दिग्दर्शकः गिल जंगर
बर्यापैकी टिपीकल टीन सिनेमा असूनही दिग्दर्शन, अभिनय, पटकथा या पातळींवर चांगला असल्यामुळे गिल जंगर दिग्दर्शित '१० थिंग्स आय हेट अबाउट यू' पहाणेबल झाला आहे. मी हा सिनेमा पाहीला कारण यात हिथ लेजर आहे. शेक्स्पीअरच्या 'The Taming of the Shrew' या नाटकावर आधारीत.
कॅमेरॉन (जोसेफ गॉर्डन लेविट) कॉलेजात नव्यानं दाखल होतो, आणि बिआंका या सुंदर मुलीच्या लव्ह ऍट फर्स्ट साईट प्रथेप्रमाणे प्रेमात पडतो. पण बिआंकाचे डॉक्टर वडील पदवीआधी प्रेम किंवा डेटिंगच्या विरोधात असतात. बिआंकाची बहीण कॅट (ज्युलीया स्टाईल्स) देखिल प्रेमाच्या किंबहुना मुलांच्या विरोधात असते. बिआंकाला हे सर्व पटत नसते, पण वडिलांसमोर आणि कॅट समोर तिचं चालत नाही. त्यात ती खुप आग्रह करते पण तिचे वडील एक अट टाकतात, जर कॅट डेटवर जात असेल तर बिआंकाला जाता येईल.
आता कॅटसारख्या रागीट स्वभावाच्या मुलीसाठी मुलगा शोधणं कॅमेरॉनला भाग पडतं. मग तो पॅट (हिथ लेजर) या कॅटसारख्याच स्वभावाच्या मुलाला तयार करतो, त्यासाठी जो या बिआंकावर लाईन मारणार्याकरवी. हो नाही करता पॅट आणि कॅट दोघही प्रेमात पडतात तसेच आधी जो कडे आकर्षीत असणारी बिआंका कॅट कडून जो विषयी कटू अनुभव ऐकल्यावर कॅमेरॉनच्या प्रेमात पडते. मग डेट करण्यासाठी घेतलेल्या पैश्यावरून कॅट आणि पॅट च्या संबंधात मीठाचा खडा पडतो, पण पॅट खरोखर प्रेम करू लागला आहे हे कळल्यावर परत शिरस्त्याप्रमाणे एकत्र येतात.
एकुण पुढे काय घडणार हे माहित असूनही सिनेमा बघावासा वाटतो यात ज्युलिया स्टाईल्स आणि हीथ लेजरचा महत्वाचा हात आहे. टीन सिनेमा असल्यामुळे बर्यापैकी प्रेडीक्टेबल आहे. एकदा बघायला हरकत नाही.
Wednesday, 29 September 2010
Sunday, 5 September 2010
रनिंग स्केअर्ड (२००६)
http://www.imdb.com/title/tt0404390/
दिग्दर्शक - वेन क्रेमर
थ्रीलर्स आपल्याला आवडण्यासाठी ते शेवटापर्यंत आपल्याला खिळवून ठेवणारे असावेत, वेळोवेळी अनपेक्षीत वळणं आणि उत्तम धक्के असावेत, आणि शेवटी सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळावी. या थ्रीलर्सच्या सर्वसाधारण अपेक्षेमध्ये बरेच थ्रीलर शेवटाला मात खातात. आधी कथानकात उत्तम गुंतागुंत तयार करतात, पटकथा शेवटापर्यंत अतिशय सुंदर पळते मग शेवटी दिग्दर्शक, पटकथाकार जेंव्हा गुंता सोडवायला घेतात त्यावेळी जास्त वेळ न घेता सोपे पण न पटणारे उपाय सहसा शोधले जातात. 'रनिंग स्केअर्ड' हा थ्रीलर सुद्धा इथेच अडकतो. अतिशय उत्तम गतीत बराचवेळ राहतो आणि शेवटाला ढिसाळतो.
येथील नायक जो (अत्यंत उत्तम अदाकारीत पॉल वॉकर) एका गुन्हेगारांच्या टोळीत काम करत असतो, ड्रग डिलींगच्या वेळी तिथं काही बुरखाधारी येतात, त्यांना दुसरी टोळी समजून, दोन्ही गटात गोळीबार होतो आणि एक सोडून सर्व बुरखाधारी मरण पावतात, जो आणि टोळीला लक्षात येतं की ती दुसरी टोळीची माणसं नसून ती भ्रष्ट पोलीस होती, या प्रसंगाने बावरलेला टोळी प्रमुख त्यात वापरलेल्या बंदूकींना नष्ट करण्यासाठी जो कडे देतो.
त्या शस्त्रांची विल्हेवाट लावण्याऐवजी जो ती शस्त्र आपल्या घराच्या बेसमेंटमधील एका खणीत ठेवतो, तसं करताना त्याचा मुलगा निक आणि त्याचा शेजारचा रशियन मित्र ओलेग पाहतात. तिथुन ओलेग घरी परत जातो, त्याचे विक्षीप्त वडील त्याला त्रास देतात त्यातच ओलेग त्यांच्यावर गोळी झाडतो, ती चुकते व खांद्याला लागते, गोळीबाराचा आवाज ऐकून जो त्यांच्या घरी येतो व केलेल्या वर्णनावरून त्याला लक्षात येतं की ही बंदूक त्याचीच आहे आणि ती जर पोलिसांच्या हाती लागली तर तो आणि त्याची टोळी अडचणीत येणार.
मग जो चा ओलेग आणि पर्यायाने त्या बंदूकीचा शोध, त्यात ओलेग वेगवेगळ्या अडचणींमध्ये सापडतो आणि दरवेळी त्याचा पाठलाग करताना जो आणि त्याची बायको टेरेसा (व्हेरा फर्मिंगा) त्याची सुटका करता करता अनेक अडचणीत सापडतात. या अडचणीतून ओलेग, जो आणि टेरेसा कसा मार्ग काढतात ही पुढील कथा.
सुरुवातीपासून ते शेवटच्या वीस मिनिंटापुर्वी पर्यंत सिनेमा आपल्याला अगदी सिटच्या एजवर ठेवतो, अतिशय उत्कंठावर्धक सिक्वेंसेस आहेत, दरवेळी ओलेग नविन अडचणीत येतो आणि बंदूक बर्याच लोकांच्या हातातून जाते, त्यासर्वांना शोधताना जो ची कसोटी लागते. पुर्णवेळ फॉर्मात असणारा हा सिनेमा शेवटाला मात्र गुंते सोडवताना मात्र पार कोलमडतो.
पॉल वॉकर (जो), व्हेरा फर्मिंगा (टेरेसा), कॅमेरॉन ब्राईट(ओलेग) आणि कारेल रॉडेन (ओलेगचे सावत्र वडील) यांचा अभिनय उत्तम आहे. लेखक आणि दिग्दर्शक वेन क्रेमरचं दिग्दर्शन उत्तम आहे, केवळ शेवटाचा काही भाग वगळता, यात दिग्दर्शकापेक्षा लेखक कमी पडला आहे. सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे, एका घरातून दुसर्या घरात काचातून कॅमेरा आत नेण्याची पद्धत छान वाटली आहे.
शेवटचा काही भाग वगळता अतिशय उत्तम थरारपट.

Labels:
२००६,
इंग्रजी,
गुन्हेगारीपट,
थ्रीलर,
पॉल वॉकर,
वेन क्रेमर,
व्हेरा फर्मिंगा
Wednesday, 4 August 2010
क्रॅमर वर्सेस क्रॅमर (१९७९)
दिग्दर्शक - रॉबर्ट बेन्टन
तो आज प्रचंड खुष असतो, तो काम करत असलेल्या ऍड कंपनीत सर्वोच्च महत्वाच्या क्लायंटचं काम सोपवण्यात येतं, कारण त्याची काम करण्याची क्षमता आणि झोकून देण्याची वृत्ती. या क्लायंटला जर खुष केलं तर त्याच्या कंपनीचा फायदा होणार असतो. त्या खुषीतच तो घरी येतो, ऑफिसमध्ये एक अर्जंट कॉल करत असतानाच ती त्याला एक धक्कादायक बातमी देते. ती त्याला आणि त्यांच्या लहान मुलाला सोडून जाणार असते, कारण त्याचं स्वत:पुरतं वागणं, तिच्या अस्तित्वाची दखल न घेणं, घरासाठी वेळ न देणं. ती बाहेर पडते ते स्वत:ची ओळख मिळविण्यासाठी. तो एकदम धक्क्यात, आठ वर्षाचा संसार मोडून निघालेली बायको, आजच ऑफिसात वाढलेली जवाबदारी, शाळेत जाणारं मुल, आणि त्याच्या संगोपणाचा पडलेला भार.
इतके दिवस बायको असल्यामुळे घर आणि मुल सांभाळण्याची कधीही गरज न पडलेला पण आता तिहेरी कसरत करावी लागणार म्हणुन काळजीत. आठ वर्षात कधीही बाहेर पडली नाही म्हणुन ती परत लवकर येईल अशी त्याची आशा हळूहळू मावळत जाते. या सर्वात फरफट होते त्यांच्या मुलाची. आई घेत असलेली काळजी, ती देत असलेला वेळ, तिचा समजुतदारपणा, प्रेम हे त्याला मिळेनासं होतं. त्याला आपल्या कामातून कमी वेळ मिळतो, घरकाम येत नाही, मग ब्रेकफास्ट बनवताना होणारी तारांबळ, मुलाचा हट्टीपणा, जेवण्याचे प्रॉब्लेम्स त्यातुन मुलाबरोबर होणारं भांडण अश्या समस्यात दोघे अडकतात.
पण हळूहळू काही महिन्यांत ते परिस्थितीला सामोरे जाऊन एकमेकात ऍडजस्ट व्हायला लागतात, जिव्हाळा वाढायला लागतो. मुलाला खेळता खेळता इजा पोचते तेंव्हा अक्षरश: रस्त्याने पळत त्याला हातात घेऊन तो हॉस्पीटल गाठतो, दोघांचे बंध वाढायला लागतात.
ती काही महिन्यांच्या प्रयत्नानंतर एका जॉबला लागली आहे, रोज मुलाच्या शाळेजवळ येऊन त्याला न भेटताच केवळ त्याच्याकडे बघत आहे, त्याला भेटायची तिला अनिवार इच्छा आहे. स्वत:च्या पायावर उभी राहील्यामुळे आणि आत्मविश्वास उंचावल्यामुळे तीच्या मनात आता मुलाला स्वत:कडे ठेऊन घेण्याचे येत आहे. मग ती तिच्या वकीलामार्फत त्याला लीगल नोटीस पाठवते.
मुलाच्या संगोपणामुळे ऑफिसची नवी जवाबदारी समर्थपणे न पेलू शकल्यामुळे त्याला ऑफिसमधुन काढण्यात येतं, त्यातच तीच्या नोटीस मुळे मुल जर त्याला आपल्याजवर ठेऊन घ्यायचं असेल तर अत्यंत पैश्यांची गरज असते, मग चोविस तासात त्याच्या अनुभवापेक्षा कमी मानधन आणि खालची पोजीशन असलेली नौकरी तो स्विकारतो आणि खटला लढतो.
पुढे काय होतं ते चित्रपटात पाहणंच योग्य.
क्रॅमर वर्सेस क्रॅमर चं प्रमुख यश म्हणजे नायक डस्टीन हॉफमन आणि नायिका मेरिल स्ट्रीप, जबरदस्त पटकथा आणि काही अप्रतिम सिन्स. ती गेल्यावर त्याची ब्रेकफास्ट बनविताना होणारी कसरत, शेवटी ब्रेकफास्ट सीन, मुल घसरगुडीवरून पडल्यावर त्याचं त्याला हातात घेऊन हॉस्पीटल गाठणं, भांडण झाल्यावर दुसर्या सकाळी मुलाची माफी आणि आई आपल्यामुळे सोडून गेली याची भावना, मुलाला सायकल शिकवणं, कोर्टातले सिन, आणि शेवटाचा लिफ्ट मधील सिन......
डस्टीन हॉफमनने आधीचा वर्कोहॉलीक माणुस आणि नंतरचा हळवा बाप अविस्मरणीय साकारला आहे, मेरिल स्ट्रीपची हळवी पण स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव असणारी पण मुलासाठी जीव तुटणारी आई समर्थपणे साकारली आहे, ती दिसतेही अतिशय सुंदर, त्यांना योग्य साथ आहे मुलाची आणि त्यांच्या मैत्रिणीची.
पाहणं एकदम मस्ट!
(आपल्याकडे याचा ऍव्हरेज अवतार येऊन गेला आहे 'अकेले हम अकेले तुम')

