दिग्दर्शक - डॅनी बॉयल
१२७ अवर्स चित्रपटाबद्दल बरंच ऐकलेलं होतं, त्याच्या ऑस्कर शर्यतीतल्या प्रवेशामुळे, रेहमानच्या संगीताच्या ग्लोबल रिकग्निशनमुळे, डॅनी बॉयल दिग्दर्शित असल्यामुळे आणि मुख्य म्हणजे सत्यघटनेवर आधारीत असल्यामुळे सिनेमा पाहायचा हे निश्चितच होतं. त्यात रोहनने त्यावर शिक्कामोर्तब केलं.
ऍरॉन रालस्टन या गिर्यारोहकाच्या आयुष्यातल्या अत्यंत कठीण, जीवघेण्या पण धाडसी १२७ तासांची ही कहाणी सांगतो. ऍरॉन रालस्टनचं बेस्टसेलर पुस्तक 'बिटवीन अ रॉक ऍण्ड अ हार्ड प्लेस' ह्यात ही संपुर्ण धाडसकथा लिहिली आहे.
ऍरॉन हा गिर्यारोहक, आपला जवळपास प्रत्येक विकांत हा गिर्यारोहण आणि भटकंतीत घालवत असतो, त्याचा फिरण्यासाठी लाडका भाग म्हणजे 'ब्ल्यु जॉन कॅनियन'. असंख्य वेळा तिथे गेल्यामुळे त्या भागाची सविस्तर माहिती असलेला. एका विकांताला असाच तो तिकडे निघतो, वाटेत दोन रस्ता चूकलेल्या मुलींना अत्यंत सुंदर अशी जागा जिथे दगडातून एकदम पाण्याच्या साठ्यात उडी घेता येतं दाखवतो, त्यांना सोडून परत आपल्या कॅनियनच्या हायकिंगवर निघतो. त्या कॅनियनच्या चिंचोळ्या दर्यातून जाताना त्याला अपघात होतो, आणि एक भला मोठा दगड त्याच्या उजव्या हाताला घेऊन दरीत अडकून बसतो. सुरुवातीला ऍरॉनला त्या प्रसंगाचं गांभिर्य लक्षात येत नाही, आपल्याकडील वस्तू वापरून तो यातनं सुटेल असे प्रयत्न करतो पण हळूहळू त्याच्या लक्षात येतं की त्याच्याजवळ जास्त पर्याय नाहीत. ऍरॉनच्या अतिआत्मविश्वासामुळे तो मोहिमेवर निघताना मोबाईल फोन घेत नाही, आईचा फोन घेत नाही का तर तिने जाऊ दिलं नसतं, घाईत चांगला चाकू (स्वीस नाईफ सेट) घेत नाही. कुणालाही कुठे जाणार हे सांगत नाही, त्यामुळे त्याची सुटका अजुनच अवघड बनते. त्यात पाणी आणि अन्नही अपुरं असतं. त्यातून तो कशी सुटका करतो हा सिनेमाचा पुढचा प्रवास.
सिनेमाचा सुरुवातीचा भाग अतिशय प्रेक्षणीय आहे, कॅनियनला अतिशय सुंदररित्या चित्रीत केलं आहे, आणि दगडांच्या चिंचोळ्या दरीतून पाण्यात उडी घेण्याचा थरारक प्रसंग अतिशय पाहणेबल आहे. त्यानंतर मात्र ऍरऑन अडकल्यावर केवळ घळीत संपुर्ण सिनेमा आहे आणि पठकथेवर डॅनी बॉयलने सुंदर सिनेमा घडवला आहे. घरुन घाईत निघताना पाणी भरताना तो ते सांडू देतो, नंतर नळ नीट बंद करत नाही, तोच ऍरॉन नंतर मात्र पाण्यासाठी कसा तडफडतो, शेवटी सुटका झाल्यावर अगदी घाण पाणी सुद्धा पितो. आधी वैतागलेला ऍरॉन नंतर मात्र सुटकेचे एक एक प्रयत्न करतो, प्रयत्न असफल ठरू लागल्यावर आपल्या आयुष्यातला चूका, स्वकियांबद्दलच्या त्याच्या आठवणी, आईचा फोन न उचलल्याबद्दल वाईट वाटणं, एकटं बर्याच वेळ राहील्यावर अगदी उडणार्या पक्ष्याला बोलावसं वाटणं असे अनेक प्रसंग आपल्याला हेलावून सोडतात.
सिनेमाचं खरं यश म्हणजे ऍरॉन बरोबर आपण त्या सिच्युएशनमध्ये मिसळून जातो, अगदी अडकल्यावर त्याची घुसमट स्वतः अनुभवतो. प्रमुख भुमिकेत जेम्स फ्रॅन्कोने अतिशय उत्तम काम केलं आहे. नक्की पहावा.

![]() |
जालावरून साभार |