’क्वेंटीन टॅरंटीनो’ दिग्दर्शीत ’एनग्लोरीयस बास्टर्ड्स’ चा अनुभव एकदा घ्यायलाच हवा.
टॅरंटीनो स्टाईलचा हा सिनेमा, ’किल बिल’ प्रमाणे चॅप्टर बाय चॅप्टर उलगडतो. परत, कथा एकदम छोटीशी, ’ज्युं’ची एक छोटी सैनिक तुकडी (बास्टर्ड्स) नाझी विरुद्ध लढते, मारते.
पण ट्रीटमेंट पाहण्यासारखी आहे. बरेचसे प्रसंग लक्षात राहतात. अभिनयाच्या बाबतीत Christoph Waltz ने कमाल केली आहे, ब्रॅड पिट त्याच्या ’स्नॅच’ स्टाईल मध्ये बोलतो, त्याला जास्त वाव नाही आहे. सिनेमाचे नाव जरी बास्टर्ड्स या त्याच्या संघटनेवर असले तरी ती बर्याच वेळा बॅकग्राउंडलाच असते. सिनेमाचा शेवट तर मस्तच.जरूर बघावा असा.
No comments:
Post a Comment