१९७९,
इंग्रजी,
ऑस्कर,
डस्टीन हॉफमन,
ड्रामा,
मेरिल स्ट्रीप,
रॉबर्ट बेन्टन
Monday, 14 June 2010
द स्पॅनिश प्रिजनर (१९९७)
दिग्दर्शक - डेव्हिड मॅमेट
IMDB : http://www.imdb.com/title/tt0120176/
can you really trust anyone?
दिसतं तसं नसतं हेच खरं, कुणावर किती भरवसा ठेवायचा, हे ठरविणे खुप कठीण काम आहे.
'स्पॅनिश प्रिजनर'या नावावरून दुसर्या देशाच्या कायद्यात फसलेल्या नायकाची कथा असावी वाटते. प्रत्यक्षात हा लक्षवेधी थरारपट 'स्पॅनिश प्रिजनर' या फसवणुकीच्या प्रकाराचा वापर करतो.
'स्पॅनिश प्रिजनर' म्हणजे स्पेन मध्ये एक श्रीमंत माणसाला फसवून तुरूंगात डांबल्या गेला असल्याची अफवा एका सावजाला सांगायची. तो तिथुन सुटण्याचा प्रयत्न करत आहे, आणि त्यासाठी त्याला काही पैसे मोजावे लागणार आहेत, तर तात्पुरती जो मदत करेल त्याला श्रीमंत माणुस सुटल्यावर जबरदस्त बक्षीस देण्याचे लालूच.
इथे जास्त माहीती आहे. यात सावजाला संशय येऊ नये म्हणुन ही बातमी सांगणार्याला अत्यंत काळजीपुर्वक सावजाचा विश्वास संपादन करायचा असतो.
या सिनेमात सावज, जो रॉस ह्याने एक अशी प्रक्रिया तयार केली असती ज्यामुळे कंपन्यांचा करोडोंचा फायदा होणार असतो, अत्यंत मेहनतीने तयार केलेल्या या प्रक्रियेमुळे आणि त्याचा महत्वामुळे ती अतिशय सुरक्षीत जागी ठेवलेली असते. जो मात्र त्याच्या मानधनाबाबत संतुष्ट नसतो. वारंवार विचारूनही कंपनीचे मालक त्याला मानधनाविषयी जास्त काही सांगत नाही,केवळ योग्य वेळी योग्य मिळेल यावर बोळवण करीत असतात.
एका व्यावसायिक सहलीवर जो'ची ओळख अतिशय श्रीमंत उद्योगपती जिमी डेल बरोबर होते, जिमी सोबत ओळ्ख वाढवताना जिमी त्याला त्याच्या प्रक्रियेबद्दल कंपनी जास्त पैसे देणार नाही, आणि त्याने ओळखीच्या वकीलाचा सल्ला घ्यावा असे सांगतो, प्रक्रियेची मुळ प्रत सुद्धा सोबत आणायला सांगतो. दरम्यान कंपनीत नव्याने रुजू झालेली एक मुलगी सुसानशी जो'ची जवळीक वाढायला लागलेली असते, ती मात्र जिमीच्या वागण्यावर शंका घेत असते.
त्यातच जो'ला जिमी हा फसविणारा आहे असे कळते आणि तो एफबीआय एजंटला बोलतो, आणि ते जिमीला पकडण्यासाठी सापळा रचतात, पण जो ज्यांना बोलावतो आणि विश्वासाने प्रत त्यांकडे देतो ते एफबीआयचे एजंट नसून फसवेच असतात. त्यातच त्याला सहकार्याच्या खुनाच्या आरोपात अत्यंत शिफातीने गोवण्यात येते. तिथुन तो पळुन जातो व सुसानची मदत घेऊन जिमीचं रहस्य उघडायला आणि स्वतःला निष्पाप सिद्ध करायला जातो, त्यात तो यशस्वी होतो का, हा सिनेमाचा पुढचा भाग.
सिनेमा अतिशय उत्कंटावर्धक आहे, सुरुवातीच्या सत्रात थोडा संथ आहे, पण पहील्या २० मिनिटांनंतर मस्त वेग पकडतो. पटकथा अतिशय घट्ट विणली आहे आणि कुठेही सैल होत नाही. अगदी शेवटच्या मिनिटांपर्यंत पटकथेत वळणं, धक्के आहेत. कुठेही सिनेमा प्रेडिक्टेबल होत नाही. अभिनयात सर्वांनी कमाल केली आहे, नेहमी विनोदी भुमिकेत असणार्या स्टीव मार्टीनने सुद्धा गंभीर अभिनय चांगल्या रितीने केलाय.
चांगला थरारपट पाहण्याची इच्छा असेल तर पहावाच असा.

१९९७,
इंग्रजी,
गुन्हेगारीपट,
डेव्हिड मॅमेट,
थ्रीलर,
स्टीव मार्टीन
Sunday, 13 June 2010
500 डेज ऑफ समर (२००९)
दिग्दर्शक - मार्क वेब
IMDB : http://www.imdb.com/title/tt1022603/
बॉलीवूडची सर्वात घासुन गुळगुळीत झालेली कहाणी कोणती? दोन जीवांच प्रेम.. त्यात मुलगा प्रेमावर विश्वास न ठेवणारा.. आणि मुलगी प्रेमावर आंधळा विश्वास ठेवणारी... सरतेशेवटी मुलाचाही प्रेमावर विश्वास बसणार आणि गोष्ट सफळ संपुर्ण होणार.. ह्याच बॉलीवूडी कंसेप्टवर आधारीत असणारा पण वेगळेपण जपणारा '५०० डेज ऑफ समर' हा हॉलीवूडी चित्रपट एक सुंदर रोमॅन्टीक ड्रामा आहे.
ह्यात नायक टॉम प्रेमावर विश्वास ठेवणारा असतो, तर नायिका समर ही प्रेमावर विश्वास न ठेवणारी असते. समरला नाती, त्यानंतर येणारी जवाबदारी, होणारी फसवणुक मंजुर नसते. टॉम हा आर्कीटेक्टचं शिक्षण घेतलेला पण पोटासाठी ग्रीटींग कार्ड बनविणार्या कंपनीत काम करणारा असतो. तिथे त्याची ओळख समर हिच्याशी होते....पहाताक्षणीच त्याचं प्रेम तिच्यावर जडतं.... पण समरचा प्रेमावर, नात्यांवर विश्वास नसतो...
प्रेम आणि नातं यावरुन दोघात वाद होतात तरीही केवळ सोबत असताना चांगले वाटत असल्यामुळे त्यांची जवळीक कायम राहते, पण अशाच एका वादामुळे ते दुरावतात.. टॉमला याची टोचणी राहते.. समर तो जॉब सोडते.
एका जुन्या कलीगच्या लग्नाला जाताना प्रवासात टॉम आणि समर भेटतात. परत थोडेसे जवळ येतात, तिथेच समर टॉमला घरी पार्टीसाठी बोलावते. त्या पार्टीत टॉम समरकडे जातो पण तिच्या बोटात एंगेजमेंट अंगठी पाहुन तिथुन निघुन जातो. अतिशय विमन्सक अवस्थेत जॉब सोडतो आणि दारूच्या आहारी जातो.
मग हळूहळू स्वतःला सावरून आपल्या आर्कीटेक्ट विषयाकडे वळतो व त्या क्षेत्रात नौकरी शोधायला लागतो..
इथे कथा सरळ सांगितली असली तरी चित्रपटात ती उलट सुलट दाखविली आहे. टॉम आणि समरचे हे संबंध ५०० दिवस चालतात (५०० डेज ऑफ समर म्हणुन चित्रपटाचे नाव). चित्रपटात आधी दिवसाचा नंबर देऊन त्यादिवशीची कथा दाखविली आहे... ही नॉन लिनीअर मांडणी छान वाटते, मुख्य इथे जुळते.
चित्रपटात टॉम आणि समर निभावलेले कलाकार जोसेफ गॉर्डोन आणि झोयी सुंदर भुमिका करतात. झोयी तर अप्रतिम, समरच्या भुमिकेत अगदी फिट्ट. दिग्दर्शन सुद्धा चांगलं आहे, प्रेमात असताना 'होम सेंटर' टाईप मॉलमध्ये फिरताना नविन जोडप्याप्रमाणे तिथेच काल्पनिक संसार मस्त रंगविला आहे.. मजा येते ते पाहताना. प्रेम जुळल्यावर टॉमवर अगदी टिपिकल बॉलीवूड पटांप्रमाणे एक गाणे चित्रीत केले आहे, रस्त्यावर तो गाणे गातो, रस्त्यावरचे लोकं त्यात सामिल होतात वगैरे... हॉलीवूडच्या हिरोवर हे गाणं वेगळंच वाटतं..
सिनेमा संपतो सुद्धा एका गोड शेवटासहीत, पाहणेबल आहे.

