Wednesday 29 September 2010

१० थिंग्स आय हेट अबाउट यू (१९९९)

दिग्दर्शकः गिल जंगर

बर्‍यापैकी टिपीकल टीन सिनेमा असूनही दिग्दर्शन, अभिनय, पटकथा या पातळींवर चांगला असल्यामुळे गिल जंगर दिग्दर्शित '१० थिंग्स आय हेट अबाउट यू' पहाणेबल झाला आहे.  मी हा सिनेमा पाहीला कारण यात हिथ लेजर आहे. शेक्स्पीअरच्या 'The Taming of the Shrew' या नाटकावर आधारीत.


कॅमेरॉन (जोसेफ गॉर्डन लेविट) कॉलेजात नव्यानं दाखल होतो, आणि बिआंका या सुंदर मुलीच्या लव्ह ऍट फर्स्ट साईट प्रथेप्रमाणे प्रेमात पडतो.  पण बिआंकाचे डॉक्टर वडील पदवीआधी प्रेम किंवा डेटिंगच्या विरोधात असतात.  बिआंकाची बहीण कॅट (ज्युलीया स्टाईल्स) देखिल प्रेमाच्या किंबहुना मुलांच्या विरोधात असते.  बिआंकाला हे सर्व पटत नसते, पण वडिलांसमोर आणि कॅट समोर तिचं चालत नाही.  त्यात ती खुप आग्रह करते पण तिचे वडील एक अट टाकतात, जर कॅट डेटवर जात असेल तर बिआंकाला जाता येईल.

आता कॅटसारख्या रागीट स्वभावाच्या मुलीसाठी मुलगा शोधणं कॅमेरॉनला भाग पडतं.  मग तो पॅट (हिथ लेजर) या कॅटसारख्याच स्वभावाच्या मुलाला तयार करतो, त्यासाठी जो या बिआंकावर लाईन मारणार्‍याकरवी.  हो नाही करता पॅट आणि कॅट दोघही प्रेमात पडतात तसेच आधी जो कडे आकर्षीत असणारी बिआंका कॅट कडून जो विषयी कटू अनुभव ऐकल्यावर कॅमेरॉनच्या प्रेमात पडते.  मग डेट करण्यासाठी घेतलेल्या पैश्यावरून कॅट आणि पॅट च्या संबंधात मीठाचा खडा पडतो, पण पॅट खरोखर प्रेम करू लागला आहे हे कळल्यावर परत शिरस्त्याप्रमाणे एकत्र येतात.


एकुण  पुढे काय घडणार हे माहित असूनही सिनेमा बघावासा वाटतो यात  ज्युलिया स्टाईल्स आणि हीथ लेजरचा महत्वाचा हात आहे.  टीन सिनेमा असल्यामुळे बर्‍यापैकी प्रेडीक्टेबल आहे.  एकदा बघायला हरकत नाही.

15 comments:

  1. हिथ लेजर साठी आणि "आय लव्ह यू बेबे" साठी हा चित्रपट एकदा तरी पहायचा आहे. बॅटमॅन मधला जोकर आणि हा हिथ लेजर किती वेगळा वाटतो.

    ReplyDelete
  2. मला ज्युलिया स्टाईल्स आवडते...
    तिचा 'डाऊन टू यू' पण चांगला आहे...
    हा '१० थिंग्ज' बघायला मिळाला तर बघेन कधीतरी!

    ReplyDelete
  3. baghaayalaach hava ataa..:)

    ReplyDelete
  4. 10 things... आमच्या नागपूरच्या सगळ्या colleges मधे "must watch" यादीत होता. त्यामुळे प्रत्येकाच्या PC वर हा असायचाच. मीपण माझ्या college days मधे बघितला होता अणि आवडला होता. हे सगळं dark knight प्रदर्शित होण्याअगोदरचे आहे. नंतर हाच पॅट dark knight मधे जोकर म्हणून ओळखू न येण्याइतका भन्नाट झाला होता.dark knight ने त्याला अजरामर केलं. त्यानंतर त्याचे जुने चित्रपट परत प्रसिद्ध झाले.
    हे परिक्षण वाचुन ती must watch यादी आठवली.

    ReplyDelete
  5. मस्त, बघितला होता हा सिनेमा दोन-तीन वर्षापूर्वी..यामधला हिथ लेजर आणि बॅटमॅन मधला जोकर ह्यात अभिनयाची उत्तम झलक दिसते...

    ReplyDelete
  6. सहीये रे.. मी हा बघितला होता अर्धा.. पण चिक-फ्लिक वाटल्याने सोडला... आता पुन्हा बघेन नीट.. :)

    ReplyDelete
  7. खरंय कांचनताई, हिथ लेजर अतिशय गुणी कलाकार होता, त्याच्या अल्पआयुष्यामुळे इंटरनॅशनल सिनेमाने एक मौल्यवान हिरा गमावला.

    ReplyDelete
  8. तू हा सिनेमा बघ आणि पाहतो मला 'डाऊन टू यू' मिळतो का ते ;)

    ReplyDelete
  9. माऊताई जरूर पहा. प्रतिक्रियेकरीता खुप आभार.

    ReplyDelete
  10. संकेत, खुप धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत.

    ReplyDelete
  11. सुहास, हिथ लेजरने सर्वच सिनेमात चांगला अभिनय केला आहे, तो गाजला 'ब्रोकबॅक माऊंटन' सिनेमामधुन... आणि जोकर तर सर्वांच्याच स्मरणात आहे.

    ReplyDelete
  12. होय हेरंब, चिक-फ्लिक प्रकारातच येतो, टीन मुव्ही.. पण मला तरी पाहण्यासारखा वाटला.

    ReplyDelete
  13. First of all I thought the actor in poster was Joseph Gordon Levitt,after reading realised he is Heath.But looking good,will watch

    ReplyDelete
  14. होय अनिकेत.. आणि तुझ्याही ब्लॉगवर पोस्ट्स टाकत जा रे ;)

    ReplyDelete
  15. Pardon me for late reply.Sure,if you say so;I definitely will in this week

    ReplyDelete