दिग्दर्शकः गिल जंगर
बर्यापैकी टिपीकल टीन सिनेमा असूनही दिग्दर्शन, अभिनय, पटकथा या पातळींवर चांगला असल्यामुळे गिल जंगर दिग्दर्शित '१० थिंग्स आय हेट अबाउट यू' पहाणेबल झाला आहे. मी हा सिनेमा पाहीला कारण यात हिथ लेजर आहे. शेक्स्पीअरच्या 'The Taming of the Shrew' या नाटकावर आधारीत.
कॅमेरॉन (जोसेफ गॉर्डन लेविट) कॉलेजात नव्यानं दाखल होतो, आणि बिआंका या सुंदर मुलीच्या लव्ह ऍट फर्स्ट साईट प्रथेप्रमाणे प्रेमात पडतो. पण बिआंकाचे डॉक्टर वडील पदवीआधी प्रेम किंवा डेटिंगच्या विरोधात असतात. बिआंकाची बहीण कॅट (ज्युलीया स्टाईल्स) देखिल प्रेमाच्या किंबहुना मुलांच्या विरोधात असते. बिआंकाला हे सर्व पटत नसते, पण वडिलांसमोर आणि कॅट समोर तिचं चालत नाही. त्यात ती खुप आग्रह करते पण तिचे वडील एक अट टाकतात, जर कॅट डेटवर जात असेल तर बिआंकाला जाता येईल.
आता कॅटसारख्या रागीट स्वभावाच्या मुलीसाठी मुलगा शोधणं कॅमेरॉनला भाग पडतं. मग तो पॅट (हिथ लेजर) या कॅटसारख्याच स्वभावाच्या मुलाला तयार करतो, त्यासाठी जो या बिआंकावर लाईन मारणार्याकरवी. हो नाही करता पॅट आणि कॅट दोघही प्रेमात पडतात तसेच आधी जो कडे आकर्षीत असणारी बिआंका कॅट कडून जो विषयी कटू अनुभव ऐकल्यावर कॅमेरॉनच्या प्रेमात पडते. मग डेट करण्यासाठी घेतलेल्या पैश्यावरून कॅट आणि पॅट च्या संबंधात मीठाचा खडा पडतो, पण पॅट खरोखर प्रेम करू लागला आहे हे कळल्यावर परत शिरस्त्याप्रमाणे एकत्र येतात.
एकुण पुढे काय घडणार हे माहित असूनही सिनेमा बघावासा वाटतो यात ज्युलिया स्टाईल्स आणि हीथ लेजरचा महत्वाचा हात आहे. टीन सिनेमा असल्यामुळे बर्यापैकी प्रेडीक्टेबल आहे. एकदा बघायला हरकत नाही.
Wednesday, 29 September 2010
Sunday, 5 September 2010
रनिंग स्केअर्ड (२००६)
http://www.imdb.com/title/tt0404390/
दिग्दर्शक - वेन क्रेमर
थ्रीलर्स आपल्याला आवडण्यासाठी ते शेवटापर्यंत आपल्याला खिळवून ठेवणारे असावेत, वेळोवेळी अनपेक्षीत वळणं आणि उत्तम धक्के असावेत, आणि शेवटी सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळावी. या थ्रीलर्सच्या सर्वसाधारण अपेक्षेमध्ये बरेच थ्रीलर शेवटाला मात खातात. आधी कथानकात उत्तम गुंतागुंत तयार करतात, पटकथा शेवटापर्यंत अतिशय सुंदर पळते मग शेवटी दिग्दर्शक, पटकथाकार जेंव्हा गुंता सोडवायला घेतात त्यावेळी जास्त वेळ न घेता सोपे पण न पटणारे उपाय सहसा शोधले जातात. 'रनिंग स्केअर्ड' हा थ्रीलर सुद्धा इथेच अडकतो. अतिशय उत्तम गतीत बराचवेळ राहतो आणि शेवटाला ढिसाळतो.
येथील नायक जो (अत्यंत उत्तम अदाकारीत पॉल वॉकर) एका गुन्हेगारांच्या टोळीत काम करत असतो, ड्रग डिलींगच्या वेळी तिथं काही बुरखाधारी येतात, त्यांना दुसरी टोळी समजून, दोन्ही गटात गोळीबार होतो आणि एक सोडून सर्व बुरखाधारी मरण पावतात, जो आणि टोळीला लक्षात येतं की ती दुसरी टोळीची माणसं नसून ती भ्रष्ट पोलीस होती, या प्रसंगाने बावरलेला टोळी प्रमुख त्यात वापरलेल्या बंदूकींना नष्ट करण्यासाठी जो कडे देतो.
त्या शस्त्रांची विल्हेवाट लावण्याऐवजी जो ती शस्त्र आपल्या घराच्या बेसमेंटमधील एका खणीत ठेवतो, तसं करताना त्याचा मुलगा निक आणि त्याचा शेजारचा रशियन मित्र ओलेग पाहतात. तिथुन ओलेग घरी परत जातो, त्याचे विक्षीप्त वडील त्याला त्रास देतात त्यातच ओलेग त्यांच्यावर गोळी झाडतो, ती चुकते व खांद्याला लागते, गोळीबाराचा आवाज ऐकून जो त्यांच्या घरी येतो व केलेल्या वर्णनावरून त्याला लक्षात येतं की ही बंदूक त्याचीच आहे आणि ती जर पोलिसांच्या हाती लागली तर तो आणि त्याची टोळी अडचणीत येणार.
मग जो चा ओलेग आणि पर्यायाने त्या बंदूकीचा शोध, त्यात ओलेग वेगवेगळ्या अडचणींमध्ये सापडतो आणि दरवेळी त्याचा पाठलाग करताना जो आणि त्याची बायको टेरेसा (व्हेरा फर्मिंगा) त्याची सुटका करता करता अनेक अडचणीत सापडतात. या अडचणीतून ओलेग, जो आणि टेरेसा कसा मार्ग काढतात ही पुढील कथा.
सुरुवातीपासून ते शेवटच्या वीस मिनिंटापुर्वी पर्यंत सिनेमा आपल्याला अगदी सिटच्या एजवर ठेवतो, अतिशय उत्कंठावर्धक सिक्वेंसेस आहेत, दरवेळी ओलेग नविन अडचणीत येतो आणि बंदूक बर्याच लोकांच्या हातातून जाते, त्यासर्वांना शोधताना जो ची कसोटी लागते. पुर्णवेळ फॉर्मात असणारा हा सिनेमा शेवटाला मात्र गुंते सोडवताना मात्र पार कोलमडतो.
पॉल वॉकर (जो), व्हेरा फर्मिंगा (टेरेसा), कॅमेरॉन ब्राईट(ओलेग) आणि कारेल रॉडेन (ओलेगचे सावत्र वडील) यांचा अभिनय उत्तम आहे. लेखक आणि दिग्दर्शक वेन क्रेमरचं दिग्दर्शन उत्तम आहे, केवळ शेवटाचा काही भाग वगळता, यात दिग्दर्शकापेक्षा लेखक कमी पडला आहे. सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे, एका घरातून दुसर्या घरात काचातून कॅमेरा आत नेण्याची पद्धत छान वाटली आहे.
शेवटचा काही भाग वगळता अतिशय उत्तम थरारपट.

Labels:
२००६,
इंग्रजी,
गुन्हेगारीपट,
थ्रीलर,
पॉल वॉकर,
वेन क्रेमर,
व्हेरा फर्मिंगा
Subscribe to:
Posts (Atom)