Sunday, 30 May 2010
कार्तिक कॉलींग कार्तिक (२०१०)
दिग्दर्शक - विजय लालवानी.
दिल चाहता है, लक्ष्य, डॉन, हनिमुन ट्रॅवल्स प्रा.लि., रॉक ऑन, आणि लक बाय चान्स असे जवळपास सुंदर सिनेमा देणार्या एक्सेल एंटरटेन्मेंटचा या वर्षीचा सिनेमा 'कार्तिक कॉलींग कार्तिक' त्याच्या प्रोमोजवरुन एक चांगला थ्रीलर असल्याची साक्ष देत होता. कुणाला एक फोन येतो, त्यात बोलणार्याचा आवाज अगदी तसाच असतो, त्याला आपली सगळी रहस्ये, गुप्त माहिती माहित असते, थोडक्यात आपल्याला आपणच कॉल करतोय ही सुंदर कल्पना आहे एका थ्रीलरपटाची.
'कार्तिक कॉलींग कार्तिक' मध्ये कार्तिक (फरहान अख्तर) अतिशय साधा, नाकासमोर चालणारा असतो. चांगुलपणामुळे जास्तीची कामे ओढुन घेणे, काम करूनही बॉसचा ओरडा खाणे, कुणी मित्र नसने, ऑफिसात काडीचीही किंमत नसने, घरमालकाने सतावणे अश्या असंख्य समस्यांनी ग्रस्त असतो. यातच त्याला एक नेहमी स्वप्न पडत असते ज्यात त्याचा त्रास देणारा भाऊ विहिरीत पडुन मरतो. या मृत्यु साठी कार्तिक स्वतःला दोषी समजत असतो. यासाठी तो मानसोपचार तज्ञाची मदत सुद्धा घेत असतो.
एकदा रात्रभर जागुन काम करुन देखील बॉस कार्तिकला फोनवर खुप सुनावतो, आणि त्याला नोकरीवरुन कमी करतो. रागाच्या भरात कार्तिक फोन तोडतो आणि राग शांत झाल्यावर नविन फोन बसवतो.
दुसर्या दिवशी सकाळी एका फोन कॉल मुळे त्याची झोपमोड होते, कॉल उचलल्यावर पलीकडुन कार्तिक म्हणजे त्याचा स्वतःचाच कॉल असल्याचे त्याला कळते. पहिल्याप्रथम त्याला हे सर्व खोटं; एक विनोद वाटतो. पण फोन करणारा अशी काही सिक्रेट्स सांगतो जी केवळ कार्तिकलाच माहित असतात. त्या कॉलरचा आवाज देखील कार्तिक सारखाच असतो.
तो कॉलर कार्तिकला त्याच्या सर्व पेचप्रसंगातुन सोडवितो. त्याला जशास तसे वागायला शिकवितो. त्याचं प्रेम मिळवुन देतो, पण त्याबरोबर एक अट देखिल ठेवतो, की हा कॉल त्याला येतो हे कुणाला सांगायचं नाही.
कार्तिक प्रेमापुढे झुकुन प्रेयसीला हे सगळं सांगतो आणि मग तो कॉलर कार्तिकलाच संपवायला निघतो.
हा कॉलर कोण? आणि पुढे कार्तिकचे काय होते हा सिनेमाचा उत्तरार्ध.
सिनेमा एक उत्तम थरारपट आहे. शेवटपर्यंत आपल्याला खिळवुन ठेवतो. सिनेमाच्या डार्क फ्रेम्स रहस्यात गुढतेची भर टाकतात. मात्र थरारपटाच्या उत्सुकतेत अनावश्यक गाणी (ऐकायला बरी असुन) आणि थोडं लांबविलेले प्रेमप्रकरण व्यत्यय आणते. पण सिनेमा तगतो तो फरहान अख्तरच्या अतिशय प्रामाणिक अभिनयावर. सरळ साधा कार्तिक त्याने उत्तम रंगविला आहे, घाबरणारा कार्तिक आणि नंतर आत्मविश्वासाने वागणारा कार्तिक त्यांने व्यवस्थित रंगविला आहे.
पण त्याचं हे ट्रांस्फोर्मेशन अगदी फिल्मी दाखविले गेले आहे. उदा. नोकरीवरुन काढल्यावर तो बॉसच्या केबिन मध्ये जातो, टेबलावरची क्लाईंट फाईलचे पहीले एक-दोन पानं वाचुन त्यात तब्बल १२ चुका आहेत हे काही सेकंदात सांगतो वगैरे. पण त्याकडे आपले जास्त लक्ष जात नाही. विजय लालवानींना सिनेमाचे श्रेय द्यायलाच हवे, पहिल्या सिनेमातच त्यांनी आपली छाप पाडली आहे. दिपिका पडुकोन, राम, बाकी सहकलाकार योग्य.
एकुणात हिन्दी मध्ये काहीतरी वेगळं पाहण्याची इच्छा असेल तर जरुर पाहाण्याजोगा.

२०१०,
थ्रीलर,
दिपिका पडुकोन,
फरहान अख्तर,
विजय लालवानी,
हिंदी
Sunday, 23 May 2010
काईट्स (२०१०)
दिग्दर्शक - अनुराग बसू
राकेश रोशनचा सिनेमा, ऋतिक, जोडीला मेक्सिकन हॉटी बार्बरा मोरी आणि जोडीला सुमधुर संगीत या सर्व गोष्टींमुळे अत्युच्य अपेक्षा असलेला काईट्स सिनेमा.
मी स्वत: सिनेमाला जाताना फारशा अपेक्षेने गेलो नाही, कारण राकेश रोशनचे सिनेमे हिंदी सिनेमांच्या टिपिकलनेस मध्येच जास्त रमतात, त्यामुळे वेगळे काही असण्याची अपेक्षा नव्हतीच.
सिनेमाची नायीका मेक्सिकन आहे आणि जाहीराती पाहुन सिनेमा वेगळा असावा असे वाटले, पण असे काहीही नाही, सिनेमा एक नेहमीचीच प्रेमकथा आहे.
कथा म्हणजे जे(हो, हे ऋतिकचे नाव आहे) हा अमेरिकेतल्या लासव्हेगास या शहरात डान्सर असतो, त्याच बरोबर त्याच्या एका मित्राबरोबर अमेरिकेत ज्या मुलींना ग्रिनकार्ड हवे आहे, त्यांच्यासोबत लग्न करुन त्यांना कार्ड मिळवुन देऊन दलाली मिळवणारा असतो. श्रीमंत होण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असणारा जे, प्रसिद्ध कसिनोच्या मालकाच्या मुलीला (कंगना) पटवितो व तिच्यासोबत लग्नाचा घाट घालतो, याच वेळी टोनी ह्या कंगनाच्या भावासोबत नताशा (बार्बरा मोरी) ही सुद्धा जवळीक साधते. पण जे चे नताशावर आधीच प्रेम असते( तिला आगोदर त्याने ग्रीनकार्ड मिळवुन दिलेले असते), मग ’जे’ला प्रेमाचा साक्षात्कार होतो आणि तो टोनीशी वैर पत्करुन नताशाचे प्रेम मिळविण्याकरीता सर्वांशी लढतो, त्यात तो यशस्वी होतो का नाही, हा पुढचा सिनेमा.
ही कथा नविन नक्कीच नाही, बरं कथानकात काही टप्पे, वळणं नाहीत, एकदम सरधोपटपणे कथा समोर सरकते. मात्र सरधोपट कथानकाला (किंबहुना पटकथेला) थोडाबहुत सावरतो तो सिनेमाचा लूक.
एकदम स्टाईलाइज्ड लूक दिला आहे सिनेमाला. सरळ कथानक न दाखवता फ्लॅशबॅक अधुन मधुन वापरुन, थोडी उत्सुकता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे पण कथानक त्यावर सराईतपणे बोळा फिरवितो. साहसदृष्ये अप्रतिम असली तरी कुठेतरी ते खोटं आहे ही भावना राहतेच. पावसात गुंडांना स्टेनगनने ऋतिक ज्यापद्धतीने मारतो (तो दुसरा विचार करत आहे, आणि तो सिनेमाचा हिरो आहे हे त्याला माहित असल्यागत १०-१२ मुळ गॅन्गस्टर लोकांचे नेम चुकतात, तो निधड्या छातीने सगळ्यांवर चाल करून जातो आणि त्याला साधं खरचटत देखील नाही) ते नक्कीच पटत नाही. परत फ्लॅशबॅकमुळे पाठलाग सुरु असताना मध्येच प्रेमकथेमुळे चित्रपट स्लो होतो, त्यात परत गाणी येतात. गाणी जरी बर्यापैकी असली आणि त्यांचे चित्रिकरण उत्तम असले तरी तिथे ती जागा चुकल्यासारखी वाटतात.
या कथेकडे पाहता, बार्बरा मोरी ऐवजी एखादी हिन्दी नायिका असली असती तर काहीच फरक पडला नसता, मग विदेशी नायिकेची गरज पटत नाही, असे असले तरी बार्बरा मोरी हिचं काम मात्र सुंदर झाले आहे. ती दिसते सुद्धा छान, अपवाद काही सिनचा जिथे ती थोडी ओव्हरएजेड वाटते. ऋतिक आणि तिची जोडी उत्तम वाटली आहे, दोघांना एकत्र पाहणे ही एक ट्रीट आहे. अपेक्षेप्रमाणेच ऋतिक सिनेमाचा श्वास आहे आणि तो त्याप्रमाणे जबरदस्त अदाकारी दाखवितो. एक विशेष गोष्ट म्हणजे केवळ हिंदी सिनेमा आहे म्हणुन बार्बराच्या तोंडी टिपिकल (स्पॅनिश) हिन्दी संवाद नाही आहेत, तिला तिच्या स्पॅनिश ऎसेंट मध्ये बोलायला वाव दिला आहे. खाली इंग्रजी सबटायटल्स आहेत ज्याचा थोडा प्रतिकुल परिणाम होऊ शकतो, पण सिनेमात विदेशी लोकं बोलतात तश्या कंटाळवाण्या हिन्दी पासुन आपण वाचतो. पण यात देखील एक मेख आहेच, प्रत्येक स्पॅनिश संवादाला सबटायट्ल्स न देता मर्जीप्रमाणे काही संवादांना ते काटले आहेत, त्याचंही कारण आहे, जे संवाद नायकाला नाही समजले ते आपल्याला देखिल समजू नये, पण हा प्रकार वात आणतो, मोरी बोलताना दरवेळेस आपले लक्ष सबटायट्ल्स कडे जात असल्यामुळे आणि क्वचित ते दिले नसल्यामुळे थोडा अपेक्षाभंग होतो.
कंगना आणि कबिर बेदी सारख्या कलाकारांना अक्षरश: वाया घातले आहे. प्रमुख खलनायक निक ब्रॉउन अक्रस्ताळी भुमिका तितक्याच अक्रस्ताळेपणाने निभावतो. बाकी सहकलाकारांचा अभिनयसुद्धा जाणविण्या इतपत कच्चा वाटतो. एकुणात अपेक्षाभंग करणारा अनुभव.

ऋतिक,
कंगना,
ड्रामा,
बार्बरा मोरी,
राकेश रोशन,
राजेश रोशन,
रोमान्स,
हिंदी
Saturday, 1 May 2010
लव, सेक्स और धोखा (२०१०)
दिग्दर्शक - दिबाकर बॅनर्जी
नावावरुन बिचकुन जाऊ नका. हे सिनेमाचं नाव जरी हिंदी वृत्तवाहीन्याच्या तृतीय दर्जीय कार्यक्रमाचं वाटत असलं तरी हा सिनेमा उथळ विषयावर आधारीत नाही आहे.
’खोसला का घोसला’ आणि ’ओय लक्की लक्की ओय’ सारखे उत्तम चित्रपट बनविणारे दिबाकर बॅनर्जी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत, यावरुन सिनेमा उथळ नसनार अशी खात्री होती आणि अपेक्षेप्रमाणे चित्रपट खुपंच चांगला निघाला.
साधारण चित्रपट पाहतान आपण कॅमेराच्या जागी असतो, पण कॅमेरा हा सिनेमाचा, त्याच्या कथेचा भाग असतो असे फार क्वचित पाहायला मिळते. हॉलीवूडमध्ये ’क्लोवरफिल्ड’, ’माय लिटील आय’, ’द ब्लेअर विच प्रोजेक्ट’, आणि ’पॅरानॉर्मल अक्टीवीटी’ सारखे प्रयत्न वारंवार झालेले आहेत. माझ्या पाहण्यातला हिंदीतला हा पहीलाच प्रयत्न, आणि अगदी कौतुकास्पद असा.
या चित्रपटात तीन कथा कॅमेराच्या साथीनं आपल्याला दिसतात, पहिली ’लव’ प्रेमाची गोष्ट, एक तरुण दिग्दर्शक ’चोप्रा’ पद्धतीने भारावलेला चित्रपट बनवत असतो, त्याच्या कॅमेराने हा भाग आपल्याला दिसतो. दुसरी कथी , ’सेक्स’, एका छोट्याश्या मॉलमधील क्लोज सर्कीट कॅमेरांतर्फे दिसते आणि तिसरी, ’धोखा’, ही कास्टींग काऊच आणि मिडीयाच्या कॅमेरातुन दिसते.
तीनही कथांमध्ये कुठे ना कुठे इतर कथांचा संदर्भ येतो पण त्याचा कथेवर काहीही परिणाम नाहीये, तीनही स्वतंत्र म्हणाव्या अश्या कथा. सुरुवातीला खेळीमेळीत जाण्यार्या, हलक्या फुलक्या प्रसंगाच्या, प्रासंगी विनोद वापरणार्या, पण शेवटाकडे अतिशय गंभीर होत जाणार्या अश्या मांडल्या आहेत, यामुळे आपल्यावर परिणाम मात्र खुप खोलवर होतो.
एकही पात्र ओळखिच्या चेहर्यांनी न केल्या मुळे आणि सर्वांनी अतिशय खरा अभिनय केल्यामुळे हा चित्रपट वाटतच नाही, वास्तवातल्याच काही घटना पाहत असल्यासारखे वाटते हे चित्रपटाचे प्रमुख यश, काही सिन्स तर अगदी अंगावर येतात. पटकथा अतिशय घट्ट आहे, कुठेच ताबा सुटत नाही. स्टिंग ऑपरेशन्स, हॅण्डहेल्ड कॅमेरा असल्यामुळे कॅमेरा सतत हालतो, पडतो, कधी कधी काहीही दिसत नाही, गरगर फिरतो वगैरे पण ह्याच सगळ्या गोष्टी त्याला त्याचा परिणाम गाठुन देतात.
बॉलीवूडसाठी असा प्रामाणिक आणि वेगळा प्रयत्न केल्याबद्दक दिवाकर बॅनर्जींचे अभिनंदन करायलाच हवे. चकचकीत करमणुकची अपेक्षा केली तर निराशा येईल, आणि अर्थातच नावामुळे चित्रपटात ते पहायला मिळेल अशी अपेक्षा एकदमच फोल आहे.
नावावरुन बिचकुन जाऊ नका. हे सिनेमाचं नाव जरी हिंदी वृत्तवाहीन्याच्या तृतीय दर्जीय कार्यक्रमाचं वाटत असलं तरी हा सिनेमा उथळ विषयावर आधारीत नाही आहे.
’खोसला का घोसला’ आणि ’ओय लक्की लक्की ओय’ सारखे उत्तम चित्रपट बनविणारे दिबाकर बॅनर्जी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत, यावरुन सिनेमा उथळ नसनार अशी खात्री होती आणि अपेक्षेप्रमाणे चित्रपट खुपंच चांगला निघाला.
साधारण चित्रपट पाहतान आपण कॅमेराच्या जागी असतो, पण कॅमेरा हा सिनेमाचा, त्याच्या कथेचा भाग असतो असे फार क्वचित पाहायला मिळते. हॉलीवूडमध्ये ’क्लोवरफिल्ड’, ’माय लिटील आय’, ’द ब्लेअर विच प्रोजेक्ट’, आणि ’पॅरानॉर्मल अक्टीवीटी’ सारखे प्रयत्न वारंवार झालेले आहेत. माझ्या पाहण्यातला हिंदीतला हा पहीलाच प्रयत्न, आणि अगदी कौतुकास्पद असा.

