Sunday 30 January 2011

127 अवर्स (२०११)

दिग्दर्शक - डॅनी बॉयल

१२७ अवर्स चित्रपटाबद्दल बरंच ऐकलेलं होतं, त्याच्या ऑस्कर शर्यतीतल्या प्रवेशामुळे, रेहमानच्या संगीताच्या ग्लोबल रिकग्निशनमुळे, डॅनी बॉयल दिग्दर्शित असल्यामुळे आणि मुख्य म्हणजे सत्यघटनेवर आधारीत असल्यामुळे सिनेमा पाहायचा हे निश्चितच होतं. त्यात रोहनने त्यावर शिक्कामोर्तब केलं.


ऍरॉन रालस्टन या गिर्यारोहकाच्या आयुष्यातल्या अत्यंत कठीण, जीवघेण्या पण धाडसी १२७ तासांची ही कहाणी सांगतो.  ऍरॉन रालस्टनचं बेस्टसेलर पुस्तक 'बिटवीन अ रॉक ऍण्ड अ हार्ड प्लेस' ह्यात ही संपुर्ण धाडसकथा लिहिली आहे.

ऍरॉन हा गिर्यारोहक, आपला जवळपास प्रत्येक विकांत हा गिर्यारोहण आणि भटकंतीत घालवत असतो, त्याचा फिरण्यासाठी लाडका भाग म्हणजे 'ब्ल्यु जॉन कॅनियन'.  असंख्य वेळा तिथे गेल्यामुळे त्या भागाची सविस्तर माहिती असलेला.  एका विकांताला असाच तो तिकडे निघतो, वाटेत दोन रस्ता चूकलेल्या मुलींना अत्यंत सुंदर अशी जागा जिथे दगडातून एकदम पाण्याच्या साठ्यात उडी घेता येतं दाखवतो, त्यांना सोडून परत आपल्या कॅनियनच्या हायकिंगवर निघतो.  त्या कॅनियनच्या चिंचोळ्या दर्‍यातून जाताना त्याला अपघात होतो, आणि एक भला मोठा दगड त्याच्या उजव्या हाताला घेऊन दरीत अडकून बसतो.  सुरुवातीला ऍरॉनला त्या प्रसंगाचं गांभिर्य लक्षात येत नाही, आपल्याकडील वस्तू वापरून तो यातनं सुटेल असे प्रयत्न करतो पण हळूहळू त्याच्या लक्षात येतं की त्याच्याजवळ जास्त पर्याय नाहीत.  ऍरॉनच्या अतिआत्मविश्वासामुळे तो मोहिमेवर निघताना मोबाईल फोन घेत नाही, आईचा फोन घेत नाही का तर तिने जाऊ दिलं नसतं, घाईत चांगला चाकू (स्वीस नाईफ सेट) घेत नाही.  कुणालाही कुठे जाणार हे सांगत नाही, त्यामुळे त्याची सुटका अजुनच अवघड बनते.  त्यात पाणी आणि अन्नही अपुरं असतं. त्यातून तो कशी सुटका करतो हा सिनेमाचा पुढचा प्रवास.
जालावरून साभार

सिनेमाचा  सुरुवातीचा भाग अतिशय प्रेक्षणीय आहे, कॅनियनला अतिशय सुंदररित्या चित्रीत केलं आहे, आणि दगडांच्या चिंचोळ्या दरीतून पाण्यात उडी घेण्याचा थरारक प्रसंग अतिशय पाहणेबल आहे. त्यानंतर मात्र ऍरऑन अडकल्यावर केवळ घळीत संपुर्ण सिनेमा आहे आणि पठकथेवर डॅनी बॉयलने सुंदर  सिनेमा घडवला आहे. घरुन घाईत निघताना पाणी भरताना तो ते सांडू देतो, नंतर नळ नीट बंद करत नाही, तोच ऍरॉन  नंतर मात्र पाण्यासाठी कसा तडफडतो, शेवटी सुटका झाल्यावर अगदी घाण पाणी सुद्धा पितो. आधी वैतागलेला ऍरॉन नंतर मात्र सुटकेचे एक एक प्रयत्न करतो, प्रयत्न असफल ठरू लागल्यावर आपल्या आयुष्यातला चूका, स्वकियांबद्दलच्या त्याच्या आठवणी, आईचा फोन न उचलल्याबद्दल वाईट वाटणं, एकटं बर्‍याच वेळ राहील्यावर अगदी उडणार्‍या पक्ष्याला बोलावसं वाटणं असे अनेक प्रसंग आपल्याला हेलावून सोडतात.

