Sunday, 26 June 2011

रागिनी एमएमएस ( २०११ )

दिग्दर्शक - पवन क्रिपलानी

२००७ सालच्या 'पॅरानॉर्मल ऍक्टीव्हिटी' मुळे किंबहुना त्याच्या यशामुळे थरारक चित्रपटांचा एक नवा पायंडा पडला.  अर्थात यात १९९९ सालच्या 'द ब्लेअर विच प्रोजेक्ट'चाही वाटा आहे.  हॅंडहेल्ड कॅमेरा आणि शॉर्ट सर्कीट कॅमेरा यातून हे सिनेमे घडवले जातात आणि कॅमेरा हा सिनेमाचा एक भाग म्हणून असतो ही संकल्पना.  याआधी भारतात बालाजी टेलिफिल्म्सच्याच 'लव, सेक्स और धोका' या सिनेमातून थरारक घटक वगळता उत्तम निर्मिती या संकल्पनेवर केली गेली होती.

'पॅरानॉर्मल ऍक्टीव्हिटी'शी आणि 'द ब्लेअर विच प्रोजेक्ट' या सिनेमांशी जवळीक सांगणारा आणि त्या "विदेशी" संकल्पनांना भारतीय रुपडं देणारा बालाजी टेलिफिल्म्सचा नवा "रागिनी एमएमएस" सिनेमाही मूळ सिनेंमाइतकाच प्रभावी बनला आहे.   'लव सेक्स और धोका' प्रमाणेच नावात बिचकवणारा आणि पोस्टर्सवरून काहीसा "हॉट" वाटणारा सिनेमा प्रत्यक्षात लक्षणीय थरारक भूतपट आहे.

उदय आणि रागिणी विकांत 'साजरा' करायला एका बंगल्यात जातात जो एका निर्जन वनात असतो.  उदय सिनेमात हिरो बनण्यासाठी 'पंडीत' नावाच्या माणसासाठी रागिनीचा एमएमएस बनवण्यास तयार होतो.  पंडीताच्या माणसांनी त्या बंगल्यात आधीच क्लोज सर्कीट कॅमेरे लावलेले असतात, आणि उदयही त्याच्या हॅंडहेल्ड कॅमेराने नेहमी शूट करत असतो.  मात्र त्यांना एकांत नीटसा मिळत नाही, आधी रागिनीची मैत्रीण  आणि पार्टी आणि खूद्द काही विचित्र भितीदायक प्रकार घडत जातात.  पॅरानॉर्मल प्रमाणेच आधी भितीची तिव्रता कमी आणि मग वाढत जाते.  'द ब्लेअर विच प्रोजेक्ट' मधील चेटकीणीची कथा पॅरानॉर्मल ऍक्टीव्हिटी तर्‍हेने आपल्या समोर देशी अवतारात दिसते.

सिनेमा मात्र उत्तम थरारपट आहे, जवळपास प्रत्येक क्षणी आणि मोक्याच्या जागी भिती वाटते, आणि हेच सिनेमाचं यश आहे.   दिग्दर्शकाने सिनेमाची लांबी कमी ठेऊन आणि पटकथेवर भरपूर काम करून चित्रपट कुठेच सैल होणार नाही याची उत्तम काळजी घेतली आहे.  सर्वात महत्वाचं म्हणजे उदय आणि रागिनी साकारणारे कलाकार, नवोदित असूनही त्यांनी उत्तम काम केलं आहे.   इंटिमेट सिन्स इतके खरोखर रंगवलेत की सगळं खरं वाटायला लागतं आणि त्यांच्या भितीमध्ये आपण संलग्न होतो.   वेगळा मार्ग चोखाळण्याबद्दल एकता कपूरचं स्वागत करायला हरकत नाही.

8 comments:

 1. सही लिहिलंयस. मी युट्युबवर फक्त प्रोमो बघून (रादर ऐकून) हादरलो होतो. नाही बघणार :))

  ReplyDelete
 2. एका मित्राच्या हट्टाखातर 'पॅरानॉर्मल ऍक्टीव्हिटी' पहावा लागला ..तंतरली होती.. आठ दिवस झोपताना 'ति'ची हटकून आठवण यायची..
  'द ब्लेअर विच प्रोजेक्ट' स्वतःच पहिला होता खूप पूर्वी.
  'फावुन्ड फुटेज'(Found Footage) पद्धत विचारात घेता मला
  'द ब्लेअर विच प्रोजेक्ट' जास्त चांगला वाटला..

  ReplyDelete
 3. रागिनी एमएमएस पाहीन असं वाटत नाही ..

  ReplyDelete
 4. 'द ब्लेअर विच प्रोजेक्ट' सिनेमा साठी त्यांनी प्रसिद्धी साठी ती खोटी कथा दंतकथा म्हणून आणि त्या मुलांचा मृत्यु खरा झाला अशी आवई उठवली ज्याचा फायदा सिनेमाला खूप झाला... मला वाटते रागिनी सिनेमाबद्दलही त्यांनी खोट्या गोष्टीला खरं आणि सत्यघटना असण्याचं जे सांगितलं आहे तो एक पब्लीसिटी स्टंट असावा.. काहीही असो घाबरवण्याचं काम हा सिनेमा चोख करतो :)

  ReplyDelete
 5. ह्या चित्रपटाच जेव्हा पहिला नाव ऐकल आणि ट्रेलर पाहिलं तेव्हा वाटलं च्यायला तद्दन बिग्रेड सिनेमांचे पण आता खुल्लमखुल्ला ट्रेलर यायला लागले कि काय टीवीवर ... पण नंतर कळल होर्ररपट आहे,आणि मग पाहिल्यावर ते पटल सुद्धा... बाकी पकाऊ सिरीयल्स वर सिरीयल्स काढणारी एकता सिनेमांबाबत मात्र चांगलीच चोखंदळ आहे आतापर्यंत तरी ...

  ReplyDelete
 6. एकता सिनेमांबाबत मात्र चांगलीच चोखंदळ आहे आतापर्यंत तरी ++
  अगदी खरं.. चाकोरीबाहेरचे बरेच चित्रपट काढलेत... :)

  ReplyDelete
 7. नविन आयटम सॉंग http://youtu.be/7AkSGs6zNOs

  ReplyDelete