Saturday 27 March 2010

फॉरेस्ट गम्प (१९९४)

दिग्दर्शक - रॉबर्ट झेमेकिस

बस स्टॉप वर बसची वाट पाहत बसलेला फॉरेस्ट बाजुला बसलेल्या बाईला आपल्या जीवनाची कहानी सांगायला सुरुवात करतो, ऐकनारे बदलत जातात पण आपण मात्र फॉरेस्टच्या जीवनपटात गुंग होऊन जातो.  १९९४ साली आलेला आणि ऑस्कर पारितोषिके मिळवणारा ’फॉरेस्ट गम्प’ विल्सन ग्रुमच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारलेला आहे.



कमी आयक्यु असलेल्या फॉरेस्टला शाळेत प्रवेश नाकारला जातो, त्याच्या आईच्या प्रयत्नांमुळे तो शाळेत दाखल होतो, पण कमकुवत पायांमुळे पायांना ब्रेसेसचा आधार लावावा लागतो.  जेनी नावाची मुलगी सोडुन त्याचा कुणी मित्र नसतो.  असाच एकदा टारगट पोरं त्याच्या मागे लागतात आणि तो अडखळत पळायला सुरुवात करतो, आणि आश्चर्यकारकरित्या ब्रेसेस तोडुन तो उत्तम धावायला लागतो.  याच धावण्याच्या जोरावर कॉलेजमध्ये तो अमेरिकन फुटबॉलचा उत्तम खेळाडू होतो. 

पदवी मिळाल्यानंतर अमेरिकन आर्मीमध्ये दाखल होतो, विएतनाम मध्ये युद्धात सामिल होतो, तिथे त्याची मैत्री ’बब्बा’ नावाच्या अफ्रो-अमेरिकन तरुणासोबत होते. बब्बा आणि फॉरेस्ट त्यावेळी केवळ बब्बाच्या परंपरागत कोळी व्यवसायाबद्दल बोलणे होत असते आणि आर्मी मधुन निवृत्त झाल्यानंतर पार्टनर म्हणुन हा उद्योग करायचा असे ठरवितात. या युद्धात बब्बा मरण पावतो, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात फॉरेस्ट अनेकांना वाचवतो, त्यात त्यांचा लेफ्टनंट डॅन सुद्दा असतो, डॅन दोन्ही पायांनी अधु होतो, आणि रणांगणावर विरमरण पत्करण्याएवजी अधु जीवन जगाव लागल्यामुळे फॉरेटवर नाराज होतो.  फॉरेस्टला ’मेडल ऑफ ऑनर’ मिळते.

आर्मीत असताना बंदुकिची गोळी लागल्यामुळे आराम करत असलेल्या फॉरेस्टला टेबल टेनिस (पिंग पॉंग) खेळण्याची सवय लागते आणि तो त्यात अत्यंत कुशल होतो, प्रसिद्ध होतो, यासाठी विशेष जाहिरात असलेली बॅट वापरण्यासाठी त्याला भरपुर पैसे मिळतात आणि तो बब्बाच्या घराकडे एक बोट विकत घेउन श्रिंपिंग व्यवसाय सुरु करतो, बब्बाची आठवण म्हणुन.  तिथेही मिळालेला पैसा तो बब्बाच्या घरी आवर्जुन देतो.

ह्या सर्व प्रवासात त्याची आणि जेनीची भेट होत असते,  पण जेनी कधीही त्याच्याकडे थांबत नाही आणि प्रत्येकवेळेस तिची जीवनशैली बदललेली असते, पण फॉरेस्टचे तिच्यावर प्रेम तसेच असते.
एकदा जेनी त्याच्या घरी असताना तो तिला लग्नाची मागनी घालतो पण जेनी नाही म्हणते, त्या रात्री त्यांचा शरीरसंबंध होतो पण दुसर्‍यादिवशी सकाळीच जेनी त्याला सोडुन निघुन जाते, या धक्क्यामुळे फॉरेस्ट धावायला सुरुवात करतो आणि सलग ३ वर्ष धावतो.

जेनीच्या पत्रामुळे तो तिला भेटण्यासाठी येतो, तिला आणि त्यांच्या मुलाला घेवुन घरी येतो, जेनी त्याला लग्नाबद्दल विचारते आणि हे पण सांगते की तिला न बरा होणारा आजार झाला आहे.   फॉरेस्ट तरीही तिच्यासोबत लग्न करतो....

