
बहुचर्चित 'टिंग्या' पाहिला, अतिशय आवडला. विषय तर उत्तम आहेच वर सर्व कलाकारांनी उत्तम काम केले आहे. विशेष म्हणजे बाल कलाकार टिंग्या(शरद गोयेकर) यांनी अतिशय प्रामाणिकपणे ही भूमिका साकारली आहे. (अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे). असे कितीतरी सीन आहेत कि ज्यामध्ये डोळ्यात पाणी येते. त्यातही टिपिकल भडक पार्श्वसंगीत नसने ही जमेची बाजू . तांत्रिक बाजू थोड्या कमजोर वाटल्या पण एकूण परिणाम सुंदर आहे. सीन बदलला कि लगेच पार्श्वसंगीत थांबणे, किंवा बदलणे, हे बर्याच जागी खटकते. (ही बर्याच वास्तवदर्शी सिनेमात दिसणारी , खटकणारी गोष्ट मला वाटते.) ते एकदम बदलण्या ऐवजी लीलया मिसळल पाहिजे. असो, बहुतेक मला हे नीट सांगता आलं नाही. मंगेश हाडवळे यांच दिग्दर्शन चांगल आहे, त्यांचा पुढील प्रोजेक्ट हे सिद्ध करेलच. सिनेमा पाहताना स्वतःचा कितीदा तरी राग आला, आणि आपण किती कोरडे झाले आहोत याची लाज वाटली. आताही माहित आहे कि हा सिनेमा फक्त एकट्यात मी पाहू शकतो कारण कुणा समोर रडण्यात आपण (मी) कमीपणा मानतो.
आपलासिनेमास्कोप परीक्षण
http://apalacinemascope.blogspot.com/2008/05/blog-post_30.html
अधिकृत दुवा
http://tingya-a-film.blogspot.com/
लोकप्रभा परीक्षण