तीनही कथांमध्ये कुठे ना कुठे इतर कथांचा संदर्भ येतो पण त्याचा कथेवर काहीही परिणाम नाहीये, तीनही स्वतंत्र म्हणाव्या अश्या कथा. सुरुवातीला खेळीमेळीत जाण्यार्या, हलक्या फुलक्या प्रसंगाच्या, प्रासंगी विनोद वापरणार्या, पण शेवटाकडे अतिशय गंभीर होत जाणार्या अश्या मांडल्या आहेत, यामुळे आपल्यावर परिणाम मात्र खुप खोलवर होतो.
एकही पात्र ओळखिच्या चेहर्यांनी न केल्या मुळे आणि सर्वांनी अतिशय खरा अभिनय केल्यामुळे हा चित्रपट वाटतच नाही, वास्तवातल्याच काही घटना पाहत असल्यासारखे वाटते हे चित्रपटाचे प्रमुख यश, काही सिन्स तर अगदी अंगावर येतात. पटकथा अतिशय घट्ट आहे, कुठेच ताबा सुटत नाही. स्टिंग ऑपरेशन्स, हॅण्डहेल्ड कॅमेरा असल्यामुळे कॅमेरा सतत हालतो, पडतो, कधी कधी काहीही दिसत नाही, गरगर फिरतो वगैरे पण ह्याच सगळ्या गोष्टी त्याला त्याचा परिणाम गाठुन देतात.
बॉलीवूडसाठी असा प्रामाणिक आणि वेगळा प्रयत्न केल्याबद्दक दिवाकर बॅनर्जींचे अभिनंदन करायलाच हवे. चकचकीत करमणुकची अपेक्षा केली तर निराशा येईल, आणि अर्थातच नावामुळे चित्रपटात ते पहायला मिळेल अशी अपेक्षा एकदमच फोल आहे.
Friday, 23 April 2010
फुंक २ (२०१०)
दिग्दर्शक - मिलिंद गडागकर
परत एक राम गोपाल वर्माच्या कारखान्यातला सिनेमा, त्यात हॉरर थीम, अजुन एक भर म्हणजे सिक्वल.... पहावा का पाहू नये ? तसं पहायला गेलं तर नाविन्याची आशा फार कमी.
पण दिग्दर्शक तर नविन आहे ना? ट्राय करायला काय हरकत आहे? असेच अजुन काही प्रश्न मनात घेऊन आणि दुसरा कुठलाही चित्रपट पर्यायी नसल्यामुळे शेवटी फुंक २ पहायचं आम्ही ठरवलं.
जेव्हडं काही ऐकलं होतं त्यावरुन चित्रपटाकडुन खुप कमी आशा होत्या, आणि या अपेक्षेला चित्रपट जागला. कथा म्हणजे सरधोपट भयपटाची आहे, शहरापासुन दुर अश्या एकट्या बंगल्यात एक कुटुंब राहायला येतं, आणि मग भाग १ मध्ये मारलेल्या भुताने घेतलेला बदला.
स्पॉयलर अलर्ट..
भुत न दिसता दार अश्या पद्धतीने लावुन घेतं की कुणालाच ते उघडता येत नाही, पण सोफ्याआड लपलेले मनुष्य त्याला दिसत नाहीत. दोन मांत्रीकांना त्यांच्या घरात जाऊन मारणार्या भुताला एकाच बंगल्यातला लहान मुलांना मारता येत नाही, त्यासाठी २ तास खर्ची घालावे लागतात. भुत बदला घेताना नायकाला म्हणतं की मी तुझ्या आप्तांना तडपवुन मारणार आहे आणि प्रत्यक्षात त्यांचा वॉचमन, कामवाली बाई, दोन मांत्रीक मारण्यासाठी २ तास खर्ची घालतो, आणि बळे बळेच शेवटाला दोघांचे प्राण घेतो, शेवटतर अतर्क्यच, बायकोला मारुन बाकी फॅमिलीला निवांत सोडुन देतो.
अश्या भरमसाठ चुकांमुळे पहिल्या ४०-४५ मिनिटांनंतर सिनेमाची पकड ढिली होते, सुरुवातीला खरोखरीच काही सिनमध्ये भिती वाटते, वातावरण निर्मीतीसाठी सर्वात मदतगार ठरले ते सिनेमाचे पार्श्वसंगीत, बाकी सगळीकडे बोंबाबोंब. कॅमेरावर्क नेहमीप्रमाणे वर्मा स्टाईल, वेगळे काही नाही.
हॉलीवूडमध्ये भयपटांसाठी वेगवेगळे प्रयोग होत असताना (उदा. पॅरानॉर्मल एक्टिवीटी), अलिकडच्या काळात भयपटांची सातत्याने निर्मीती करणारे राम गोपाल वर्मा रामसेपटांच्या वर्तुळाबाहेर येऊ इच्छीत नाहीत, ’भुत’ चित्रपटाचा अपवाद सोडता, बाकी सगळे भयपट एकाच माळेचे मणी वाटतात.
सिनेमा पाहीला असेल तर माझ्या मतांशी सहमत असणारच आणि पाहीला नसेल तर अर्धे पैसे मला दया... :)

मिलिंद गडागकर,
राम गोपाल वर्मा,
हिंदी,
हॉरर
Tuesday, 13 April 2010
स्वदेस, वुई द पिपल (२००४)
दिग्दर्शक - आशुतोष गोवारीकर
अरविंद पिल्ललमरी आणि रवी कुचिमंची या एनआरआय जोडगोळींच्या कार्यावर आधारीत २००४ सालचा आशुतोष गोवारीकरांचा ’स्वदेस’ माझ्या आवडत्या हिंदी चित्रपटांच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. देशाबद्दलची थीम असुनदेखील बेगडी देशप्रेमाला दिलेला फाटा, आणि भारताच्या सद्यस्थितीचे उत्तम केलेले अवलोकन याच्या जमेच्या बाजु. भारताने प्रगती जरी केलेली असेल तरी अजुनही ७०% ग्रामीण भारत अजुनही मागासलेला आहे. शिक्षणसमस्या, वीजटंचाई, दारिद्र्य, बाल विवाह आणि सर्वात महत्वाची जाती व्यवस्था या सर्व समस्या, माणसांचे स्वभाव विशेष यासर्वांना हा चित्रपट स्पर्शतो.
कथा म्हणजे, अमेरीकेत नासा शास्त्रज्ञ असलेला मोहन भार्गव (शाहरुख खान) आपल्या लहानपणी सांभाळ केलेल्या कावेरीअम्मांना अमेरीकेत घेवुन जाण्यासाठी येतो, आणि भारतातिल खेड्यातल्या अनेक समस्यांसोबत त्याची ओळख होते. अमेरीकेत राहील्यामुळे त्या बद्दल त्याला वाटणारे आश्चर्य, गावातील लोकांचे दुर्लक्ष, अनेकविध स्वभावाचे नमुने, प्रसंगी आलेली निराशा आणि काढलेला मार्ग यातुन सिनेमाची घडण होते.
सिनेमाचे एक-एक सिन्स वर्णन करण्याजोगे आहेत, सगळ्यात भावलेला प्रसंग म्हणजे, शेतकर्याच्या गावाहुन परत येणार्या मोहनची रेल्वे एका स्टेशनवर थांबते, त्या उन्हाच्या वेळी एक ८-९ वर्षाचे पोर २५ पैश्याला पाणी विकत असते, नेहमी बाटलीबंद (मिनरल वॉटर) पाणी पिणारा मोहन डबडबलेल्य डोळ्यांनी ते पाणी पितो. हा पाहण्यासारखा सिन आहे. हरीदास या शेतकर्याची दैना ऐकुन अतिशय दु:खी झालेला मोहन शाहरुखने केवळ चेहर्याने दाखवलाय, एकही शब्द न बोलता.
केवळ व्यवसाय बदलला म्हणुन एका कुटुंबाला देशोधडीला लावण्यात येते, घरात मुलांच्या अंगावर वितभर कपडे नसताना देखिल अतिथी देवो भव: म्हणुन पाहुण्यांना अन्न देणे तो गरीब कर्तव्य समजतो, तर सरासर अन्याय असणार्या गोष्टींना समाज रीत समजतो.

