Thursday 17 December 2009

’किल बिल’ (2003-2004)

बर्याच दिवसांपासुन ’किल बिल’ सिनेमा बद्दल ऐकुन होतो, पण पाहण्याचा कधी योग आला नाही.
’क्वेंटीन टॅरंटीनो’ दिग्दर्शक असल्यामुळे सिनेमा विशेष असणार याची अपेक्षा होती.
पण पार्ट १ आणि २ म्हणजे केवळ हिंसाचार, एकदम मसाला. 
कथा नॉन-लिनीअर आहे, कथा आहे ब्राइड (उमा थर्मन) ची जिच्या लग्न समारंभात बिल आणि त्याचे साथीदार सर्वांचा खुन करतात,  बिल ब्राइडला डोक्याजवळ गोळी मारतो.
त्यामुळे ती ४ वर्ष कोमा मध्ये जाते, नंतर ती बिल आणि साथीदारांचा कसा बदला घेते तो म्हणजे किल बिल १ आणि २.
जवळपास ४-५ तासांच्या या दोन भागात वेगवेगळ्या प्रकारच्या हाणामारीच्या पद्धती वापरल्या गेल्या आहेत, जसे चाईनीज कुंग-फ़ु, जपानीज समुराई.
अशक्य आणि अतर्क्य, फ़ॅंटसीच्या जवळ जाणार्या घटनांची रेलचेल आहे, पण डोकं नं वापरता पाहीला तर एकदम छान मसाला (हॉलिवूडी) मिळतो.
ब्राइडच्या भुमिकेत उमा थर्मन फ़िट बसली आहे,  बाकी स्टारकास्ट पण समर्पक काम करते.  एकदम स्टाइलाइज्ड लूक आहे.

ऍक्शन चा अतिरेक सहन करु शकत असाल तरच याच्या वाटेला जाणे...

2 comments:

  1. मी या चित्रपटाचे दोन्ही भाग पाहिले आहेत. प्रचंड हाणामारीने भरलेले चित्रपट आहेत. मात्र पहिल्या चित्रपटाच्या आणि दुस-या चित्रपटाच्या हाताळणीत बराच फरक वाटतो. दुसरा भाग पहायचा असेल, तर आधी पहिला भाग आवर्जुन पाहिला पाहिजे म्हणजे सर्व संदर्भ व्यवस्थित लागतात. या दोन्ही चित्रपटांतील उल्लेखनीय गोष्ट म्हणजे संगीत. साऊंड इफेक्ट इतके जबरदस्त आहेत की चित्रपटाची कथा काय याचाच मला विसर पडला होता.

    ReplyDelete
  2. खरयं, पहिल्या भागात साउंड इफ़ेक्ट्स जबरदस्त आहेत. ( छ्या!!!! मी विसरलोच!! ) :)

    ReplyDelete