Sunday, 13 June 2010

500 डेज ऑफ समर (२००९)

दिग्दर्शक - मार्क वेब

IMDB : http://www.imdb.com/title/tt1022603/

बॉलीवूडची सर्वात घासुन गुळगुळीत झालेली कहाणी कोणती? दोन जीवांच प्रेम.. त्यात मुलगा प्रेमावर विश्वास न ठेवणारा..  आणि मुलगी प्रेमावर आंधळा विश्वास ठेवणारी... सरतेशेवटी मुलाचाही प्रेमावर विश्वास बसणार आणि गोष्ट सफळ संपुर्ण होणार.. ह्याच बॉलीवूडी कंसेप्टवर आधारीत असणारा पण वेगळेपण जपणारा '५०० डेज ऑफ समर' हा हॉलीवूडी चित्रपट एक सुंदर रोमॅन्टीक ड्रामा आहे. 

ह्यात नायक टॉम प्रेमावर विश्वास ठेवणारा असतो, तर नायिका समर ही प्रेमावर विश्वास न ठेवणारी असते.  समरला नाती, त्यानंतर येणारी जवाबदारी, होणारी फसवणुक मंजुर नसते.  टॉम हा आर्कीटेक्टचं शिक्षण घेतलेला पण पोटासाठी ग्रीटींग कार्ड बनविणार्‍या कंपनीत काम करणारा असतो.  तिथे त्याची ओळख समर हिच्याशी होते....पहाताक्षणीच त्याचं प्रेम तिच्यावर जडतं.... पण समरचा प्रेमावर, नात्यांवर विश्वास नसतो...

प्रेम आणि नातं यावरुन दोघात वाद होतात तरीही केवळ सोबत असताना चांगले वाटत असल्यामुळे त्यांची जवळीक कायम राहते, पण अशाच एका वादामुळे ते दुरावतात.. टॉमला याची टोचणी राहते.. समर तो जॉब सोडते.

एका जुन्या कलीगच्या लग्नाला जाताना प्रवासात टॉम आणि समर भेटतात.  परत थोडेसे जवळ येतात, तिथेच समर टॉमला घरी पार्टीसाठी बोलावते.  त्या पार्टीत टॉम समरकडे जातो पण तिच्या बोटात एंगेजमेंट अंगठी पाहुन तिथुन निघुन जातो. अतिशय विमन्सक अवस्थेत जॉब सोडतो आणि दारूच्या आहारी जातो.

मग हळूहळू स्वतःला सावरून आपल्या आर्कीटेक्ट विषयाकडे वळतो व त्या क्षेत्रात नौकरी शोधायला लागतो..

इथे कथा सरळ सांगितली असली तरी चित्रपटात ती उलट सुलट दाखविली आहे.  टॉम आणि समरचे हे संबंध ५०० दिवस चालतात (५०० डेज ऑफ समर म्हणुन चित्रपटाचे नाव).  चित्रपटात आधी दिवसाचा नंबर देऊन त्यादिवशीची कथा दाखविली आहे... ही नॉन लिनीअर मांडणी छान वाटते, मुख्य इथे जुळते.

चित्रपटात टॉम आणि समर निभावलेले कलाकार जोसेफ गॉर्डोन आणि झोयी सुंदर भुमिका करतात.  झोयी तर अप्रतिम, समरच्या भुमिकेत अगदी फिट्ट.  दिग्दर्शन सुद्धा चांगलं आहे,  प्रेमात असताना 'होम सेंटर' टाईप मॉलमध्ये फिरताना नविन जोडप्याप्रमाणे तिथेच काल्पनिक संसार मस्त रंगविला आहे.. मजा येते ते पाहताना.  प्रेम जुळल्यावर टॉमवर अगदी टिपिकल बॉलीवूड पटांप्रमाणे एक गाणे चित्रीत केले आहे, रस्त्यावर तो गाणे गातो, रस्त्यावरचे लोकं त्यात सामिल होतात वगैरे... हॉलीवूडच्या हिरोवर हे गाणं वेगळंच वाटतं..
सिनेमा संपतो सुद्धा एका गोड शेवटासहीत, पाहणेबल आहे.

18 comments:

 1. कथा तर तू म्हणतोस तशी घासून गुळगुळीत झालेलीच वाटते आहे. पण ट्रीटमेंटही तितकीच महत्वाची. टाकतो आता डाउनलोडला. चिकफ्लिक आहे का हा?