सिनेमाचं खरं यश म्हणजे ऍरॉन बरोबर आपण त्या सिच्युएशनमध्ये मिसळून जातो, अगदी अडकल्यावर त्याची घुसमट स्वतः अनुभवतो.  प्रमुख भुमिकेत जेम्स फ्रॅन्कोने अतिशय उत्तम काम केलं आहे.  नक्की पहावा.

20 comments:

  1. "१२७ अवर्स" लवकरच बघावा लागेल.गिर्यारोहण,ट्रेकींग हा तर आपला जीव की प्राण...
    माझा आता पर्यंतचा सर्वाधिक आवड्ता चित्रपट "व्हर्टीकल लिमीट"होता...आता बहूधा १२७ अवर्स त्याची जागा घेइल.

    ReplyDelete
  2. बघना पडॆंगा ये सिनेमा, तू आणि रोहन दोघांचेही मत सकारात्मक आहे आणि माझा तुमच्या मतांवर विश्वास आहे... :)

    ReplyDelete
  3. आपला जवळपास प्रत्येक "विकांत" हा गिर्यारोहण आणि भटकंतीत घालवत असतो

    काय .. नवीन शब्द आणला का मराठीच्या बाजारात.. जरा शनिवार रविवार लिहायला काय बिघडत होते??
    ते खूप लांब वाटत होते तर विकेंड लिहिले असते तर ते हि चालले असते ..

    ReplyDelete
  4. hmm..aata tar pahawach laagel....as it is we are a big fan of Discovery pgm where they show similar situations...

    ReplyDelete
  5. पहिला आहे १२७ Hours एकदम जबरदस्त .
    @ अमोल
    तुझ्या ब्लोग च नाव ब्रेक द रुल्स आहे अन तुझी इथली कॉमेंट वाचून हसू आल :)

    ReplyDelete
  6. सपा सर्वांनीच आवर्जुन बघावा असा सिनेमा आहे हा...

    ReplyDelete
  7. विश्वासाबद्दल आभार ताई, हा सिनेमा पाहून तुझ्या विश्वासाला तडा जाणार नाही हे नक्की :)

    ReplyDelete
  8. राहुल, ब्लॉगवर स्वागत. होय विकांत हा नवा शब्द आहे मराठीच्या बाजारात ;)
    जो सोपा शब्द वाटला तो वापरला, हा आता नवा शब्द वाटत नाही.

    प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  9. अपर्णा, जरूर पहा.. डिस्कव्हरी चॅनलच्या कार्यक्रमापेक्षा जास्त काही मिळेल... :)

    ReplyDelete
  10. सागर, धन्यवाद रे!

    ReplyDelete
  11. १२७ अवर्स मला काही करून बघायचाच आहे. रोहणा आणि तुझ्या पोस्ट्सनी तर निर्णय अजून पक्का झाला आता :)

    सपा, तू Cliffhanger बघितला आहेस ना? गिर्यारोहण विषयातला माझा तो सर्वात आवडता चित्रपट. !

    ReplyDelete
  12. pahanarch ataa...mi pan phar utsuk ahe ha pahayala

    ReplyDelete
  13. हेरंब नक्की बघ....

    ReplyDelete
  14. अजय, बर्‍याच दिवसांनी दिसलास.. सिनेमा आवर्जुन बघण्यासारखा आहे..

    ReplyDelete
  15. "डिस्कव्हरी चॅनलच्या कार्यक्रमापेक्षा जास्त काही मिळेल... :)"

    Excellent quote,Haven't seen this flick yet will watch now

    ReplyDelete
  16. Sure and I would like to read your take on it.
    Thanks Aniket.

    ReplyDelete
  17. mi pahila pan mala thoda santh vatla cinema...thriller peksha lessons jast milalaet cinematun

    ReplyDelete
  18. डालोला टाकतो....

    ReplyDelete
  19. :-o
    मी कॉमेंटलो नव्हतो????
    माझ्या टू वॉच लिस्टमध्ये आहे हा आणि हार्ड डिस्कवर पडून आहे.. मुहूर्त लागेना राव! :)

    ReplyDelete
  20. बरोबर आहे अजय... खूप काही शिकण्यासारखं आहे.. आभार..

    धन्स देवा...

    प्रचंड नेपाळी पंत... काढा मुहूर्त लवकर...

    ReplyDelete