दसर्याच्या दिवशी शाळेतल्या कार्यक्रमा दरम्यान अमेरिका कशी आहे याबद्दल गावकर्यांसोबत मोहनची चर्चा ’मेरा भारत महान’ वाल्यांनी ऐकायलाच हवी. त्यातले मोहनचे ’जब भी हम मुकाबले में कम पडते है तो हम संस्कृती, परंपरा का आधार लेते है’ हे खासच. मोहन निर्भयपणे म्हणतो ’मुझे नही लगता हमारा देश दुनियाका सबसे महान देश है, लेकीन ये जरुर मानता हुं के हममें वो काबिलियत है, अपने देश को महान बनाने की’... बेगडी देशप्रेमापेक्षा हे झणझणीत अंजन खरंच उपयोगाचं आहे.
एकीकडे भारतातले सुशिक्षीत अमेरीकेत जाउन नासा सारख्या संस्थेमध्ये काम करत असताना गावात साधी वीज नसावी? इंटरनेट, इमेल्स त्यांना परग्रहावरचे शब्द वाटावेत?
ब्राम्हण असणे म्हणजे केवळ पुजापाठ करावी? खालच्या(?) जातींच्या लोकांना माणुस म्हणुन वागणुक नाही? ’संस्कृती’ बद्दल इतका अभिमान तरी वृद्धाश्रम भरलेले कसे? मुलींच्या शिक्षणाबद्दल उदासिनता.. एक-न-एक अनेक समस्या आपल्याला अस्वस्थ करुन सोडतात. या गोष्टी मोहन या अमेरिकेत राहणार्या माणसाला कळतात पण इथलेच लोक त्याबद्दल अतिव कोरडे असतात.
शास्त्रज्ञ असल्यामुळे शेवटचा वीज निर्मीतीचा प्रसंग केवळ हिरो असल्यामुळे सक्सेस झाल्याची भावना नाही येत. हे अजुन एक चित्रपटाचे यश. एकदम शेवटची फिल्मी झालर सोडता संपुर्ण चित्रपट मला खुप भावतो.
३ तासांच्या या सिनेमात आशुतोष गोवारिकरने कमाल केली आहे, सिनेमा थोडाही कंटाळवाना होत नाही. आशुतोषची प्रत्येक गोष्ट तपशिलवार दाखविण्याची सवय आहे, गावच्या इतिहासापासुन प्रत्येक समस्येच्या मुळाशी तपशिलवारपणे तो जातो. शाहरुख नासाचा शास्त्रज्ञ असल्यमुळे खर्या नासामध्ये शुटींग केलेली आहे, आणि नासाच्या खर्याखुर्या प्रोजेक्टचे नाव सिनेमात वापरले आहे. शाहरुख खानच्या संयत अभिनयामागे आशुतोषचा खंबीर हात आहे. मी पाहीलेली शाहरुखची ही सर्वात उत्तम अदाकारी. गायत्री जोशी वगळता बाकी सर्वांचा अभिनय उत्तम झाला आहे.
गाणी सगळी श्रवणीय असली तरी सावरियां हे कापायला हवं होतं. पार्श्वसंगीत अगदी साजेसं आहे, चित्रपटाच्या मुड नुसार मन काळवंडुन टाकतं आणि हलक्या सिन्सला फुलवतं.
केवळ राजकारणी आणि इतरांना दोष देत बसुन न राहता केल्याने होत आहे चा संदेश देणारा हा सिनेमा संग्रही असावा असाच आहे.

Sunday, 11 April 2010
ट्रायांगल (२००९)

कधी स्वत:चा सामना केला? स्वत:ला समोर बघुन काय अवस्था होईल? तुम्ही एका अनोळखी जागी जाता, पण आत कुठेतरी वाटतेय की आधी इथे भेट दिली आहे? काही वेळापुर्वी घडलेले प्रसंग परत घडत आहेत? आपल्या जीवनात असे काही विचित्र घडले तर आपली काय अवस्था होईल, ’ट्रायांगल’ हा सिनेमा अशीच एक गुंतागुंतीची कथा आहे...
जेस आपल्या आजारी मुलामुळे कायम दु:खी असते, ग्रेग तिचा मित्र तिला स्वत:च्या बोट वर समुद्र सफरीसाठी आमंत्रित करतो, जेणेकरुण एका दिवसाकरिता ती थोडी रिलॅक्स होऊ शकेल. त्याच बोटीवर ग्रेगचे मित्र सॅली, डॉवनी, हिथर आणि त्याचा सहायक विक्टर सुध्दा सफरीला निघतात.
आरामात त्यांची सफर चालु असताना एकाएकी हवा स्थिर होते, त्यामुळे त्यांची बोट थांबते. अचानक दुरवर त्यांना घोंगावत येणारे वादळ दिसते, ग्रेग रेडीओ वरुन सागरी सहायक कक्षाला बोलतो पण वादळाचे कोणतेही निशान त्यांना त्यांची यंत्रे दाखवत नाहीत. काही क्षणातच त्या वादळाचा रोख त्यांच्याकडे वळतो त्याच्यापासुन वाचण्याचे त्यांचे प्रयत्न पुर्ण व्यर्थ जातात आणि सर्व पाण्यात पडुन बोट उलटते, काही क्षणातच वादळ निघुन जाउन स्वच्छ सुर्यप्रकाश पडतो, हिथर सोडुन सर्वांना ग्रेग पलटलेल्या बोटीवर ओढुन घेतो, हिथर मात्र कुठेच दिसत नाही.
हताश होऊन उपड्या बोटवर बसलेल्या सर्वांना आशेचा किरण म्हणुन एक महाकाय जहाज त्यांच्याकडे येताना दिसते, त्या जहाजावर ते चढतात. आश्चर्यकारकरित्या त्या महाकाय जहाजावर कुणीच दिसत नाही, पण कुणीतरी मागावर आहे असा संशय जेसला नेहमी सतावत राहतो, ती जहाज आतुन पहाताना आधी ती इथे होती असे तिला नेहमी वाटत राहते. अचानक त्यांच्यावर हल्ले व्हायला सुरुवात होते....
..... यापुढे पटकथेत काळाच्या मर्यादा तोडुन अनेक प्रसंग येतात आणि ते निस्तरता निस्तरता नायिकेबरोबर आपण सुध्दा थकुन जातो. सिनेमा संपल्यावर सुध्दा आपल्याला ठळक कथा कळत नाही कोडे शोधण्याचा विचार सतत रहातो. कधी कधी सगळं समजणे आवश्यक सुद्धा नसते ना?
अत्यंत क्लिष्ट अशी कथा, पटकथा लिहिण्यासाठी आणि तितक्याच ताकदीने दिग्दर्शीत करण्यासाठी क्रिस्टोफर स्मिथचे अभिनंदन करायला हवे. सिनेमाचा लुक चांगला आहे, प्रमुख जेसच्या भुमिकेत मेलिसा जॉर्ज या अभिनेत्रीने उत्तम कामगिरी केली आहे, बाकी योग्य साथ देतात. डोक्याला मनोरंजक खुराक द्यायचा असेल तर हा अनुभव घ्यायलाच हवा.
Saturday, 27 March 2010
फॉरेस्ट गम्प (१९९४)
दिग्दर्शक - रॉबर्ट झेमेकिस
बस स्टॉप वर बसची वाट पाहत बसलेला फॉरेस्ट बाजुला बसलेल्या बाईला आपल्या जीवनाची कहानी सांगायला सुरुवात करतो, ऐकनारे बदलत जातात पण आपण मात्र फॉरेस्टच्या जीवनपटात गुंग होऊन जातो. १९९४ साली आलेला आणि ऑस्कर पारितोषिके मिळवणारा ’फॉरेस्ट गम्प’ विल्सन ग्रुमच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारलेला आहे.
कमी आयक्यु असलेल्या फॉरेस्टला शाळेत प्रवेश नाकारला जातो, त्याच्या आईच्या प्रयत्नांमुळे तो शाळेत दाखल होतो, पण कमकुवत पायांमुळे पायांना ब्रेसेसचा आधार लावावा लागतो. जेनी नावाची मुलगी सोडुन त्याचा कुणी मित्र नसतो. असाच एकदा टारगट पोरं त्याच्या मागे लागतात आणि तो अडखळत पळायला सुरुवात करतो, आणि आश्चर्यकारकरित्या ब्रेसेस तोडुन तो उत्तम धावायला लागतो. याच धावण्याच्या जोरावर कॉलेजमध्ये तो अमेरिकन फुटबॉलचा उत्तम खेळाडू होतो.
पदवी मिळाल्यानंतर अमेरिकन आर्मीमध्ये दाखल होतो, विएतनाम मध्ये युद्धात सामिल होतो, तिथे त्याची मैत्री ’बब्बा’ नावाच्या अफ्रो-अमेरिकन तरुणासोबत होते. बब्बा आणि फॉरेस्ट त्यावेळी केवळ बब्बाच्या परंपरागत कोळी व्यवसायाबद्दल बोलणे होत असते आणि आर्मी मधुन निवृत्त झाल्यानंतर पार्टनर म्हणुन हा उद्योग करायचा असे ठरवितात. या युद्धात बब्बा मरण पावतो, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात फॉरेस्ट अनेकांना वाचवतो, त्यात त्यांचा लेफ्टनंट डॅन सुद्दा असतो, डॅन दोन्ही पायांनी अधु होतो, आणि रणांगणावर विरमरण पत्करण्याएवजी अधु जीवन जगाव लागल्यामुळे फॉरेटवर नाराज होतो. फॉरेस्टला ’मेडल ऑफ ऑनर’ मिळते.
आर्मीत असताना बंदुकिची गोळी लागल्यामुळे आराम करत असलेल्या फॉरेस्टला टेबल टेनिस (पिंग पॉंग) खेळण्याची सवय लागते आणि तो त्यात अत्यंत कुशल होतो, प्रसिद्ध होतो, यासाठी विशेष जाहिरात असलेली बॅट वापरण्यासाठी त्याला भरपुर पैसे मिळतात आणि तो बब्बाच्या घराकडे एक बोट विकत घेउन श्रिंपिंग व्यवसाय सुरु करतो, बब्बाची आठवण म्हणुन. तिथेही मिळालेला पैसा तो बब्बाच्या घरी आवर्जुन देतो.
ह्या सर्व प्रवासात त्याची आणि जेनीची भेट होत असते, पण जेनी कधीही त्याच्याकडे थांबत नाही आणि प्रत्येकवेळेस तिची जीवनशैली बदललेली असते, पण फॉरेस्टचे तिच्यावर प्रेम तसेच असते.
एकदा जेनी त्याच्या घरी असताना तो तिला लग्नाची मागनी घालतो पण जेनी नाही म्हणते, त्या रात्री त्यांचा शरीरसंबंध होतो पण दुसर्यादिवशी सकाळीच जेनी त्याला सोडुन निघुन जाते, या धक्क्यामुळे फॉरेस्ट धावायला सुरुवात करतो आणि सलग ३ वर्ष धावतो.
जेनीच्या पत्रामुळे तो तिला भेटण्यासाठी येतो, तिला आणि त्यांच्या मुलाला घेवुन घरी येतो, जेनी त्याला लग्नाबद्दल विचारते आणि हे पण सांगते की तिला न बरा होणारा आजार झाला आहे. फॉरेस्ट तरीही तिच्यासोबत लग्न करतो....
फॉरेस्टच्या जीवनाच्या कथेमध्ये अमेरिकेतील मुख्य राजकिय आणि सामाजिक घडामोडींचा बॅकड्रॉप आहे, अमेरिकेतल्या प्रत्येक राष्ट्रपती बरोबर तो भेटतो. इतका असामान्य असुनही जीवनात छोट्या छोट्या गोष्टींचे महत्व सिनेमात जागोजागी दिसते. प्रमुख भुमिकेत टॉम हॅन्क्स ने लाजवाब अभिनय केला आहे, त्याची संवाद म्हणण्याची असामान्य लकब, बोलका चेहरा आणि डोळे.... हा सिनेमा पहायलाच हवा!

