दिग्दर्शक - रॉबर्ट बेन्टन
तो आज प्रचंड खुष असतो, तो काम करत असलेल्या ऍड कंपनीत सर्वोच्च महत्वाच्या क्लायंटचं काम सोपवण्यात येतं, कारण त्याची काम करण्याची क्षमता आणि झोकून देण्याची वृत्ती. या क्लायंटला जर खुष केलं तर त्याच्या कंपनीचा फायदा होणार असतो. त्या खुषीतच तो घरी येतो, ऑफिसमध्ये एक अर्जंट कॉल करत असतानाच ती त्याला एक धक्कादायक बातमी देते. ती त्याला आणि त्यांच्या लहान मुलाला सोडून जाणार असते, कारण त्याचं स्वत:पुरतं वागणं, तिच्या अस्तित्वाची दखल न घेणं, घरासाठी वेळ न देणं. ती बाहेर पडते ते स्वत:ची ओळख मिळविण्यासाठी. तो एकदम धक्क्यात, आठ वर्षाचा संसार मोडून निघालेली बायको, आजच ऑफिसात वाढलेली जवाबदारी, शाळेत जाणारं मुल, आणि त्याच्या संगोपणाचा पडलेला भार.
इतके दिवस बायको असल्यामुळे घर आणि मुल सांभाळण्याची कधीही गरज न पडलेला पण आता तिहेरी कसरत करावी लागणार म्हणुन काळजीत. आठ वर्षात कधीही बाहेर पडली नाही म्हणुन ती परत लवकर येईल अशी त्याची आशा हळूहळू मावळत जाते. या सर्वात फरफट होते त्यांच्या मुलाची. आई घेत असलेली काळजी, ती देत असलेला वेळ, तिचा समजुतदारपणा, प्रेम हे त्याला मिळेनासं होतं. त्याला आपल्या कामातून कमी वेळ मिळतो, घरकाम येत नाही, मग ब्रेकफास्ट बनवताना होणारी तारांबळ, मुलाचा हट्टीपणा, जेवण्याचे प्रॉब्लेम्स त्यातुन मुलाबरोबर होणारं भांडण अश्या समस्यात दोघे अडकतात.
पण हळूहळू काही महिन्यांत ते परिस्थितीला सामोरे जाऊन एकमेकात ऍडजस्ट व्हायला लागतात, जिव्हाळा वाढायला लागतो. मुलाला खेळता खेळता इजा पोचते तेंव्हा अक्षरश: रस्त्याने पळत त्याला हातात घेऊन तो हॉस्पीटल गाठतो, दोघांचे बंध वाढायला लागतात.
ती काही महिन्यांच्या प्रयत्नानंतर एका जॉबला लागली आहे, रोज मुलाच्या शाळेजवळ येऊन त्याला न भेटताच केवळ त्याच्याकडे बघत आहे, त्याला भेटायची तिला अनिवार इच्छा आहे. स्वत:च्या पायावर उभी राहील्यामुळे आणि आत्मविश्वास उंचावल्यामुळे तीच्या मनात आता मुलाला स्वत:कडे ठेऊन घेण्याचे येत आहे. मग ती तिच्या वकीलामार्फत त्याला लीगल नोटीस पाठवते.
मुलाच्या संगोपणामुळे ऑफिसची नवी जवाबदारी समर्थपणे न पेलू शकल्यामुळे त्याला ऑफिसमधुन काढण्यात येतं, त्यातच तीच्या नोटीस मुळे मुल जर त्याला आपल्याजवर ठेऊन घ्यायचं असेल तर अत्यंत पैश्यांची गरज असते, मग चोविस तासात त्याच्या अनुभवापेक्षा कमी मानधन आणि खालची पोजीशन असलेली नौकरी तो स्विकारतो आणि खटला लढतो.
पुढे काय होतं ते चित्रपटात पाहणंच योग्य.
क्रॅमर वर्सेस क्रॅमर चं प्रमुख यश म्हणजे नायक डस्टीन हॉफमन आणि नायिका मेरिल स्ट्रीप, जबरदस्त पटकथा आणि काही अप्रतिम सिन्स. ती गेल्यावर त्याची ब्रेकफास्ट बनविताना होणारी कसरत, शेवटी ब्रेकफास्ट सीन, मुल घसरगुडीवरून पडल्यावर त्याचं त्याला हातात घेऊन हॉस्पीटल गाठणं, भांडण झाल्यावर दुसर्या सकाळी मुलाची माफी आणि आई आपल्यामुळे सोडून गेली याची भावना, मुलाला सायकल शिकवणं, कोर्टातले सिन, आणि शेवटाचा लिफ्ट मधील सिन......
डस्टीन हॉफमनने आधीचा वर्कोहॉलीक माणुस आणि नंतरचा हळवा बाप अविस्मरणीय साकारला आहे, मेरिल स्ट्रीपची हळवी पण स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव असणारी पण मुलासाठी जीव तुटणारी आई समर्थपणे साकारली आहे, ती दिसतेही अतिशय सुंदर, त्यांना योग्य साथ आहे मुलाची आणि त्यांच्या मैत्रिणीची.
