Friday, 22 July 2011

ट्रस्ट (२०१०)

दिग्दर्शक - डेव्हिड श्विमर

फ्रेण्ड्स या जगप्रसिद्ध सिटकॉम मधील 'रॉस गेलर'-डेव्हिड श्विमर त्याच्या उत्तम अभिनयासाठी माझा खास आवडता आहे, त्यानंतर त्याचा 'बिग नथिंग' हा उत्तम न्वारपट पाहण्यात आला आणि त्याच्या चतुरस्त्र अभिनयाची खात्री पटली.   'ट्रस्ट' सिनेमा मिळाला तेंव्हा केवळ डेव्हिड श्विमर दिग्दर्शक आहे म्हणून हा सिनेमा पाहायला घेतला, त्याबद्दल काही वाचलेलेही नव्हते, पण सिनेमा पाहून त्याच्या दिग्दर्शन आणि संवेदनशिल मनाचीही पावती मिळाली.

डेव्हिड श्विमर हा गेली दहा वर्ष Rape Foundation मध्ये एक बोर्ड मेंबर आहे, तिथे असताना त्याला पहाव्या लागलेल्या काही दुर्दैवी मुलींची आणि त्यांच्या पालकांची अवस्था त्याला हा सिनेमा बनवण्यास उद्युक्त करून गेली, जेणेकरून अल्पवयीन मुलींवर अत्याचार होऊ नयेत.

 सिनेमा आहे ऍनी या टीन एज मधल्या मुलीबद्दल.  आजच्या पिढीची ऍनी सतत फोनवर असते, तिच्या चौदाव्या वाढदिवसाला तिचे वडिल विल कॅमेरॉन तिला एक लॅपटॉप भेट देतात.  मग इंटरनेटवर ऍनीला चार्ली नावाचा मुलगा भेटतो, आधी तो तिला १६ वर्षाचा असल्याचं सांगतो आणि मग नंतर २०चा आहे असं सांगतो, पण तिचा विश्वास संपादन करतो आणि त्याला स्वतःचा मित्र आणि नंतर प्रियकर मानू लागते. त्याने वय लपवलं हे तिच्या पालकांना सांगत नाही.

एक दिवस चार्ली तिला भेटण्याबद्दल म्हणतो आणि ते दोघे भेटतात, पण चार्ली हा २० वर्षाचा नसून ३०-३५शीचा असतो, तरीही तो तिला त्याच्याबद्दल कन्व्हिंस करतो आणि त्यादिवशी तिच्या संमतीने तिच्यासोबत सेक्स  करतो आणि त्याची शुटींगही घेतो.  चार्लीच्या मैत्रीणीला ही गोष्ट कळाल्यावर ती पोलिसांना कळवते आणि मग सुरू होतो चार्लीला पकडण्याचा प्रयत्न. 

सिनेमा चार्लीला पकडण्यावर नसून त्याचा मुख्य उद्देश पीडित कुटूंबातील व्यक्तीरेखांवर आहे.  ऍनी टीनेजर प्रमाणेच आपल्याच जगात वावरणारी असते, सर्व गोष्टींमध्ये उत्साही, सळसळणारी,  आणि जगात काहीच वाईट नाही असा विश्वास असणारी,  त्या घट्नेनंतर तिच्या मनात प्रचंड अविश्वास निर्माण होतो, आधी मैत्रीणीबद्दल, मग वडिलांबद्दल, त्यानंतर पुर्ण कुटूंबाबद्दल.

तिचे आई-वडिल दोघेही अत्यंत मोठ्यामनाचे असतात, आणि आपल्या मुलांबरोबर त्यांचे मित्रत्वाचे संबंध असतात.  आई अतिशय काळजीवाहू असते, आणि त्या घटनेमुळे मुलीसाठी तिचा जीव तुटतो.  सर्वात त्रास होतो तो तिच्या वडिलांना (क्लाईव ओवेन), आधी हसतमुख, कुटूंबवत्सल असलेले नंतर हतबल, चिंतातूर, सुडाच्या भावनाने पेटलेले तर मुलीबाबतीत तितकेच हळवे होतात, त्यातच मुलगी त्यांच्यावर विश्वास ठेवत नसल्यामुळे आणि तिने लपवल्या मुळे दुखावले गेलेले असतात.  क्लाईव ओवेनने सर्व छटा त्याच्या समर्थ अभिनयातून सक्षमपणे दाखवल्या आहेत.


श्विमरचा हा सिनेमा अभिनय आणि पटकथेत पैकीच्या पैकी गुण मिळवतो.  ऍनी (लियाना लिब्रॅटो), आणि क्लाईव ओवेन यांनी भुमिकेत जीव ओतलाय.  बापाची हतबलता, राग, आणि दुःख तसेच ऍनीचा आधीचा विश्वास आणि नंतर सत्य कळल्यावर कोलमडणं आपल्याला प्रसंगानुसार हताश, दुःखी बनवतं, हेच सिनेमाचं यश.  हॅलोविन डिनर आणि शेवटचा स्विमिंग पूल जवळ ऍनी आणि विलचा हृदयद्रावक प्रसंग हे सर्वोच्च.

डेव्हिड श्विमरच्या पुढल्या दिग्दर्शिय भुमिकेची मी आता अतुरतेने वाट पाहीन..  please do yourself a favor and watch "TRUST".

श्विमर आणि सिनेमातल्या कलाकारांचा सिनेमाबद्दलचा व्हिडीओ इथं पहाता येईल.

http://www.imdb.com/video/imdb/vi501652761/

8 comments:

 1. बघितला.. आवडलाही.. पटकथेवर किंचित अजून काम करायला हवं होतं असं वाटलं मला..

  अॅनीला रियलाइझ होतं तो सीन (काउंसलर बरोबरचा) भयंकर आहे. सर्वात आवडला.

  ReplyDelete
 2. जबरदस्त रे.. आवडला !! धन्स !!

  ReplyDelete
 3. David Schwimmer is my favourite too not just for Friends but for Madagascar series too.Talking about Trust,this movie had a great story line and very few times you get such a great concepts.But in execution of story it failed and maybe got very bad reviews,though it wasn't that bad,or maybe I am too much influenced by that guy and thought it was great.But otherwise I liked the acting of the lead,and as always I hated Clive Owen.
  Watch the movie Catfish,if you've liked this one you will like that too,one of my favourite movie on Internet scams.

  ReplyDelete
 4. धन्स हेरंबा... पटकथेवर काम म्हणजे शेवटाला? मला वाटतं सिनेमाचा मूळ उद्देश बाप-लेकीच्या नात्याबद्दल होता.. त्यामुळं सर्व बरोबर वाटलं मला... त्यापेक्षाही श्विमरची संयम हाताळणी आवडली... सिनेमा अगदी भिडला...

  ReplyDelete
 5. धन्स रे सुझे..... सिनेमा पाहताच आधी हेओ अन मग तुला रिकमेंड करायचं ठरवलं.. तुला आवडणार हे निश्चित वाटलं...

  ReplyDelete
 6. I am not sure which was the bad execution, I liked the way he treated the movie, his motive was clear to showcase the family relations specifically father-daughter. I liked every bit of the movie. The image of Schwimmer may have also helped my liking. I never expected such an emotional drama handled such skillfully by him, as mainly I thought he excel in comic things (I guess his first film is also a comic one). Thanks Aniket as usual and I'll try to get catfish.

  ReplyDelete
 7. टाकतो डालोला... :)

  ReplyDelete