
रॉड्रिगो कॉर्ट्सच्या 'बरीड' सिनेमाची ही सुरुवात.. यातला 'तो' (अन एकमेव पात्र) असतो पॉल कॉनरॉय, शवपेटीत बंद असल्याचे कळताच तो मदतीसाठी पुकारतो अन जोरजोरात शवपेटीचं झाकण उघडायचा अयशस्वी प्रयत्न करतो. थोड्यावेळाने एक फोन त्याच्या पायाशी व्हायब्रेट होतो, पण पायाच्या सहाय्याने तो घेईपर्यंत कट होतो, फोन तर असतो पण त्यातली भाषा अरेबीक/इराकी असते. तरीही प्रयत्न करून, पॉल मदतीसाठी आधी ९११, नंतर FBI, कंपनी हेड्क्वार्टर, स्टेट डिपार्टमेंट सगळी कडं फोन करतो, शेवटी इराकमधील होस्टेज रेस्क्यू ग्रुप मधील डॅन त्याला मदत करायचं फोनवर आश्वासन देतो. फोन संभाषणाद्वारे आपल्याला कळतं की पॉल हा इराक मध्ये अमेरिकन कंपनीत ड्रायव्हर होता, आणि त्यांच्या ट्रक्स वर आधी हल्ला झाला अन त्यानंतर त्याला काही आठवत नाही.
तेवढ्यात पॉलला एक फोन येतो, त्यावर एक अरेबिक ऍसेंट मध्ये बोलणारा इसम पॉलच्या सोडवणुकीसाठी पाच मिलियन डॉलरची मागणी करतो. इकडं पॉलची कंपनी त्याला मदत करण्याऐवजी त्याला सकाळीच बडतर्फ केल्याचं सांगते, अन मदतीसाठी साफ नकार देते. एक फोन, थोडं पाणी, आणि लायटर इतक्याच गोष्टी पॉलजवळ असतात. त्यात त्याला किडनॅपर परत फोन करतो अन पैसे मिळवण्यासाठी आपलं बोट काप आणि त्याचा व्हिडीओ अपलोड कर म्हणतं, त्यासाठी एक चाकू, बॅटरी, अन लाईट ट्युब ठेवलेली एक पिशवी पायथ्याशी आहे असं सांगतो.
जीवघेण्या प्रसंगातून सुरू होते मग पॉलची वाचण्याची तडफड.
पॉलचे सुटकेचे प्रयत्न पाहताना डॅनी बॉयलचा १२७ अवर्स आठवतो. त्यातही आधी सुटकेची आशा, प्रचंड प्रयत्न, खूप प्रयत्नानंतर आलेलं अपयश, मग त्या वातावरणाशी सरावणं, अजुन लॉजिकल प्रयत्न करणं, मृत्यु जवळ आहे या जाणिवेणं घर, कुटुंब आठवणं हे सर्व घटक सारखे आहेत. पण सिनेमात आपण पुर्णवेळ एकच माणूस पाहतो, तो ही एका शवपेटीत, बाकी सर्व फोनवरचे आवाज. पॉलच्या आठवणीही फ्लॅशबॅक मध्ये नाहीत, त्याही केवळ फोनद्वारे आपल्याला कळतात. एका पात्रात, अन एका शवपेटीत असूनही पुर्ण सिनेमाभर (९० मिनिटं) आपण खिळून राहतो, दिग्दर्शक अन पटकथेला दाद द्यायलाच हवी. लायटरच्या अपुर्या प्रकाशात, फोनच्या प्रकाशात, उजेडाचे अन अंधाराचे प्रयोग करून आपल्याला दिग्दर्शक एकदम त्या जागी पोचवतो. शेवटही धक्कादायक. स्ट्रॉन्ग्ली रिकमेंडेड.
वाह वाह... जबरदस्त !!
ReplyDeleteबघतो लवकरचं !!
जबरदस्त प्रकार आहे हा.. मधला एक सीन तर प्रचंड भयानक आहे..
ReplyDeleteकिंचित करेक्शन : बाटलीत पाणी नसतं.
अरेच्च्या हा कसा सुटला नजरेतून! :(
ReplyDeleteआता पाहतेच!
आभार सुझे.. नक्की पहा.. जबरी आहे सिनेमा...
ReplyDeleteहोय हेरंब जब्बरदस्त आहे.. बाटली पाहूनच मला समजायला हवं होतं अन एका प्रसंगात त्या 'पाण्याचा' वापरही 'योग्य' करतो ना तो.. :)
श्रीताई .. जरूर पहा..
One thing for sure after watching this,I definitely wouldn't like to be buried alive.
ReplyDeleteI especially liked the way atmosphere was created,there is one more movie named 'Cube'.Gives the same claustrophobic atmosphere,you should watch that.
Though storyline is very thin,you've done a great analysis;Hats Off!
http://blogs.suntimes.com/ebert/pages-for-twitter/the-prematre-burial-by-edgar-a.html
ReplyDeleteRead This
I hate it when I can't move freely or the place where I can't breath adequately. I have read about live burial in some book when I was kid, and that reading itself nearly suffocated me :) at that time. So definitely that's the scariest situation for me ... This movie definitely horrified me for that factor.. :)
ReplyDeleteThanks for Cube suggestion, I'll definitely try that. Thanks a lot Aniket for very supportive and encouraging comment. Thanks a lot!
Eager to watch !!!
ReplyDeleteThanks Nilesh! Do watch it...
ReplyDelete