पाहणं एकदम मस्ट!
(आपल्याकडे याचा ऍव्हरेज अवतार येऊन गेला आहे 'अकेले हम अकेले तुम')
Wednesday, 4 August 2010
Monday, 14 June 2010
द स्पॅनिश प्रिजनर (१९९७)
दिग्दर्शक - डेव्हिड मॅमेट
IMDB : http://www.imdb.com/title/tt0120176/
can you really trust anyone?
दिसतं तसं नसतं हेच खरं, कुणावर किती भरवसा ठेवायचा, हे ठरविणे खुप कठीण काम आहे.
'स्पॅनिश प्रिजनर'या नावावरून दुसर्या देशाच्या कायद्यात फसलेल्या नायकाची कथा असावी वाटते. प्रत्यक्षात हा लक्षवेधी थरारपट 'स्पॅनिश प्रिजनर' या फसवणुकीच्या प्रकाराचा वापर करतो.
'स्पॅनिश प्रिजनर' म्हणजे स्पेन मध्ये एक श्रीमंत माणसाला फसवून तुरूंगात डांबल्या गेला असल्याची अफवा एका सावजाला सांगायची. तो तिथुन सुटण्याचा प्रयत्न करत आहे, आणि त्यासाठी त्याला काही पैसे मोजावे लागणार आहेत, तर तात्पुरती जो मदत करेल त्याला श्रीमंत माणुस सुटल्यावर जबरदस्त बक्षीस देण्याचे लालूच.
इथे जास्त माहीती आहे. यात सावजाला संशय येऊ नये म्हणुन ही बातमी सांगणार्याला अत्यंत काळजीपुर्वक सावजाचा विश्वास संपादन करायचा असतो.
या सिनेमात सावज, जो रॉस ह्याने एक अशी प्रक्रिया तयार केली असती ज्यामुळे कंपन्यांचा करोडोंचा फायदा होणार असतो, अत्यंत मेहनतीने तयार केलेल्या या प्रक्रियेमुळे आणि त्याचा महत्वामुळे ती अतिशय सुरक्षीत जागी ठेवलेली असते. जो मात्र त्याच्या मानधनाबाबत संतुष्ट नसतो. वारंवार विचारूनही कंपनीचे मालक त्याला मानधनाविषयी जास्त काही सांगत नाही,केवळ योग्य वेळी योग्य मिळेल यावर बोळवण करीत असतात.
एका व्यावसायिक सहलीवर जो'ची ओळख अतिशय श्रीमंत उद्योगपती जिमी डेल बरोबर होते, जिमी सोबत ओळ्ख वाढवताना जिमी त्याला त्याच्या प्रक्रियेबद्दल कंपनी जास्त पैसे देणार नाही, आणि त्याने ओळखीच्या वकीलाचा सल्ला घ्यावा असे सांगतो, प्रक्रियेची मुळ प्रत सुद्धा सोबत आणायला सांगतो. दरम्यान कंपनीत नव्याने रुजू झालेली एक मुलगी सुसानशी जो'ची जवळीक वाढायला लागलेली असते, ती मात्र जिमीच्या वागण्यावर शंका घेत असते.
त्यातच जो'ला जिमी हा फसविणारा आहे असे कळते आणि तो एफबीआय एजंटला बोलतो, आणि ते जिमीला पकडण्यासाठी सापळा रचतात, पण जो ज्यांना बोलावतो आणि विश्वासाने प्रत त्यांकडे देतो ते एफबीआयचे एजंट नसून फसवेच असतात. त्यातच त्याला सहकार्याच्या खुनाच्या आरोपात अत्यंत शिफातीने गोवण्यात येते. तिथुन तो पळुन जातो व सुसानची मदत घेऊन जिमीचं रहस्य उघडायला आणि स्वतःला निष्पाप सिद्ध करायला जातो, त्यात तो यशस्वी होतो का, हा सिनेमाचा पुढचा भाग.
सिनेमा अतिशय उत्कंटावर्धक आहे, सुरुवातीच्या सत्रात थोडा संथ आहे, पण पहील्या २० मिनिटांनंतर मस्त वेग पकडतो. पटकथा अतिशय घट्ट विणली आहे आणि कुठेही सैल होत नाही. अगदी शेवटच्या मिनिटांपर्यंत पटकथेत वळणं, धक्के आहेत. कुठेही सिनेमा प्रेडिक्टेबल होत नाही. अभिनयात सर्वांनी कमाल केली आहे, नेहमी विनोदी भुमिकेत असणार्या स्टीव मार्टीनने सुद्धा गंभीर अभिनय चांगल्या रितीने केलाय.
चांगला थरारपट पाहण्याची इच्छा असेल तर पहावाच असा.
IMDB : http://www.imdb.com/title/tt0120176/
can you really trust anyone?
दिसतं तसं नसतं हेच खरं, कुणावर किती भरवसा ठेवायचा, हे ठरविणे खुप कठीण काम आहे.
