Saturday, 19 December 2009

वेक अप सिड (२००९)

वेक अप सिड (२००९)
दिग्दर्शक - अयान मुखर्जी.
वेक अप सिड, गोष्ट आहे, सिडची.  सिड श्रीमंत बापाचा (वाया गेलेला) मुलगा, ज्याला आयुष्याची फ़िकर नसते.
मित्रांसोबत पार्ट्या, मजा करण्यात मग्न.  अभ्यासाचा कंटाळा, नेहेमी काठावर पास होणे वगैरे (छंद?)
वडिलांच्या कामात मदत न करता केवळ स्वच्छंदी आयुष्य जगत असतो.  एमबीए मध्ये नापास झाल्यानंतर, मित्र आणि वडिलांपासुन तो दुरावतो, रागात घर सोडतो व मुंबईला स्वत:च्या पायावर उभ्या रहायला आलेल्या आयेशा( कोंकणा सेन शर्मा) कडे जाउन राहतो.
आयेशा आणि सिड मध्ये एकाही गोष्टीचे साम्य नसते.  आयेशा स्वत:बद्द्ल आत्मविश्वास असणारी व गोल निश्चीत असणारी असते, असे असतानाही त्यांची केमिस्ट्री जमते आणि ते एकमेकात गुंतत जातात.
एकमेकांना समजुन उमजुन घेताना, घट्ट मानसिक आधार देतात, व सक्सेसफ़ुल होतात.  अयान मुखर्जीचे दिग्दर्शन पहिल्या प्रयत्नातच खुप उजवं आहे.  कलाकारांकडुन हवं ते काम करवुन घेण्यात तो यशस्वी होतो.
कोंकणा सेन शर्माचा वावर सहज आहे, दु:खि, हसरे, प्रेमळ, हळवे सारे सारे एक्सप्रेशन्स आरामात देते.  कमाल करतो तो रणबीर,  अफ़लातुन ऍक्टींग, अतीशय सहज वावर, दिसण्यापासुन ते मानसिकतेत तो सिडच्या भुमिकेत लिलया शिरतो. 
रणबीर, मानलं बुवा तुला. 
सावरीया सोडुन झाडुन सर्व सिनेमे पाहिले, झकास अभिनय करतो पठ्ठा.
उद्या ’रॉकेट सिंग’ बुक केलायं....

2 comments:

  1. रणवीरला अभिनयाची उत्तम समज आहे. त्याचा चेहराही खूप लवचिक आहे त्यामुळे विनोदी आणि गंभिर अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका तो उत्तमरित्या करतो. बचना.... आणि वेक अप.... या दोन्ही चित्रपटांत त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या नायिकांबरोबरही तो नायक म्हणून फिट्ट बसला होता. बहुतेक त्याच्या अभिनयाचाच प्रभाव असावा हा.

    ReplyDelete
  2. खरंच कांचनजी, अभिनयाची मस्त समज आहे त्याला. आजच रॉकेट सिंग पाहिला, शिक्कामोर्तब केलं त्याने.

    ReplyDelete