Tuesday, 16 March 2010
द मंचुरियन कॅन्डिडेट (१९६२)
दिग्दर्शक - जॉन फ्रॅन्केहायमर
१९६२ सालचा कृष्णधवल सिनेमा ’द मंचुरियन कॅन्डिडेट’ नुकताच पहाण्यात आला. फ्रॅन्क सिनाट्रा, लॉरेन्स हार्वी आणि ऍन्जेला लांसबरी यांच्या अदाकारीने सजलेला हा थ्रिलर चित्रपट बघण्यासारखा आहे.
कोरियन युद्धावरुन परतलेल्या सैनिकांमध्ये रेमंड शॉ याला मेडल ऑफ ऑनर देण्यात येते, त्याची शिफारस करणारे कॅ. मार्को यांना नेहमी एक विचित्र स्वप्न पडत असते, ज्यात त्याची आर्मीची टीम कॅम्युनिस्ट रशियन्स आणि कोरियन्स पुढे बसलेली आहे, आणि त्यांच्यावर हिप्नॉटीझम प्रयोग होत आहेत, आणि सार्जेंट रेमंड शॉ हा दोन साथीदारांची संमोहीत अवस्थेत हत्या करतो. मार्को यांना यामुळे असे वाटते की कोरियन युध्दादरम्यान असे काही झाले आहे की रेमंड शॉ सारक्या नावडत्या माणसाला त्यांनी शिफारस केलेली चुकीची आहे. नेहमी ह्या स्वप्नांमुळे हैराण झालेले मार्को मिलिटरी ऑफिसर्सची मदत घेउ इच्छीतात, पण केवळ एक स्वप्न म्हणुन त्याला दुर्लक्षीण्यात येते. साधारण अश्याच स्वरुपाचे स्वप्न अजुन एका साथीदाराला पडल्यानंतर मात्र आर्मी मार्को यांच्या मदतीला तयार होते.
रेमंड शॉचे आपल्या आईबरोबरचे संबंध व्यवस्थित नसतात, त्याची आई मिसेस आईस्लिन हीचा आपल्या सिनेटर नवर्यावर पुर्ण पगडा असतो आणि त्याची राजकिय काराकिर्द ह्याच चालवत असतात. आपल्या स्वार्थापायी आपल्या मुलाचा प्रेमभंग करायला देखिल मागे पुढे पाहत नाहीत आणि वेळ प्रसंगी फायद्याकरिता आपली भुमिकाही बदलतात. रेमंडला सगळं कळुनही तो नेहमी त्यापुढे नतमस्तक होत असतो, याच कारण म्हणजे त्याच्यावर कोरियन युद्धादरम्यान संमोहनाचा प्रयोग झालेला असतो.
ह्या संमोहनाचा त्याच्यावर काय परिणाम असतो आणि या सगळ्याचा मार्कोच्या स्वप्नांशी काय संबंध असतो आणि सगळ्यांची उकल मार्को कसा करतो तो चित्रपटाचा उत्तरार्ध. चित्रपट उत्तम आहे आणि आपल्याला शेवटपर्यंत खिळवुन ठेवतो.

Monday, 15 February 2010
हरिश्चंद्राची फॅक्टरी (२००९)
दिग्दर्शक - परेश मोकाशी.
ऑस्करसाठी या वर्षीचा भारतातर्फेची अधिकृत प्रवेशिका असलेला बहुचर्चीत मराठी चलचित्रपट ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’ पाहण्याचा योग आला.
भारतिय चित्रपट सृष्टीचे जनक असणार्या दादासाहेब फाळके यांच्या चित्रपट बनविण्याच्या प्रवास म्हणजे हा चित्रपट.
वर्ष १९११, इंग्रजांच्या राजवटीत केळफा (फाळके) इंग्लंडचा ख्रिस्तावरिल मुकपट पाहुन प्रभावित होतात आणि भारतात मुकपट उद्योग सुरु करायचा असा चंग बांधतात.
पण हे सगळे इतके सोपे नसते. प्रिंटींगप्रेसचा धंदा सोडलेल्या फाळक्यांच्या घरात पैसे नसतात, मात्र अजोड चिकाटी आणि महत्वकांक्षा असते. घरातील पै-नी-पै गोळा करुन आणि वर घरातील सामान विकुन ते या विषयीचा अभ्यास करतात आणि एक प्रोजेक्टर विकत घेतात (ज्यात फक्त फोटो पहायची सोय असते).
मुकपटाविषयी अधिक माहीती करुन घ्यावी यासाठी ते लंडनला जायचा बेत करतात व त्यासाठी कर्ज काढतात, वर बायकोचे दागीने गहाण टाकतात. लंडनला जाउन तिथे चित्रपटावर लिहिणार्या मासिकाच्या ऑफिसात जाउन सरळ चित्रपट निर्मितीविषयी माहीती घेतात, आणि भारतात परत येवुन पहिल्या मुकपट बनविण्याच्या तयारित लागतात.
लंडनहुन कॅमेरा येतो, आणि मग कुठला मुकपट बनवावा यावर विचार सुरु होतो, मग ते राजा हरिश्चंद्रावर मुकपट बनविण्याचे ठरवितात, त्यानुसार कलाकारांसाठी शोध सुरु होतो, आणि अनेक अडथळ्यांसहीत चित्रपट पुर्ण होतो. पहिल्या एक-दोन दिवसात फारसा प्रतिसाद मिळत नाही, मग गल्लोगल्ली जाहीरात वगैरे करुन, आणि लकी ड्रॉ सारख्या योजना चालवुन अखेरीस मुकपट प्रचंड यशस्वी होतो. यानंतर फाळके अनेक धार्मिक चित्रपटांची निर्मीती करतात.
फाळकेंचा चित्रपट युरोपात सुद्धा प्रदर्शीत होतो, आणि इंग्रंजांकडुन प्रशंसा होते, तिथे चित्रपट बनविण्याचे त्यांना आमंत्रण मिळते पण फाळके ते सोडुन मायदेशात चित्रपट निर्मिती उद्योगाला चालना देण्यासाठी भारतात परत येउन चित्रपट निर्मिती चालु ठेवतात...
हा प्रवास चित्रपटात विनोदी अंगाने सादर केला आहे. तारामतीच्या भुमिकेसाठी स्त्री कलाकार शोधण्यासाठीचा शोध आणि प्रत्यक्ष मुकपटाच्या निर्मिती दरम्यानचे सिन तर झकास जमले आहेत. स्त्री पात्र साकारणार्या कलाकारांची मिशी कापण्यास केलेली टाळाटाळ, कारण केवळ बाप मेल्यावर मिशी काढतात असे समज...त्यावर दादासाहेबांचे स्पष्टीकरण वगैरे सिन्स अत्यंत मनोरंजक.
परेश मोकाशींचे दिग्दर्शन सुरेख आहे, तांत्रीक बाजु अगदी उत्तम आहेत. १९११-१९१५ चा काळ सुरेखपणे उभा केला गेला आहे, यासाठी नितिन देसाई यांच्या कलादिग्दर्शनाची मोलाची साथ मिळाली आहे. मला विशेष आवडलं ते सिनेमाचे पार्श्वसंगीत, आनंद मोडक आणि नरेंद्र भिडे यांचे खास अभिनंदन. प्रत्येक कलाकाराचा अभिनय उत्तम झाला आहे, फाळके झालेले नंदु माधव आणि त्यांच्या पत्नी असलेल्या विभावरी देशपाण्डे यांचे तर विशेष कौतुक. युटीवी सारख्या भक्कम निर्मिती संस्थेमुळे चित्रपटाचा स्टॅण्डर्ड अतिशय छान आहे...बघावाच असा...

२००९,
ऑस्कर,
नंदू माधव,
परेश मोकाशी,
मराठी,
विभावरी देशपाण्डे
Monday, 1 February 2010
रण(२०१०)
दिग्दर्शक - राम गोपाल वर्मा
’ब्रेकिंग न्युज’ आणि संसेशनल न्युज या आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग झाले आहेत, प्रत्येक जण न्युज चॅनल्सना दोष देतो पण दिवस आणि रात्र तेच पहातो, आपण त्यांच्या इतक्या आहारी गेलो आहोत की त्यांच्या डोळ्यांनी आज आपण वास्तव पाहत आहोत, जे की वास्तवाचा केवळ आभास आहे, राजकारणी आणि पैसेवाल्या लोकांनी पत्रकारीता विकत घेवुन आपल्या डोळ्यांपुढे मायावी जाळे निर्माण करुन ठेवले आहे, मुळ झापडं बंद राहतील याची पुरेपुर काळजी घेतलेली आहे. याच ज्ञात(?) विषयावर रामगोपाल वर्मांचा ’रण’ आधारीत आहे.
विजय मलिक (अमिताभ बच्चन) इंडीया २४*७ या व्रुत्तवाहिनीचे मालक जे पत्रकारीता करताना मुल्य सांभाळुन, मसाला न घालता केवळ घडेल ते लोकांपुढे मांडत असणारे, व्रुत्त हे मनोरंजानेचे साधन मानणार्या लोकांच्या मानसिकतेमुळे त्यांच्या वाहिनीची लोकप्रियता घसरु लागते. नुसत्या बातम्या सांगन्यापेक्षा प्रेजेंटेशन महत्वाचे मानणार्या अमरिश (मोहनिश बहल) याची वाहिनी मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असते.
त्यातच नविन मालिका काढण्याचे प्लॅन सुरु झाले की त्याच धर्तीवरचे कार्यक्रम आधीच अमरिशच्या वाहिनीवर रुजु होतात.

विजय मलिकचा मुलगा जय (सुदीप) वाहिनीच्या रेटींग वाढविण्यासाठी जे जे प्रयत्न करतो ते अमरिश हाणुन पाडतो. जयला हाताशी धरुन जयचा भावोजी अश्वीन (रजत कपुर), आणि विरोधी पक्षनेता मोहन पांडे (परेश रावळ) या वाहिनीला हाताशी धरुन सत्ताधारी पक्षावर आतंकवादाचा खोटा आळ घालतात, आणि मोहन पांडे आपल्या मुख्यमंत्री पदाची वाट मोकळी करुन घेतो. अश्वीन सुद्धा आपल्या पडीक प्रोजेक्ट्सला मंजुरी मिळेल म्हणुन यात सामिल असतो. यानंतर हळुहळु विजय पेक्षा जय वाहिनीचा कारभार सांभाळु लागतो. त्यांच्या वाहिनीवर मोहन पांडे बद्दल गुणगाण सुरु असते, नेमके हेच पुरब (रितेश) या नवपत्रकारला पचत नाही, ज्याचा विजय यांच्या सारख्या पत्रकारीतेवर विश्वास असतो.
याप्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे आणि ते शोधले पाहीजे म्हणुन तो सेल्फ रिसर्च सुरु करतो आणि मोहन पांडे, अश्विन, जय आणि अमरिश यांचा पर्दाफाश करतो.
तसं पाहायला गेलं तर कथेत काही नाविन्य नाही, पण मिडियाच्या काळ्याबाजुंवर आधी प्रकाश कुणी टाकण्याचा प्रयत्न केला नव्हता. राजकारणी मंडळी पत्रकारीतेला हाताशी धरुन न्युज तयार करतात आणि त्यांना पाहिजे तसे लोकांना नाचवतात. या सर्वात आपण तद्दन मुर्ख ठरतो, हे कळुन आपल्याला वळत नाही, हीच शोकांतिका.
अमिताभने विजय मलिक अतिशय प्रभाविपणे साकारला आहे, शेवटच्या स्पिच आणि काही वेळा केवळ देहबोलीने तो असामान्य अभिनयाचे दर्शन देतो, त्याच्या व्यक्तीरेखेला मात्र सिनेमाच्या मध्याला कोपर्यात ढकललेले आहे. परेश रावळ टिपिकल राजकारणी म्हणुन चोख भुमिका निभावतो. रितेश आणि सुदिप यांनी कमाल केली आहे, दोघांनीही आपल्या भुमिकांना न्याय दिला आहे, रजत कपुर छोट्या भुमिकेत आहे, त्याला लिमिटेड स्कोप आहे. मोहनिश बहल उत्तम. गुल पनाग आणि नितु चंद्राला काही विशेष वाव नाही. राजपाल यादव नेहेमीची ओवर ऍक्टींग करतो, पण आजकालचे न्युज रिडर तेच करत असल्यामुळे शोभुन दिसते... :)
रामगोपाल वर्माच्या सिनेमात नेहेमी असणारे वैशिष्ट्यपुर्ण कॅमेरा ऍंगल्स आणि ’गोविंदा’ टाईप पार्श्वसंगीत इथे सुद्धा आहे. त्याची कॅमेरास्टाईल मला पर्सनली आवडत असली तरी कधी कधी ती अती टेक्निकल होते आणि पात्रांच्या चेहर्यावरच्या भावाकडे लक्ष न जाता आपण (मी ?) त्यातच भारावुन जातो, कधी कधी ते इरिटेटिंग सुद्धा होते, स्पेशली जेंव्हा हातांनी घेतलेल्या शॉट्स च्या वेळेस. बाकी वेळेस मात्र खुप सही वाटते. पार्श्वसंगीत बरेचदा भयानक सिनेमा प्रमाणे वाजते आणि संवाद एकण्यात व्यत्यय आणते. बाकी तांत्रिक गोष्टी उत्तम आहेत.
शेवट परत थोडासा भरकटल्यासारखा... पण एकुण परिणाम ठीक. मला आवडला, टिकाकारांसाठी ’कमेंट्स’ सेक्शन आहे ;-)

Thursday, 28 January 2010
झेंडा (२०१०)
दिग्दर्शक - अवधुत गुप्ते
बहुचर्चीत ’झेंडा’ सिनेमा पाहिला. सिनेमाच्या सुरुवातिला जरी सर्व पात्रं, कथानक, प्रसंग हे काल्पनिक असल्याचा दावा केला आहे तरिही सर्वांना माहित आहे की ठाकरे घराण्यावर चित्रपट बेतला आहे. पक्षातिल राजकारणासोबतच कार्यकर्त्यांच्या मानसिकतेचा वेध सिनेमात घेण्यात आला आहे.