'स्पॅनिश प्रिजनर'या नावावरून दुसर्या देशाच्या कायद्यात फसलेल्या नायकाची कथा असावी वाटते. प्रत्यक्षात हा लक्षवेधी थरारपट 'स्पॅनिश प्रिजनर' या फसवणुकीच्या प्रकाराचा वापर करतो.'स्पॅनिश प्रिजनर' म्हणजे स्पेन मध्ये एक श्रीमंत माणसाला फसवून तुरूंगात डांबल्या गेला असल्याची अफवा एका सावजाला सांगायची. तो तिथुन सुटण्याचा प्रयत्न करत आहे, आणि त्यासाठी त्याला काही पैसे मोजावे लागणार आहेत, तर तात्पुरती जो मदत करेल त्याला श्रीमंत माणुस सुटल्यावर जबरदस्त बक्षीस देण्याचे लालूच.
इथे जास्त माहीती आहे. यात सावजाला संशय येऊ नये म्हणुन ही बातमी सांगणार्याला अत्यंत काळजीपुर्वक सावजाचा विश्वास संपादन करायचा असतो.
या सिनेमात सावज, जो रॉस ह्याने एक अशी प्रक्रिया तयार केली असती ज्यामुळे कंपन्यांचा करोडोंचा फायदा होणार असतो, अत्यंत मेहनतीने तयार केलेल्या या प्रक्रियेमुळे आणि त्याचा महत्वामुळे ती अतिशय सुरक्षीत जागी ठेवलेली असते. जो मात्र त्याच्या मानधनाबाबत संतुष्ट नसतो. वारंवार विचारूनही कंपनीचे मालक त्याला मानधनाविषयी जास्त काही सांगत नाही,केवळ योग्य वेळी योग्य मिळेल यावर बोळवण करीत असतात.
एका व्यावसायिक सहलीवर जो'ची ओळख अतिशय श्रीमंत उद्योगपती जिमी डेल बरोबर होते, जिमी सोबत ओळ्ख वाढवताना जिमी त्याला त्याच्या प्रक्रियेबद्दल कंपनी जास्त पैसे देणार नाही, आणि त्याने ओळखीच्या वकीलाचा सल्ला घ्यावा असे सांगतो, प्रक्रियेची मुळ प्रत सुद्धा सोबत आणायला सांगतो. दरम्यान कंपनीत नव्याने रुजू झालेली एक मुलगी सुसानशी जो'ची जवळीक वाढायला लागलेली असते, ती मात्र जिमीच्या वागण्यावर शंका घेत असते.
त्यातच जो'ला जिमी हा फसविणारा आहे असे कळते आणि तो एफबीआय एजंटला बोलतो, आणि ते जिमीला पकडण्यासाठी सापळा रचतात, पण जो ज्यांना बोलावतो आणि विश्वासाने प्रत त्यांकडे देतो ते एफबीआयचे एजंट नसून फसवेच असतात. त्यातच त्याला सहकार्याच्या खुनाच्या आरोपात अत्यंत शिफातीने गोवण्यात येते. तिथुन तो पळुन जातो व सुसानची मदत घेऊन जिमीचं रहस्य उघडायला आणि स्वतःला निष्पाप सिद्ध करायला जातो, त्यात तो यशस्वी होतो का, हा सिनेमाचा पुढचा भाग.
सिनेमा अतिशय उत्कंटावर्धक आहे, सुरुवातीच्या सत्रात थोडा संथ आहे, पण पहील्या २० मिनिटांनंतर मस्त वेग पकडतो. पटकथा अतिशय घट्ट विणली आहे आणि कुठेही सैल होत नाही. अगदी शेवटच्या मिनिटांपर्यंत पटकथेत वळणं, धक्के आहेत. कुठेही सिनेमा प्रेडिक्टेबल होत नाही. अभिनयात सर्वांनी कमाल केली आहे, नेहमी विनोदी भुमिकेत असणार्या स्टीव मार्टीनने सुद्धा गंभीर अभिनय चांगल्या रितीने केलाय.
चांगला थरारपट पाहण्याची इच्छा असेल तर पहावाच असा.
Labels:
१९९७,
इंग्रजी,
गुन्हेगारीपट,
डेव्हिड मॅमेट,
थ्रीलर,
स्टीव मार्टीन
Sunday, 13 June 2010
500 डेज ऑफ समर (२००९)
दिग्दर्शक - मार्क वेब
IMDB : http://www.imdb.com/title/tt1022603/
बॉलीवूडची सर्वात घासुन गुळगुळीत झालेली कहाणी कोणती? दोन जीवांच प्रेम.. त्यात मुलगा प्रेमावर विश्वास न ठेवणारा.. आणि मुलगी प्रेमावर आंधळा विश्वास ठेवणारी... सरतेशेवटी मुलाचाही प्रेमावर विश्वास बसणार आणि गोष्ट सफळ संपुर्ण होणार.. ह्याच बॉलीवूडी कंसेप्टवर आधारीत असणारा पण वेगळेपण जपणारा '५०० डेज ऑफ समर' हा हॉलीवूडी चित्रपट एक सुंदर रोमॅन्टीक ड्रामा आहे.
