर कोण? आणि पुढे कार्तिकचे काय होते हा सिनेमाचा उत्तरार्ध.
सिनेमा एक उत्तम थरारपट आहे. शेवटपर्यंत आपल्याला खिळवुन ठेवतो. सिनेमाच्या डार्क फ्रेम्स रहस्यात गुढतेची भर टाकतात. मात्र थरारपटाच्या उत्सुकतेत अनावश्यक गाणी (ऐकायला बरी असुन) आणि थोडं लांबविलेले प्रेमप्रकरण व्यत्यय आणते. पण सिनेमा तगतो तो फरहान अख्तरच्या अतिशय प्रामाणिक अभिनयावर. सरळ साधा कार्तिक त्याने उत्तम रंगविला आहे, घाबरणारा कार्तिक आणि नंतर आत्मविश्वासाने वागणारा कार्तिक त्यांने व्यवस्थित रंगविला आहे.
पण त्याचं हे ट्रांस्फोर्मेशन अगदी फिल्मी दाखविले गेले आहे. उदा. नोकरीवरुन काढल्यावर तो बॉसच्या केबिन मध्ये जातो, टेबलावरची क्लाईंट फाईलचे पहीले एक-दोन पानं वाचुन त्यात तब्बल १२ चुका आहेत हे काही सेकंदात सांगतो वगैरे. पण त्याकडे आपले जास्त लक्ष जात नाही. विजय लालवानींना सिनेमाचे श्रेय द्यायलाच हवे, पहिल्या सिनेमातच त्यांनी आपली छाप पाडली आहे. दिपिका पडुकोन, राम, बाकी सहकलाकार योग्य.
एकुणात हिन्दी मध्ये काहीतरी वेगळं पाहण्याची इच्छा असेल तर जरुर पाहाण्याजोगा.
नावामूळे या सिनेमाविषयी उत्सूकता होतीच.. वेगळी कथा आहे आणि आता तुझ्याकडून ग्रीन सिग्नल.... मग पहायला हरकत नाही :)
ReplyDeleteमलाही बारा वाटला....दीपिका मस्त आहे यात....:)
ReplyDeleteअप्रतिम आहे, मला आवडला हा सिनेमा. पण माझ्या खूप मित्रमंडळींना नाही आवडला असो. गाणी, अभिनय मस्त आहे. थोडा स्लो आहे पण कथा वेगळीच असल्याने मला आवडेश...
ReplyDeleteहोय तन्वी, सिनेमा चांगला तर आहे. मला ब्वा आवडला ;-)
ReplyDeleteसागरा, तुला सिनेमा बारा का वाटला ?
ReplyDeleteमला तर बरा वाटला ;-)
वाटलंच मला दिपिकामुळेच तुला आवडला असणार... फरहान दिसला का सिनेमात ? ;-)
सुहास, थोडा वेगळा असल्यामुळे, संथ आणि सतत डार्क फ्रेम्समुळे कदाचित. पण चांगला प्रयत्न आहे.
ReplyDeleteMala majhya mitr mandala kadun kahi phar khas reveiw nahi milala...mhanun navhata baghitala pan tu koutuk karatoyas mhanaje baghayala hava...
ReplyDeleteशेम टू शेम मैथिली. मलाही विशेष खास रिव्ह्यू आला नव्हता. पण आता मात्र नक्की बघावा लागेल :)
ReplyDeleteशोमूने दोन तीन वेळा मला सांगितले होते पाहा म्हणून पण काही मैत्रिणींना फारसा खास न वाटल्याने मी जरा मागेच टाकला होता... पण आता तुझ्या परिक्षणामुळे पाहीन म्हणतेयं... शोमुही आहेच आलेला. तोही खूश होईल... एका दगडात दोन पक्षी... हा हा... त्याला वाटेल आईला एकदाचे पटले तर....:D
ReplyDeleteमैथिली, चांगला आहे सिनेमा, तू नक्की पहा. आवडेल तुला...
ReplyDeleteहेरंब, तुला आवडावा, तसा आहे चांगला सिनेमा...
ReplyDeleteताई, शोमु खरं म्हणतोय, बघ एकदा आणि मगच ठरव... ;-)
ReplyDeleteProblem of KCK is it neither works as thriller nor as love story.Just making plot more curious doesn't mean that you made good movie.It is,the thing which is called as half baked item.I won't even mind that if End was atleast okay.I really wanna know your take on that ending.
ReplyDeleteMEE 1/2 CHA PAHILA :(
ReplyDeleteHi Aniket, It is not a love story for sure. It is a thriller with a bit extended love story (this is real problem for Indian films). I was ok with the end and happy on overall effect of the film.
ReplyDeleteशिनू, मग अर्धा आवडला का आवडला नाही ? ;-)
ReplyDeleteआप....
ReplyDeleteमी हा सिनेमा अजून बघितलेला नाही. आता तू म्हणतोयस तर बघायला हरकत नसावी.
रच्याक, मला स्वस्तात एक सिनेमा बनवायचाय..हीच स्क्रिप्ट थोडीशी मॉडीफाय करून आपण, 'कार्तिक मिसकॉलिंग कार्तिक' असा सिनेमा बनवू शकू का?
स्क्रिप्ट मॉडीफाय करायची काहीच गरज नाही, त्यांनीही स्वस्तात हा सिनेमा बनविला आहे.. सिनेमा पहा म्हणजे कळेल... ;-)
ReplyDeletewah! he wachun picture pahila (aadhi baghnar navate) :)
ReplyDeletechhan ahe!
धन्यवाद मेघा.
ReplyDeleteWell I can't say anything after that.But whenever it comes to thrillers,Thril is main constitute of that.KCK touches that point and leaves that immidiately.Talking about End it was like "Khoda Pahaad Nikalaa Chuhaa",and that is main reason to come to know the wrong things about movie.See when any thriller ends on high note,viewer don't regret about what they watch from start.Thats where lot of Hindi movies failed.
ReplyDeleteAniket, I totally agree with your views on thrillers. I was OK with this film and it's ending, it justified the earlier proceedings in the film. Not sure why you didn't liked the end.. will be great if you could share your views in email just to avoid "spoiler" for people.
ReplyDeleteThanks.
I definitely don't think that was a spoiler at all,because I haven't said anything about phone calls and so on.That was just my words over end.But it's ok if you're Ok with it,because every single mind is different and every single perspective is different so I can understand that.I was just comparing this thriller with whatever thrillers I've seen,because see that became a benchmark for me.
ReplyDeleteSure why not but I really don't know your Mail ID,it isn't on profile also.
Yes that was not a spoiler. I said for further discussion we should do it on email to avoid "spoiler".
ReplyDeleteHere is my id: anandpatre[AT]gmail[DOT]com
नक्की बरा आहे ना? या थ्रिलरचा शेवट माहिती आहे तरीही पाहायला हरकत नाही.. :)
ReplyDeleteहोय, बरा आहे. पण थ्रीलरचा शेवट माहीत असेल तर कसा बरा वाटेल ?
ReplyDeleteWow...aata pahawa lagel..baghte weekend la kuthe milto ka....navryala sangte...
ReplyDeleteनक्की पहा अपर्णा, तुला आवडेलच.
ReplyDeleteधन्यवाद प्रतिक्रियेकरीता...