चित्रपट सुरु होतो, काकासाहेबांनी जनसेना पक्षाचा वारसदार म्हणुन लायक पुतण्या राजेशला सोडुन आपल्या मुलाला पक्षाध्यक्ष घोषीत करण्यापासुन, यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. काही कार्यकर्ते राजेश यांच्या नव्या पक्षाकडे जातात तर काकासाहेबांचा आदेश माननारे निष्ठावंत जनसनेतच राहतात. यामुळे मित्र असणारे संतोष व सिद्धार्थ हया मित्रांमध्ये दुरावा निर्माण होतो. संतोष काकासाहेबांवर नितांत निष्ठा असणारा असतो, तो जनसेनेतच राहतो, तर सिद्धार्थ राजेश यांच्या नविन पक्षात जातो. पण दोघांनाही राजकारणाचा अनुभव येतो.
चित्रपटात उद्धव ची भुमिका करणार्या पुष्करला जास्त काही वाव नाही आहे, त्यामानाने राज बनलेल्या राजेशच्या भुमिकेची लांबी जास्त आहे, पण तो राज ठाकरे हुबेहुब नाही वाटत. त्याची भुमिका बर्यापैकी ग्रे शेड वाली आहे. बाकी सर्वांचा देखिल अभिनय चांगला आहे.
पक्षांच्या दबावामुळे म्हणा कि अजुन काही, चित्रपट काही पुर्ण वाटला नाही, शेवट गुंडाळल्यासारखा झाला आहे. कथानकाची एकुण गोळाबेरीज पहाता निष्कर्ष असा निघतो की कार्यकर्ते बनण्यापेक्षा आपलं शिक्षण आणि करियर महत्वाचं. काही काही वेळा मॅग्निफाईड/स्ट्रेट्च्ड कॅमेरावर्क का केलं आहे हे कळत नाही. ’विठ्ठला’ हे गाणे तर हायलाईट आहे, चित्रिकरणही उत्तम. बाकी दिग्दर्शनाच्या पहील्या प्रयत्नात अवधुत गुप्तेनी चांगलं काम केलं आहे.

Tuesday, 19 January 2010
अमेरिकन हिस्ट्री एक्स(१९९८)
दिग्दर्शक - टोनी के
अमेरिकेतल्या वांशिक भेदावर अनेक चित्रपट येवुन गेले आहेत, अश्यातच एडवर्ड नॉर्टन अभिनीत, टोनी के दिग्दर्शित ’अमेरिकन हिस्ट्री एक्स’ पाहण्यात आला.
कथा आहे, डेरेक(एडवर्ड नॉर्टन) आणि त्याचा लहान भाउ डॅनियल, डॅनी(एडवर्ड फर्लॉग) याची. दोघेही अत्यंत हुशार, पण विचारसरणी मात्र जहाल. त्यांचा अफ्रो-अमेरिकनांवर अत्यंत राग असतो, कारण त्यांच्या वडिलांचा खुन कुणी एका (काळ्या ड्रग माफिया) व्यक्तीने केला असतो. डेरेक निओ-नाझी गॅंगचा मेंबर बनतो जी कॅमेरॉन नावाच्या एका स्वार्थी माणसाने चालवलेली असते. मुळातच हुशार असलेला डेरेक वक्त्रुत्वाच्या जोरावर मर्जी संपादन करतो, यातच एका रात्री ३ अफ्रो-अमेरिकन तरुण डेरेकच्या घरासमोर कार चोरायच्या उद्देशाने येतात त्यांची चाहुल डॅनीला लागते व तो डेरेकला उठवतो, डेरेक दोघांना मारतो आणि क्रांतिकारकाच्या थाटात पोलिसांना शरण जातो. याप्रसंगामुळे तो गोर्या तरुणांमध्ये हिरो बनतो, नकळत डॅनीवर याचे संस्कार होतात आणि तो पण नाझी गॅंग मध्ये सामिल होतो.

डॅनीने लिहिलेला नाझी धर्जीना निबंध पाहुन त्याचे शिक्षक स्विन मुख्याध्यापकाकडुन परवानगी घेवुन त्याचे इतिहास शिक्षक बनतात आणि पहिली असाइन्मेन्ट म्हणुन डेरेक वर निबंध लिहुन आणायला सांगतात, या इतिहासाचे नाव ठेवतात ’अमेरिकन हिस्ट्री एक्स’.
३ वर्षाच्या कैदेतुन बाहेर आल्यावर डेरेक संपुर्ण बदललेला असतो. प्रत्येक क्षणी डॅनीला तो गॅंग पासुन दुर ठेवण्याचा प्रयत्न करतो, डेरेकच्या ह्या वागण्यामुळे गॅंगचे लोकं, त्याची प्रेयसी सर्व दुर जातात आणि डॅनी गोंधळुन जातो, त्याच्याशी वाद-विवाद करतो, तेंव्हा डेरेक तुरुंगातील अठवणी सांगतो जे त्याच्या बदलाला कारणीभुत असते.
तुरुंगात डेरेक गोर्या लोंकांच्या गॅंगचा मेंबर असतो, काही काळ व्यतित केल्यानंतर त्याला समजते की काही गोरी मंडळी ड्रग्स करिता मेक्सिकन काळ्या गॅंगसोबत व्यवहार करित आहेत, इतर गोर्या लोकांना सांगितल्यावर देखिल ते दाद देत नाहीत आणि यामुळे तो त्यांच्यापासुन दुर होतो, यातच त्याची गट्टी लेमंट या काळ्या कैद्यासोबत होते, या दोघांवर तुरुंगातिल चादरी सांभाळायचे काम असते. हे सर्व गोर्या कैद्यांना सहन होत नाही आणि अंघोळीच्या वेळेला डेरेकवर अतिप्रसंग करतात. या मानसिक धक्क्याने डेरेक खचतो, दवाखान्यात असताना शिक्षक स्विन येतात आणि डॅनीच्या विचारसरणी बद्दल डेरेककडे चिंता व्यक्त करतात. स्विन सांगतात की त्यांच्या तरुणपणी ते देखिल गोर्या लोकांचा असाच द्वेष करायचे पण कालांतराने कळलं की यात काहीच मिळत नाही. केवळ द्वेष करण्यापेक्षा आपलं जिवन चांगलं करण्यासाठी काहीतरी केलं पाहीजे. डेरेकवर याचा परिणाम होतो आणि तो या चक्रातुन बाहेर पडतो.
डेरेकचे तुरुंगातले अनुभव ऐकुन डॅनी गॅंग सोडण्याचा निर्णय घेतो...... चित्रपटाचा शेवट सकारात्मक नाही, आणि अनपेक्षीतही...त्यामुळे इथे नाही सांगत.
खास एडवर्ड नॉर्टन चा अभिनय पहाण्यासारखा आहे, आधिचा काळ्यांवरिल विखार आणि नंतरचा बदललेला डेरेक त्याने उत्तम साकारला आहे, या भुमिकेसाठी त्याला ऑस्कर नॉमिनेशन मिळालं होतं.
सिनेमा मला खुप आवडला, पाहिला पाहिजे असा...

Saturday, 16 January 2010
ऑफिस स्पेस (१९९९)
ऑफिस स्पेस (१९९९)
दिग्दर्शक - माईक जज.
कुणाला आपल्या ऑफिसचे काम आवडते?, बहुतांशी नाइलाजाने पर्याय नसल्यामुळे सर्व रेटत असतात, याच थीम वर आणि आय.टी. इंडस्ट्रीवर २००० साली आलेल्या मंदी यावर आधारीत असणारा ’ऑफिस स्पेस’ नुकताच पहाण्यात आला. मी ही त्या क्षेत्रात असल्यामुळे सिनेमाला रिलेट करु शकलो. विनोदी अंगाने कुठेही बोजड न होता मस्त मनोरंजन पुरवतो.
कथा आहे, इनिटेक या सॉफ्टवेअर कंपनीत काम करणार्या पीटर, समीर, माइकल आणि मिल्टन यांची. पीटर ’वाय२के’ प्रॉब्लेम वर काम करणारा रि-प्रोग्रामर. कामामुळे. ताणामुळे, डिप्रेस्ड, आणि बोअर झालेला असतो, त्यातच त्याची प्रेयसीचे संबंध अजुन कुणाबरोबर असल्याचा त्याचा संशय असतो, त्यामुळे तो जिवनाला कंटाळतो. यातच सप्ताहांत त्याचा बॉस त्याला कामावर येण्यास सांगतो, पीटर अजुन चिडतो. त्यांच्या कंपनीत कंसल्टंट म्हणुन ’दि बॉब्स’ या दोघांची नेमनुक होते, त्यांचे काम म्हणजे सर्व कर्मचार्यांशी बोलने, कामाची पद्धत समजावुन घेणे आणि आवश्यक नसलेल्यांना बाहेरचा रस्ता दाखवणे. यासर्व त्रासामुळे आणि त्यातुन बाहेर पडण्यासाठी पीटर एका संमोहक तज्ञाची मदत घ्यायची ठरवितो. संमोहन थेरेपी अर्ध्यात असताना हृदय विकारामुळे तज्ञाचा मृत्यु होतो, आणि पीटर अर्धवट संमोहीत असताना तिथुन उठुन घरी जातो.
दुसर्या दिवशी पीटर अतिशय उशीरा पर्यंत झोपुन रहातो, त्याच्या बॉस आणि प्रेयसीचे अनेकदा कॉल येवुन जातात, पीटर सोयीस्कररित्या तिकडे दुर्लक्ष करतो. त्याऐवजी त्याला आवडणार्या गोष्टी म्हणजे काहीही न करणे, आणि त्याला आवडणार्या जॉना या वेट्रेस बरोबर लंच ला जातो. जॉनादेखिल तिच्या कामाला कंटाळलेली असते, कारण त्यांचे काही विचित्र नियम ज्यात तिला नको वाटणारे बिल्ले आपल्या युनिफॉर्मवर लावावे लागत असतात, ति सुद्धा बॉस बरोबर भांडुन नोकरी सोडते.
पीटर सगळी भिती सोडुन ऑफिसमध्ये आपल्या मनाप्रमाणे वागायला सुरुवात करतो. बॉसच्या आरक्षीत पार्कींगच्या जागी आपली कार लावतो, खिडकी दिसत नाही म्हणुन आपल्या क्युबिकलची एक भिंत तोडतो. कामाऐवजी गेम्स वगैरे खेळत बसतो. कंसल्टंट सोबतच्या मिटींग मध्ये तो आपली मते निर्भिडपणे मांडतो आणि आपल्याला वरिष्ठांकडुन जास्त मोटिवेशन नाही मिळाल्यामुळॆ जास्त काम नाही होवु शकत असे सांगतो, बहु-बॉस पद्धतीमुळे एकाच गोष्टीसाठी सर्वांकडुन कसे वेग-वेगळे शेरे कसे मिळतात आणि ते कामावर कसे परिणाम करतात हे सांगतो, यामुळे बॉब द्वयींवर आपली छाप पाडतो. यामुळे त्याचे प्रमोशन होते आणि सरळमार्गी काम करणारे समीर आणि मायकल यांना पिंक स्लीप देण्यात येते. मिल्टनची पगार बंद केली जाते आणि त्याचे क्युबिकल तळघरात हलविण्यात येते, यामुळे मिल्टन नाराज असतो आणि ऑफिस जाळुन टाकण्याबद्दल स्वत:शी पुटपुटतो.
पीटर, मायकल आणि समीर यामुळे चिडुन कंपनीवर बदला घॆण्याचे ठरवितात, आणि एक वायरस बनवुन सर्वर वर अपलोड करतात, जेणेकरुन प्रत्येक पैसे देवाण-घेवाणीत यांच्या खात्यात एक छोटी रक्कम जमा होत जाईल, जि कालांतराने खुप मोठी होइल व कुणाला संशयही येणार नाही. पण काही दिवसात वायरस मधील अपुर्णांकाच्या चुकीमुळे खुप मोठी रक्कम जमा होते, जेणेकरुन कंपनीला संशय नक्कीच येणार असतो. काहीही न सुचुन ते रक्कम बॅंकेतुन काढुन बॉसच्या केबिन मध्ये रात्री एका पाकीटात घालुन ठेवतात.
दुसर्या दिवशी पीटर असे ठरवितो की गुन्ह्याचा पुर्ण दोष स्वतः वर घ्यायचा, त्यासाठी तो ऑफिसला येतो आणि पहातो की संपुर्ण ऑफिसला आग लागलेली आहे, त्याचे सर्व प्रॉब्लेम सुटतात. प्रत्यक्षात मिल्टनने बॉसवर राग म्हणुन ऑफिस पेटविलेले असते कारण बॉस त्याचा आवडता स्टेप्लर घेतो, तत्पुर्वी तो पीटरने ठेवलेले पैश्याचे पाकीट उचलतो, आणि हवाईत जाउन मजा करतो. पीटर कंस्ट्रक्शन मध्ये आवडता जॉब करतो, आणि समीर, मायकल दुसर्या आय.टी. कंपनीत रुजु होतात.
आपल्या ऑफिसच्या काही खाणा-खुणा यात मिळतात का ते पहा.... :)
आय.एम.डी.बी. : http://www.imdb.com/title/tt0151804/
दिग्दर्शक - माईक जज.
कुणाला आपल्या ऑफिसचे काम आवडते?, बहुतांशी नाइलाजाने पर्याय नसल्यामुळे सर्व रेटत असतात, याच थीम वर आणि आय.टी. इंडस्ट्रीवर २००० साली आलेल्या मंदी यावर आधारीत असणारा ’ऑफिस स्पेस’ नुकताच पहाण्यात आला. मी ही त्या क्षेत्रात असल्यामुळे सिनेमाला रिलेट करु शकलो. विनोदी अंगाने कुठेही बोजड न होता मस्त मनोरंजन पुरवतो.