ह्यात नायक टॉम प्रेमावर विश्वास ठेवणारा असतो, तर नायिका समर ही प्रेमावर विश्वास न ठेवणारी असते. समरला नाती, त्यानंतर येणारी जवाबदारी, होणारी फसवणुक मंजुर नसते. टॉम हा आर्कीटेक्टचं शिक्षण घेतलेला पण पोटासाठी ग्रीटींग कार्ड बनविणार्या कंपनीत काम करणारा असतो. तिथे त्याची ओळख समर हिच्याशी होते....पहाताक्षणीच त्याचं प्रेम तिच्यावर जडतं.... पण समरचा प्रेमावर, नात्यांवर विश्वास नसतो...
प्रेम आणि नातं यावरुन दोघात वाद होतात तरीही केवळ सोबत असताना चांगले वाटत असल्यामुळे त्यांची जवळीक कायम राहते, पण अशाच एका वादामुळे ते दुरावतात.. टॉमला याची टोचणी राहते.. समर तो जॉब सोडते.
एका जुन्या कलीगच्या लग्नाला जाताना प्रवासात टॉम आणि समर भेटतात. परत थोडेसे जवळ येतात, तिथेच समर टॉमला घरी पार्टीसाठी बोलावते. त्या पार्टीत टॉम समरकडे जातो पण तिच्या बोटात एंगेजमेंट अंगठी पाहुन तिथुन निघुन जातो. अतिशय विमन्सक अवस्थेत जॉब सोडतो आणि दारूच्या आहारी जातो.
मग हळूहळू स्वतःला सावरून आपल्या आर्कीटेक्ट विषयाकडे वळतो व त्या क्षेत्रात नौकरी शोधायला लागतो..
इथे कथा सरळ सांगितली असली तरी चित्रपटात ती उलट सुलट दाखविली आहे. टॉम आणि समरचे हे संबंध ५०० दिवस चालतात (५०० डेज ऑफ समर म्हणुन चित्रपटाचे नाव). चित्रपटात आधी दिवसाचा नंबर देऊन त्यादिवशीची कथा दाखविली आहे... ही नॉन लिनीअर मांडणी छान वाटते, मुख्य इथे जुळते.
चित्रपटात टॉम आणि समर निभावलेले कलाकार जोसेफ गॉर्डोन आणि झोयी सुंदर भुमिका करतात. झोयी तर अप्रतिम, समरच्या भुमिकेत अगदी फिट्ट. दिग्दर्शन सुद्धा चांगलं आहे, प्रेमात असताना 'होम सेंटर' टाईप मॉलमध्ये फिरताना नविन जोडप्याप्रमाणे तिथेच काल्पनिक संसार मस्त रंगविला आहे.. मजा येते ते पाहताना. प्रेम जुळल्यावर टॉमवर अगदी टिपिकल बॉलीवूड पटांप्रमाणे एक गाणे चित्रीत केले आहे, रस्त्यावर तो गाणे गातो, रस्त्यावरचे लोकं त्यात सामिल होतात वगैरे... हॉलीवूडच्या हिरोवर हे गाणं वेगळंच वाटतं..
सिनेमा संपतो सुद्धा एका गोड शेवटासहीत, पाहणेबल आहे.

Sunday, 30 May 2010
कार्तिक कॉलींग कार्तिक (२०१०)
दिग्दर्शक - विजय लालवानी.
दिल चाहता है, लक्ष्य, डॉन, हनिमुन ट्रॅवल्स प्रा.लि., रॉक ऑन, आणि लक बाय चान्स असे जवळपास सुंदर सिनेमा देणार्या एक्सेल एंटरटेन्मेंटचा या वर्षीचा सिनेमा 'कार्तिक कॉलींग कार्तिक' त्याच्या प्रोमोजवरुन एक चांगला थ्रीलर असल्याची साक्ष देत होता. कुणाला एक फोन येतो, त्यात बोलणार्याचा आवाज अगदी तसाच असतो, त्याला आपली सगळी रहस्ये, गुप्त माहिती माहित असते, थोडक्यात आपल्याला आपणच कॉल करतोय ही सुंदर कल्पना आहे एका थ्रीलरपटाची.
'कार्तिक कॉलींग कार्तिक' मध्ये कार्तिक (फरहान अख्तर) अतिशय साधा, नाकासमोर चालणारा असतो. चांगुलपणामुळे जास्तीची कामे ओढुन घेणे, काम करूनही बॉसचा ओरडा खाणे, कुणी मित्र नसने, ऑफिसात काडीचीही किंमत नसने, घरमालकाने सतावणे अश्या असंख्य समस्यांनी ग्रस्त असतो. यातच त्याला एक नेहमी स्वप्न पडत असते ज्यात त्याचा त्रास देणारा भाऊ विहिरीत पडुन मरतो. या मृत्यु साठी कार्तिक स्वतःला दोषी समजत असतो. यासाठी तो मानसोपचार तज्ञाची मदत सुद्धा घेत असतो.
एकदा रात्रभर जागुन काम करुन देखील बॉस कार्तिकला फोनवर खुप सुनावतो, आणि त्याला नोकरीवरुन कमी करतो. रागाच्या भरात कार्तिक फोन तोडतो आणि राग शांत झाल्यावर नविन फोन बसवतो.
