Monday 27 June 2011

शोर इन द सिटी (२०११)

दिग्दर्शक - राज निदीमोरू, कृष्णा डी.के.

ग्रे शेड वाली मध्यवर्ती पात्रं, प्रत्येकाची वेगवेगळी कहानी पण कुठेतरी एकमेंकात गुंतलेली आणि शेवट त्या मध्यवर्ती धाग्यांनी जोडून पात्रांना एका विशिष्ट दिशेने बदलणारा... वाचायला सोपी पण पटकथेत विणायला अवघड अशी ही कल्पना राज आणि कृष्णा या दिग्दर्शक द्वयींनी पडद्यावर शोर इन द सिटी सिनेमात खूप प्रभावीपणे मांडली आहे.

निम्न स्तरातील त्रिकूट तिलक (तुषार कपूर), रमेश (निखिल द्विवेदी) आणि मंडूक (पितोबश त्रिपाठी) हे छोट्या मोठ्या चोर्‍या करणारे, त्यात तिलकचा पुस्तक पायरसीचा धंदा असतो, पण त्यातही तो प्रामाणिक असतो.  एका लेखकाची अप्रकाशीत पुस्तकाची कॉपी चोरून त्याची कॉपी करतो.  मंडूक रेल्वेत चोरी करतो आणि त्यात त्याला शस्त्राने आणि बॉम्बने भरलेली बॅग मिळते, ती विकण्यासाठी मग त्यांना अंडरवर्ल्डशी संबंध जोडावा लागतो.

मध्यवर्गीय तरूण क्रिकेटपटू सावन (संदीप किशन) राष्ट्रीय टीममध्ये खेळण्यास उत्सुक असतो पण तिथल्या भ्रष्टाचारामुळे १० लाख भरल्याशिवाय त्याला खेळता येत नाही, आणि घरची परिस्थीती बेताची असल्याने ते जमत नाही त्यात त्याच्या प्रेमिकेचा लग्नासाठी दबावामुळेही तो अस्वस्थ असतो आणि घराच्या समोरच्या बॅंकला लूटायचा तो मनोमन प्लॅन बनवायला सुरूवात करतो.

उच्चवर्गिय अनिवासी भारतीय अभय (सेंथिल राममुर्ती) विदेशातून भारतात धंदा (बिझनेस, धंदा म्हणजे एकदम डाऊन मार्केट वाटतं म्हणून) करायला येतो पण स्थानीक गुंडांच्या (झाकीर हुसेन) त्रासाला कंटाळलेला असतो, या तिन्ही गोष्टींचं एकत्र येण हे गणेश विसर्जनाच्या दिवशी कसं एकत्र येतं आणि त्यांच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे या डार्क कॉमेडी सिनेमात खूप चांगलं दाखवलं आहे.

राज आणि कृष्णा यांच्या पहिल्या '९९' सिनेमात त्यांनी दिल्ली शहराला पार्श्वभुमी घेऊन क्रिकेट बेटींगवर आधारीत अप्रतिम डार्क कॉमेडी सादर केली होती. खरी पात्रं आणि त्यांचं काहीस ग्रे असणं हा त्यांच्या सिनेमांचा खास पैलू आहे.  त्यांच्या कडून अजुन चांगल्या सिनेमांची अपेक्षा करणं ओघानं आलंच.

14 comments:

  1. हिंदी बघणं सोडलंय म्हणता म्हणता तू असले काही सही चित्रपट सुचवतो आहेस की पुन्हा हिंदीकडे वळावं लागणारसं दिसतंय :)

    ReplyDelete
  2. अपवादात्मक सिनेमे बनतातच ना रे सगळीकडं, मराठीतही त्याच त्याच कॉमेडींसोबत काही खूप चांगल्या निर्मीती आहेतच ना.. आभार!

    ReplyDelete
  3. शोर इन सिटी बघितला आणि आवडला सुद्धा

    ReplyDelete
  4. मलाही आवडला..
    काही प्रसंग सहजसुंदर झालेत..
    जसं त्याने शब्दकोशाच्या सहाय्याने The Alchemist वाचण्याचा प्रयत्न करणे आणि तिने तेच पुस्तक छान आहे असं सांगणे,ती शिकलेली आहे ह्याचा त्याला शोध लागणे ..

    ReplyDelete
  5. धन्स बायनरी बंड्या..

    ReplyDelete
  6. होय लिना, खूप प्रसंग सांगण्याजोगे आहेत... प्रतिक्रियेबद्दल आभार

    ReplyDelete
  7. आनंद, लेकानेही रेकमेंड केला आहेच. आता तूही पाहण्यासारखा आहे असे म्हणतो आहेस तेव्हां पाहावाच लागेल.

    ReplyDelete
  8. खरंच पाहण्याजोगा आहे श्रीताई.. आभार!

    ReplyDelete
  9. 99 was really well planned film,talking about shor in the city,main reason behind not watching that was Tushar kapoor.but as you've mentioned looking forward to watch the flick

    ReplyDelete
  10. शोर पाहिला ...आवडला .. एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे ...
    तसही हिंदीत सध्या मोठ्या मोठ्या नाव जोडलेल्या सिनेमांपेक्षा असे ऑफबीट टाईप सिनेमे बघायला जास्त आवडतात...

    ReplyDelete
  11. अनिकेत तुषार या भुमिकेत चोख आहे.. सिनेमा त्याच्यामुळे न पाहिल्यास बाकी कलाकारांवर आणि मुख्य दिग्दर्शकावर अन्याय होईल :)

    ReplyDelete
  12. अगदी बरोबर देवा... धन्स

    ReplyDelete
  13. हा बघितला... जास्त नाही आवडला.
    एकदा बघू शकतो, परत परत नाही :) :)

    ReplyDelete
  14. :) सुहास... आभार्स

    ReplyDelete