  ReplyDelete
 2. कथा सरळसोट असली तरी मांडणी मस्त आहे, ५०० दिवसांच्या त्यांच्या नात्याला दिवसावार विभागून नॉन लिनियर मांडणी मध्ये कधी २९० वा दिवस कधी ३२ वा दिवस असे दाखविले आहे. चिकफ्लिक नाही कारण अती इमोशनल वगैरे नाहीये. एकदा पाहण्यासारखा आहेच.

  ReplyDelete
 3. आजच पाहतो आहे का होस्टेल मध्ये कुणाकडे
  अन जरा जास्त मुवीज पाहून पोस्ट लिहीत जा म्हणजे काय पहावं अन काय नको हे कळत

  ReplyDelete
 4. "अन जरा जास्त मुवीज पाहून जास्त पोस्ट लिहीत जा म्हणजे काय पहावं अन काय नको हे कळत"
  अस लिहायचं होत
  गैरसमज नसावा
  आपला वेंधळा
  सागर

  ReplyDelete
 5. अर्र्र्र्र्र्र्र्... हॉलिवूडमधेपण बॉलिवूड टाईप श्टोरी... अनझेपेश.. कालच मी "कराटे किड" आणि "द A-टिम" पाहिला. दोन्ही TP आहेत. कराटे किड जास्त लांबलाय...

  ReplyDelete
 6. हाहा सागर, पहिली कमेंट पाहुन मी गोंधळलो होतो...
  अरे सिनेमा पाहायला आणि त्यावर लिहायला वेळ तर जास्त पाहीजे ना.. ?

  ReplyDelete
 7. नाही झेपेलशी मला तरी वाटली सौरभ... ;-)
  कराटे किड मलाही पाहायचाय...

  ReplyDelete
 8. Movie was edited so well that you just fall into that love story.I especially liked "expectation and reality"technic.That was awesome and happens with everyone.Also giving hints about movie through the movie they're watching was really is nice concept.PLUS song you wrote about,same thing was done in Love Aaj Kal if you've watched.

  BTW,I've
  updated blog.Read it

  ReplyDelete
 9. Thanks Aniket. I haven't seen LAK so no idea, but that kind of song picturization we have seen in many bollywood flicks.

  I'have seen your blog, I will see those movies and then comment on them. You should increase the frequency of your posts... :-)

  ReplyDelete
 10. वाटतेयं खरी टिपिकलच ष्टोरी. येईल लवकरच चॅनलवर तेव्हां पाहिनच. btw,परवा Pelican Brief(1993)पाहिला. Directed by Alan J. Pakula. With Julia Roberts, Denzel Washington, Sam Shepard, मस्त आहे. पाहिला नसशील तर जरूर पाहा. Worth seeing.

  ReplyDelete
 11. ताई :)
  पेलिकन ब्रिफ आहे लिस्ट मध्ये, अजुन नाही पाहीला.. पाहतो आता.

  ReplyDelete
 12. श्रीताई, आनंद,

  पेलिकन ब्रिफ आणि ग्रिशमचे बरेच चित्रपट (मी माझ्या ग्रिशमच्या पोस्ट मध्ये उल्लेख केलेले) आवर्जून पाहण्यासारखे आहेत. पण पेलिकन ब्रिफची बातच काही और आहे. हे पुस्तकं कधीपासून माझ्या विश लिस्ट मध्ये आहे. आमच्या लायब्ररीत येत नाहीये अजून :(

  ReplyDelete
 13. हेरंब, पुस्तक जास्तच जबरी आहे. सिनेमाची बातच काही और आणि त्यातही ज्युलिया व डेंझलचे काम पाहायचे. ज्युलियाच्या चेह~याची रेष न रेष बोलते अगदी. बाकी तिच्या रेखीवपणाचे कौतुक कितीही केले तरी कमीच.:)

  ReplyDelete
 14. तू ऐकत नाय बाबा. निवडून निवडून पिक्चर्स बघतोस. आता हा पण बघते.

  ReplyDelete
 15. तुझ्याकडूनच शिकतो आहे कांचन... :-)

  श्रीताई आणि हेरंब, पॅलिकन ब्रिफ आज रात्रीच पाहणार आहे...

  ReplyDelete
 16. हल्लीच आलेला “ आय हेट लव स्टोरीज” त्याच्या प्रोमोज वरून तरी याच कथानकाशी मेळ खात असलेला वाटला. मी हे दोन्ही चित्रपट पाहिलेले नाहीत पण “ गुळगुळीत “ स्टोरीवरून सहज अंदाज बांधता येतो

  ReplyDelete
 17. ब्लॉगवर स्वागत तृप्ती. कथा तिच असली तरी आपल्याकडे नॉन लिनियर हाताळणी कुणी जास्त करत नाही...
  प्रतिक्रियेकरिता आभार

  ReplyDelete