दुसर्या दिवशी सकाळी एका फोन कॉल मुळे त्याची झोपमोड होते, कॉल उचलल्यावर पलीकडुन कार्तिक म्हणजे त्याचा स्वतःचाच कॉल असल्याचे त्याला कळते. पहिल्याप्रथम त्याला हे सर्व खोटं; एक विनोद वाटतो. पण फोन करणारा अशी काही सिक्रेट्स सांगतो जी केवळ कार्तिकलाच माहित असतात. त्या कॉलरचा आवाज देखील कार्तिक सारखाच असतो.
तो कॉलर कार्तिकला त्याच्या सर्व पेचप्रसंगातुन सोडवितो. त्याला जशास तसे वागायला शिकवितो. त्याचं प्रेम मिळवुन देतो, पण त्याबरोबर एक अट देखिल ठेवतो, की हा कॉल त्याला येतो हे कुणाला सांगायचं नाही.
कार्तिक प्रेमापुढे झुकुन प्रेयसीला हे सगळं सांगतो आणि मग तो कॉलर कार्तिकलाच संपवायला निघतो.
हा कॉलर कोण? आणि पुढे कार्तिकचे काय होते हा सिनेमाचा उत्तरार्ध.
सिनेमा एक उत्तम थरारपट आहे. शेवटपर्यंत आपल्याला खिळवुन ठेवतो. सिनेमाच्या डार्क फ्रेम्स रहस्यात गुढतेची भर टाकतात. मात्र थरारपटाच्या उत्सुकतेत अनावश्यक गाणी (ऐकायला बरी असुन) आणि थोडं लांबविलेले प्रेमप्रकरण व्यत्यय आणते. पण सिनेमा तगतो तो फरहान अख्तरच्या अतिशय प्रामाणिक अभिनयावर. सरळ साधा कार्तिक त्याने उत्तम रंगविला आहे, घाबरणारा कार्तिक आणि नंतर आत्मविश्वासाने वागणारा कार्तिक त्यांने व्यवस्थित रंगविला आहे.
पण त्याचं हे ट्रांस्फोर्मेशन अगदी फिल्मी दाखविले गेले आहे. उदा. नोकरीवरुन काढल्यावर तो बॉसच्या केबिन मध्ये जातो, टेबलावरची क्लाईंट फाईलचे पहीले एक-दोन पानं वाचुन त्यात तब्बल १२ चुका आहेत हे काही सेकंदात सांगतो वगैरे. पण त्याकडे आपले जास्त लक्ष जात नाही. विजय लालवानींना सिनेमाचे श्रेय द्यायलाच हवे, पहिल्या सिनेमातच त्यांनी आपली छाप पाडली आहे. दिपिका पडुकोन, राम, बाकी सहकलाकार योग्य.
एकुणात हिन्दी मध्ये काहीतरी वेगळं पाहण्याची इच्छा असेल तर जरुर पाहाण्याजोगा.

२०१०,
थ्रीलर,
दिपिका पडुकोन,
फरहान अख्तर,
विजय लालवानी,
हिंदी
Sunday, 23 May 2010
काईट्स (२०१०)
दिग्दर्शक - अनुराग बसू
राकेश रोशनचा सिनेमा, ऋतिक, जोडीला मेक्सिकन हॉटी बार्बरा मोरी आणि जोडीला सुमधुर संगीत या सर्व गोष्टींमुळे अत्युच्य अपेक्षा असलेला काईट्स सिनेमा.
मी स्वत: सिनेमाला जाताना फारशा अपेक्षेने गेलो नाही, कारण राकेश रोशनचे सिनेमे हिंदी सिनेमांच्या टिपिकलनेस मध्येच जास्त रमतात, त्यामुळे वेगळे काही असण्याची अपेक्षा नव्हतीच.
सिनेमाची नायीका मेक्सिकन आहे आणि जाहीराती पाहुन सिनेमा वेगळा असावा असे वाटले, पण असे काहीही नाही, सिनेमा एक नेहमीचीच प्रेमकथा आहे.
कथा म्हणजे जे(हो, हे ऋतिकचे नाव आहे) हा अमेरिकेतल्या लासव्हेगास या शहरात डान्सर असतो, त्याच बरोबर त्याच्या एका मित्राबरोबर अमेरिकेत ज्या मुलींना ग्रिनकार्ड हवे आहे, त्यांच्यासोबत लग्न करुन त्यांना कार्ड मिळवुन देऊन दलाली मिळवणारा असतो. श्रीमंत होण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असणारा जे, प्रसिद्ध कसिनोच्या मालकाच्या मुलीला (कंगना) पटवितो व तिच्यासोबत लग्नाचा घाट घालतो, याच वेळी टोनी ह्या कंगनाच्या भावासोबत नताशा (बार्बरा मोरी) ही सुद्धा जवळीक साधते. पण जे चे नताशावर आधीच प्रेम असते( तिला आगोदर त्याने ग्रीनकार्ड मिळवुन दिलेले असते), मग ’जे’ला प्रेमाचा साक्षात्कार होतो आणि तो टोनीशी वैर पत्करुन नताशाचे प्रेम मिळविण्याकरीता सर्वांशी लढतो, त्यात तो यशस्वी होतो का नाही, हा पुढचा सिनेमा.