फॉरेस्टच्या जीवनाच्या कथेमध्ये अमेरिकेतील मुख्य राजकिय आणि सामाजिक घडामोडींचा बॅकड्रॉप आहे,  अमेरिकेतल्या प्रत्येक राष्ट्रपती बरोबर तो भेटतो.  इतका असामान्य असुनही जीवनात छोट्या छोट्या गोष्टींचे महत्व सिनेमात जागोजागी दिसते.  प्रमुख भुमिकेत टॉम हॅन्क्स ने लाजवाब अभिनय केला आहे,  त्याची संवाद म्हणण्याची असामान्य लकब, बोलका चेहरा आणि डोळे....  हा सिनेमा पहायलाच हवा!

11 comments:

  1. अप्रतिम सिनेमा आहे हा. टॉम हॅन्क्सच्या सगळ्या चित्रपटांमध्ये आणि एकुणातच माझा फेव्हरेट !! पारायणं झाली आहेत अक्षरशः... अगदी तोंडपाठ आहे म्हटलंस तरी चालेल !! :-)

    ReplyDelete
  2. नक्की पहायला हवा...एवढ छान वर्णन केल आहेस तर...

    ReplyDelete
  3. माझा अत्यंत आवडता सिनेमा आहे हा. टॉम हॅन्क्सचे बहुतेक सगळेच सिनेमा माझ्या कलेक्शन मध्ये आहेत आणि आवडतेही आहेत. कास्ट अवे, टर्मिनल, सेव्हिंग प्रायवेट रायन, ग्रीन माईल, अपोलो थर्टीन, किती घेऊ तेवढी नावे थोडीच. अतिशय व्हर्सटाईल कलाकार आहे तो.

    ReplyDelete
  4. माझा पण हा खुप आवडता सिनेमा आहे. टॉम हॅन्कस चा एकही सिनेमा मी पहायचा सोडलेला नाही. फॉरेस्ट गम्प मी किती वेळा पाहिला असेन हे आता मलाही आठवत नाही. आनंद, तू टॉम हॅन्क्स चा यू गॉट मेल, स्लीपलेस इन सिअ‍ॅटल, कास्ट अवे, द टर्मिनल, फिलाडेल्फिया हे सिनेमा सुद्धा जरुर पहा.

    -अजय

    ReplyDelete
  5. हेरंब,
    खरंय, ह्याचे पारायणं मी ही नक्कीच करणार...

    सागर,
    जरुर पहा, ब्लॉगवर स्वागत!

    भाग्यश्रीताई,
    कास्ट अवे आणी सेविंग प्रायवेट रायन मी ही पाहीले आहेत, आता बाकिचे मिळवितो... टॉम हॅन्क्स खरंच तोड नाही...

    अजय,
    बर्‍याच दिवसानंतर दिसला रे... हो आता सर्व टॉम हॅन्क्सचे सिनेमा पाहणार आहे..

    ReplyDelete
  6. "Life is like box of Chocolates,you never know what you're gonna get"
    Favourite line.
    Tom really deserves Acadamy award.If you want Tom Hanks movies then I will say Big,Philadelphia,CAst Away,Terminal,CHarlie Wilsons war,ladykillers,Money Pit,turner and Hooch.I know these are lot of movies but a must watch all of them.I hope you've seen road to perdition and obviously Green Mile and Saving Private RYAN.

    ReplyDelete
  7. Thanks Aniket for the list, I am all set to watch all Tom Hanks movies now, this whole month dedicated to him only :)

    ReplyDelete
  8. मागे न्यूज चानेल मध्ये " माय नेम इज खान " चे कथानक हे या चित्रपटाशी मिलते जुलते आहे असे ऐकण्यात आले होते .. तेव्हा पासून या चित्रपटाची मला उत्सुकता लागली होती ! आता आपण असे विश्लेषण दिल्या वर तर हा चित्रपट मी नक्की बाघिन ! धन्यवाद !
    -निनाद गायकवाड ! (N v G !)

    ReplyDelete
  9. निनाद, ब्लॉगवर स्वागत. 'माय नेम इज खान' मी बघितला नाही, त्यामुळे यावर आधारलेला आहे का ते माहित नाही. पण हा चित्रपट आवर्जुन पहाण्यासारखा आहे...

    ReplyDelete
  10. Anand-ji, mla-hi khup avadto ha chitrapat :)

    ReplyDelete
  11. धन्यवाद श्रीराज आणि ब्लॉगवर स्वागत :)

    ReplyDelete