ही कथा नविन नक्कीच नाही, बरं कथानकात काही टप्पे, वळणं नाहीत, एकदम सरधोपटपणे कथा समोर सरकते. मात्र सरधोपट कथानकाला (किंबहुना पटकथेला) थोडाबहुत सावरतो तो सिनेमाचा लूक.
एकदम स्टाईलाइज्ड लूक दिला आहे सिनेमाला. सरळ कथानक न दाखवता फ्लॅशबॅक अधुन मधुन वापरुन, थोडी उत्सुकता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे पण कथानक त्यावर सराईतपणे बोळा फिरवितो. साहसदृष्ये अप्रतिम असली तरी कुठेतरी ते खोटं आहे ही भावना राहतेच. पावसात गुंडांना स्टेनगनने ऋतिक ज्यापद्धतीने मारतो (तो दुसरा विचार करत आहे, आणि तो सिनेमाचा हिरो आहे हे त्याला माहित असल्यागत १०-१२ मुळ गॅन्गस्टर लोकांचे नेम चुकतात, तो निधड्या छातीने सगळ्यांवर चाल करून जातो आणि त्याला साधं खरचटत देखील नाही) ते नक्कीच पटत नाही. परत फ्लॅशबॅकमुळे पाठलाग सुरु असताना मध्येच प्रेमकथेमुळे चित्रपट स्लो होतो, त्यात परत गाणी येतात. गाणी जरी बर्यापैकी असली आणि त्यांचे चित्रिकरण उत्तम असले तरी तिथे ती जागा चुकल्यासारखी वाटतात.
या कथेकडे पाहता, बार्बरा मोरी ऐवजी एखादी हिन्दी नायिका असली असती तर काहीच फरक पडला नसता, मग विदेशी नायिकेची गरज पटत नाही, असे असले तरी बार्बरा मोरी हिचं काम मात्र सुंदर झाले आहे. ती दिसते सुद्धा छान, अपवाद काही सिनचा जिथे ती थोडी ओव्हरएजेड वाटते. ऋतिक आणि तिची जोडी उत्तम वाटली आहे, दोघांना एकत्र पाहणे ही एक ट्रीट आहे. अपेक्षेप्रमाणेच ऋतिक सिनेमाचा श्वास आहे आणि तो त्याप्रमाणे जबरदस्त अदाकारी दाखवितो. एक विशेष गोष्ट म्हणजे केवळ हिंदी सिनेमा आहे म्हणुन बार्बराच्या तोंडी टिपिकल (स्पॅनिश) हिन्दी संवाद नाही आहेत, तिला तिच्या स्पॅनिश ऎसेंट मध्ये बोलायला वाव दिला आहे. खाली इंग्रजी सबटायटल्स आहेत ज्याचा थोडा प्रतिकुल परिणाम होऊ शकतो, पण सिनेमात विदेशी लोकं बोलतात तश्या कंटाळवाण्या हिन्दी पासुन आपण वाचतो. पण यात देखील एक मेख आहेच, प्रत्येक स्पॅनिश संवादाला सबटायट्ल्स न देता मर्जीप्रमाणे काही संवादांना ते काटले आहेत, त्याचंही कारण आहे, जे संवाद नायकाला नाही समजले ते आपल्याला देखिल समजू नये, पण हा प्रकार वात आणतो, मोरी बोलताना दरवेळेस आपले लक्ष सबटायट्ल्स कडे जात असल्यामुळे आणि क्वचित ते दिले नसल्यामुळे थोडा अपेक्षाभंग होतो.
कंगना आणि कबिर बेदी सारख्या कलाकारांना अक्षरश: वाया घातले आहे. प्रमुख खलनायक निक ब्रॉउन अक्रस्ताळी भुमिका तितक्याच अक्रस्ताळेपणाने निभावतो. बाकी सहकलाकारांचा अभिनयसुद्धा जाणविण्या इतपत कच्चा वाटतो. एकुणात अपेक्षाभंग करणारा अनुभव.

ऋतिक,
कंगना,
ड्रामा,
बार्बरा मोरी,
राकेश रोशन,
राजेश रोशन,
रोमान्स,
हिंदी
Saturday, 1 May 2010
लव, सेक्स और धोखा (२०१०)
दिग्दर्शक - दिबाकर बॅनर्जी
नावावरुन बिचकुन जाऊ नका. हे सिनेमाचं नाव जरी हिंदी वृत्तवाहीन्याच्या तृतीय दर्जीय कार्यक्रमाचं वाटत असलं तरी हा सिनेमा उथळ विषयावर आधारीत नाही आहे.
’खोसला का घोसला’ आणि ’ओय लक्की लक्की ओय’ सारखे उत्तम चित्रपट बनविणारे दिबाकर बॅनर्जी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत, यावरुन सिनेमा उथळ नसनार अशी खात्री होती आणि अपेक्षेप्रमाणे चित्रपट खुपंच चांगला निघाला.
साधारण चित्रपट पाहतान आपण कॅमेराच्या जागी असतो, पण कॅमेरा हा सिनेमाचा, त्याच्या कथेचा भाग असतो असे फार क्वचित पाहायला मिळते. हॉलीवूडमध्ये ’क्लोवरफिल्ड’, ’माय लिटील आय’, ’द ब्लेअर विच प्रोजेक्ट’, आणि ’पॅरानॉर्मल अक्टीवीटी’ सारखे प्रयत्न वारंवार झालेले आहेत. माझ्या पाहण्यातला हिंदीतला हा पहीलाच प्रयत्न, आणि अगदी कौतुकास्पद असा.
या चित्रपटात तीन कथा कॅमेराच्या साथीनं आपल्याला दिसतात, पहिली ’लव’ प्रेमाची गोष्ट, एक तरुण दिग्दर्शक ’चोप्रा’ पद्धतीने भारावलेला चित्रपट बनवत असतो, त्याच्या कॅमेराने हा भाग आपल्याला दिसतो. दुसरी कथी , ’सेक्स’, एका छोट्याश्या मॉलमधील क्लोज सर्कीट कॅमेरांतर्फे दिसते आणि तिसरी, ’धोखा’, ही कास्टींग काऊच आणि मिडीयाच्या कॅमेरातुन दिसते.
तीनही कथांमध्ये कुठे ना कुठे इतर कथांचा संदर्भ येतो पण त्याचा कथेवर काहीही परिणाम नाहीये, तीनही स्वतंत्र म्हणाव्या अश्या कथा. सुरुवातीला खेळीमेळीत जाण्यार्या, हलक्या फुलक्या प्रसंगाच्या, प्रासंगी विनोद वापरणार्या, पण शेवटाकडे अतिशय गंभीर होत जाणार्या अश्या मांडल्या आहेत, यामुळे आपल्यावर परिणाम मात्र खुप खोलवर होतो.
एकही पात्र ओळखिच्या चेहर्यांनी न केल्या मुळे आणि सर्वांनी अतिशय खरा अभिनय केल्यामुळे हा चित्रपट वाटतच नाही, वास्तवातल्याच काही घटना पाहत असल्यासारखे वाटते हे चित्रपटाचे प्रमुख यश, काही सिन्स तर अगदी अंगावर येतात. पटकथा अतिशय घट्ट आहे, कुठेच ताबा सुटत नाही. स्टिंग ऑपरेशन्स, हॅण्डहेल्ड कॅमेरा असल्यामुळे कॅमेरा सतत हालतो, पडतो, कधी कधी काहीही दिसत नाही, गरगर फिरतो वगैरे पण ह्याच सगळ्या गोष्टी त्याला त्याचा परिणाम गाठुन देतात.
बॉलीवूडसाठी असा प्रामाणिक आणि वेगळा प्रयत्न केल्याबद्दक दिवाकर बॅनर्जींचे अभिनंदन करायलाच हवे. चकचकीत करमणुकची अपेक्षा केली तर निराशा येईल, आणि अर्थातच नावामुळे चित्रपटात ते पहायला मिळेल अशी अपेक्षा एकदमच फोल आहे.
नावावरुन बिचकुन जाऊ नका. हे सिनेमाचं नाव जरी हिंदी वृत्तवाहीन्याच्या तृतीय दर्जीय कार्यक्रमाचं वाटत असलं तरी हा सिनेमा उथळ विषयावर आधारीत नाही आहे.
’खोसला का घोसला’ आणि ’ओय लक्की लक्की ओय’ सारखे उत्तम चित्रपट बनविणारे दिबाकर बॅनर्जी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत, यावरुन सिनेमा उथळ नसनार अशी खात्री होती आणि अपेक्षेप्रमाणे चित्रपट खुपंच चांगला निघाला.
साधारण चित्रपट पाहतान आपण कॅमेराच्या जागी असतो, पण कॅमेरा हा सिनेमाचा, त्याच्या कथेचा भाग असतो असे फार क्वचित पाहायला मिळते. हॉलीवूडमध्ये ’क्लोवरफिल्ड’, ’माय लिटील आय’, ’द ब्लेअर विच प्रोजेक्ट’, आणि ’पॅरानॉर्मल अक्टीवीटी’ सारखे प्रयत्न वारंवार झालेले आहेत. माझ्या पाहण्यातला हिंदीतला हा पहीलाच प्रयत्न, आणि अगदी कौतुकास्पद असा.
या चित्रपटात तीन कथा कॅमेराच्या साथीनं आपल्याला दिसतात, पहिली ’लव’ प्रेमाची गोष्ट, एक तरुण दिग्दर्शक ’चोप्रा’ पद्धतीने भारावलेला चित्रपट बनवत असतो, त्याच्या कॅमेराने हा भाग आपल्याला दिसतो. दुसरी कथी , ’सेक्स’, एका छोट्याश्या मॉलमधील क्लोज सर्कीट कॅमेरांतर्फे दिसते आणि तिसरी, ’धोखा’, ही कास्टींग काऊच आणि मिडीयाच्या कॅमेरातुन दिसते.तीनही कथांमध्ये कुठे ना कुठे इतर कथांचा संदर्भ येतो पण त्याचा कथेवर काहीही परिणाम नाहीये, तीनही स्वतंत्र म्हणाव्या अश्या कथा. सुरुवातीला खेळीमेळीत जाण्यार्या, हलक्या फुलक्या प्रसंगाच्या, प्रासंगी विनोद वापरणार्या, पण शेवटाकडे अतिशय गंभीर होत जाणार्या अश्या मांडल्या आहेत, यामुळे आपल्यावर परिणाम मात्र खुप खोलवर होतो.
एकही पात्र ओळखिच्या चेहर्यांनी न केल्या मुळे आणि सर्वांनी अतिशय खरा अभिनय केल्यामुळे हा चित्रपट वाटतच नाही, वास्तवातल्याच काही घटना पाहत असल्यासारखे वाटते हे चित्रपटाचे प्रमुख यश, काही सिन्स तर अगदी अंगावर येतात. पटकथा अतिशय घट्ट आहे, कुठेच ताबा सुटत नाही. स्टिंग ऑपरेशन्स, हॅण्डहेल्ड कॅमेरा असल्यामुळे कॅमेरा सतत हालतो, पडतो, कधी कधी काहीही दिसत नाही, गरगर फिरतो वगैरे पण ह्याच सगळ्या गोष्टी त्याला त्याचा परिणाम गाठुन देतात.
बॉलीवूडसाठी असा प्रामाणिक आणि वेगळा प्रयत्न केल्याबद्दक दिवाकर बॅनर्जींचे अभिनंदन करायलाच हवे. चकचकीत करमणुकची अपेक्षा केली तर निराशा येईल, आणि अर्थातच नावामुळे चित्रपटात ते पहायला मिळेल अशी अपेक्षा एकदमच फोल आहे.
Friday, 23 April 2010
फुंक २ (२०१०)
दिग्दर्शक - मिलिंद गडागकर
परत एक राम गोपाल वर्माच्या कारखान्यातला सिनेमा, त्यात हॉरर थीम, अजुन एक भर म्हणजे सिक्वल.... पहावा का पाहू नये ? तसं पहायला गेलं तर नाविन्याची आशा फार कमी.
पण दिग्दर्शक तर नविन आहे ना? ट्राय करायला काय हरकत आहे? असेच अजुन काही प्रश्न मनात घेऊन आणि दुसरा कुठलाही चित्रपट पर्यायी नसल्यामुळे शेवटी फुंक २ पहायचं आम्ही ठरवलं.
जेव्हडं काही ऐकलं होतं त्यावरुन चित्रपटाकडुन खुप कमी आशा होत्या, आणि या अपेक्षेला चित्रपट जागला. कथा म्हणजे सरधोपट भयपटाची आहे, शहरापासुन दुर अश्या एकट्या बंगल्यात एक कुटुंब राहायला येतं, आणि मग भाग १ मध्ये मारलेल्या भुताने घेतलेला बदला.
स्पॉयलर अलर्ट..
भुत न दिसता दार अश्या पद्धतीने लावुन घेतं की कुणालाच ते उघडता येत नाही, पण सोफ्याआड लपलेले मनुष्य त्याला दिसत नाहीत. दोन मांत्रीकांना त्यांच्या घरात जाऊन मारणार्या भुताला एकाच बंगल्यातला लहान मुलांना मारता येत नाही, त्यासाठी २ तास खर्ची घालावे लागतात. भुत बदला घेताना नायकाला म्हणतं की मी तुझ्या आप्तांना तडपवुन मारणार आहे आणि प्रत्यक्षात त्यांचा वॉचमन, कामवाली बाई, दोन मांत्रीक मारण्यासाठी २ तास खर्ची घालतो, आणि बळे बळेच शेवटाला दोघांचे प्राण घेतो, शेवटतर अतर्क्यच, बायकोला मारुन बाकी फॅमिलीला निवांत सोडुन देतो.
अश्या भरमसाठ चुकांमुळे पहिल्या ४०-४५ मिनिटांनंतर सिनेमाची पकड ढिली होते, सुरुवातीला खरोखरीच काही सिनमध्ये भिती वाटते, वातावरण निर्मीतीसाठी सर्वात मदतगार ठरले ते सिनेमाचे पार्श्वसंगीत, बाकी सगळीकडे बोंबाबोंब. कॅमेरावर्क नेहमीप्रमाणे वर्मा स्टाईल, वेगळे काही नाही.
हॉलीवूडमध्ये भयपटांसाठी वेगवेगळे प्रयोग होत असताना (उदा. पॅरानॉर्मल एक्टिवीटी), अलिकडच्या काळात भयपटांची सातत्याने निर्मीती करणारे राम गोपाल वर्मा रामसेपटांच्या वर्तुळाबाहेर येऊ इच्छीत नाहीत, ’भुत’ चित्रपटाचा अपवाद सोडता, बाकी सगळे भयपट एकाच माळेचे मणी वाटतात.
सिनेमा पाहीला असेल तर माझ्या मतांशी सहमत असणारच आणि पाहीला नसेल तर अर्धे पैसे मला दया... :)

मिलिंद गडागकर,
राम गोपाल वर्मा,
हिंदी,
हॉरर
Subscribe to:
Posts (Atom)