दुसर्या दिवशी पीटर अतिशय उशीरा पर्यंत झोपुन रहातो, त्याच्या बॉस आणि प्रेयसीचे अनेकदा कॉल येवुन जातात, पीटर सोयीस्कररित्या तिकडे दुर्लक्ष करतो. त्याऐवजी त्याला आवडणार्या गोष्टी म्हणजे काहीही न करणे, आणि त्याला आवडणार्या जॉना या वेट्रेस बरोबर लंच ला जातो. जॉनादेखिल तिच्या कामाला कंटाळलेली असते, कारण त्यांचे काही विचित्र नियम ज्यात तिला नको वाटणारे बिल्ले आपल्या युनिफॉर्मवर लावावे लागत असतात, ति सुद्धा बॉस बरोबर भांडुन नोकरी सोडते.
पीटर सगळी भिती सोडुन ऑफिसमध्ये आपल्या मनाप्रमाणे वागायला सुरुवात करतो. बॉसच्या आरक्षीत पार्कींगच्या जागी आपली कार लावतो, खिडकी दिसत नाही म्हणुन आपल्या क्युबिकलची एक भिंत तोडतो. कामाऐवजी गेम्स वगैरे खेळत बसतो. कंसल्टंट सोबतच्या मिटींग मध्ये तो आपली मते निर्भिडपणे मांडतो आणि आपल्याला वरिष्ठांकडुन जास्त मोटिवेशन नाही मिळाल्यामुळॆ जास्त काम नाही होवु शकत असे सांगतो, बहु-बॉस पद्धतीमुळे एकाच गोष्टीसाठी सर्वांकडुन कसे वेग-वेगळे शेरे कसे मिळतात आणि ते कामावर कसे परिणाम करतात हे सांगतो, यामुळे बॉब द्वयींवर आपली छाप पाडतो. यामुळे त्याचे प्रमोशन होते आणि सरळमार्गी काम करणारे समीर आणि मायकल यांना पिंक स्लीप देण्यात येते. मिल्टनची पगार बंद केली जाते आणि त्याचे क्युबिकल तळघरात हलविण्यात येते, यामुळे मिल्टन नाराज असतो आणि ऑफिस जाळुन टाकण्याबद्दल स्वत:शी पुटपुटतो.
पीटर, मायकल आणि समीर यामुळे चिडुन कंपनीवर बदला घॆण्याचे ठरवितात, आणि एक वायरस बनवुन सर्वर वर अपलोड करतात, जेणेकरुन प्रत्येक पैसे देवाण-घेवाणीत यांच्या खात्यात एक छोटी रक्कम जमा होत जाईल, जि कालांतराने खुप मोठी होइल व कुणाला संशयही येणार नाही. पण काही दिवसात वायरस मधील अपुर्णांकाच्या चुकीमुळे खुप मोठी रक्कम जमा होते, जेणेकरुन कंपनीला संशय नक्कीच येणार असतो. काहीही न सुचुन ते रक्कम बॅंकेतुन काढुन बॉसच्या केबिन मध्ये रात्री एका पाकीटात घालुन ठेवतात.
दुसर्या दिवशी पीटर असे ठरवितो की गुन्ह्याचा पुर्ण दोष स्वतः वर घ्यायचा, त्यासाठी तो ऑफिसला येतो आणि पहातो की संपुर्ण ऑफिसला आग लागलेली आहे, त्याचे सर्व प्रॉब्लेम सुटतात. प्रत्यक्षात मिल्टनने बॉसवर राग म्हणुन ऑफिस पेटविलेले असते कारण बॉस त्याचा आवडता स्टेप्लर घेतो, तत्पुर्वी तो पीटरने ठेवलेले पैश्याचे पाकीट उचलतो, आणि हवाईत जाउन मजा करतो. पीटर कंस्ट्रक्शन मध्ये आवडता जॉब करतो, आणि समीर, मायकल दुसर्या आय.टी. कंपनीत रुजु होतात.
आपल्या ऑफिसच्या काही खाणा-खुणा यात मिळतात का ते पहा.... :)
आय.एम.डी.बी. : http://www.imdb.com/title/tt0151804/
Monday, 4 January 2010
द बकेट लिस्ट (२००७)
दिग्दर्शक - रॉब रेनर
मॉर्गन फ्रीमन, जॅक निकोल्सन यांचा ’द बकेट लिस्ट’ कालच पाहण्यात आला. सिनेमा आवडला. मेकॅनिक कार्टर (फ्रीमन), आणि हॉस्पीटल मालक एडवर्ड (निकोल्सन) हे कॅन्सर पिडीत एकाच हॉस्पीटल मध्ये उपचारार्थ येतात, आणि त्यांना रुम शेअर करावी लागते. यातुन त्यांची मैत्री जमते, काही टेस्ट्स नंतर दोघांकडे ६-८ महीन्यापेक्षा वेळ नाही असे कळते.
कार्टर अपुर्या ईच्छा कागदावर उतरवुन ठेवतो, आणि तो कागद एडवर्ड्च्या हातात पडतो, त्यात आपल्या काही ईच्छा टाकुन ते दोघे आपली विश लिस्ट पुर्ण करण्यासाठी बाहेर पडतात.
मग ते युरोप, इजिप्त, भारत, चीन, नेपाळ, हॉंग-कॉंग करत हिमालय सगळी सैर करुन येतात आणि या ऍड्वेंचर दरम्यान एकमेकाचे फॅमिली प्रॉब्लेम सोडवतात आणि म्रुत्युला हसत सामोरे जातात....
मॉर्गन फ्रीमन, जॅक निकोल्सन यांची अदाकारी बघण्यासारखी आहे.
आपल्याकडील ’दसविदानिया’ याचीच आव्रुत्ती होती. मिळाला तर चुकवू नका.

ऍज गुड ऍज इट गेट्स (१९९७)
दिग्दर्शक - जेम्स ब्रुक्स
जॅक निकोल्सन, हेलेन हंट अभिनीत ऑस्कर विजेता ’ऍज गुड ऍज इट गेट्स’ बर्याच दिवसांपासुन पाहायचा होता, त्याचा योग काल आला. अपेक्षेप्रमाणे खुप छान देखिल आहे.
जॅक, हेलेन अभिनयात कमाल करतात.
जॅक हा एक लेखक असतो, त्याला जर्मफोबिया असतो, तो फटकळ आणि हेकेखोर स्वभावाचा असल्यामुळे अपार्टमेंट मध्ये कुणाशीच त्याचे जमत नसते, तो रोज एकाच रेस्टारेंट मध्ये जेवायला जात असतो, जिथे हेलेन वेट्रेस म्हणुन काम करीत असते. तिचा मुलगा नेहमी आजारी असल्यामुळे तिची ओढाताण चालु असते. जॅकला तिची इतकी सवय असते कि मुलाच्या तब्येतीमुळे ती कामावर येवु शकत नाही तेव्हा जॅक तिच्या घरी जाउन तिच्या मुलाच्या खर्चाचं सर्व भार स्वत:वर घेतो. यात त्याचा स्वार्थ असा की मुलाची काळजी घेणारे कोणी असेत तर ती कामावर येवु शकेल आणि खाण्याची सोय होइल. यातच त्याच्या फ्लॅट्च्या बाजुला असणार्या चित्रकाराकडे चोरी होते व यात त्याला चोर गंभीर चोप देतात, यामुळे त्याचा कुत्रा जॅकला सांभाळावा लागतो, त्यात त्या कुत्र्यासोबत याची गट्टी जमते, चित्रकाराच्या घटनेमुळे तो कफल्लक होतो आणि त्याला सुद्धा जॅक कडे रहावे लागते, मग दैवयोगाने या सर्वांच्या एकत्र ट्रिपमुळे ते एकमेकाच्या जवळ येतात आणि आयुष्याच्या कटू गोष्टी विसरुन नवीन आयुष्याला सामोरे जातात.
खुपच मस्त सिनेमा आहे, तेव्हा सोडु नका...
Saturday, 2 January 2010
टर्टल्स कॅन फ्लाय (२००४) - पर्शीयन
दिग्दर्शक - बाहमन घोब्दी
युद्धाचे परिणाम किती भयंकर असतात, त्यात मुलांचे जीवन कसे होरपळुन निघते. लहान मुलांच्या द्रुष्टीकोनातुन युद्धावर आधारीत एक सिनेमा पाहण्यात आला, टर्टल्स कॅन फ्लाय.
अमेरीकेने इराक मध्ये प्रवेश करुन सद्दाम हुसेन ला अटक करण्याच्या वेळेच्या आसपास हा सिनेमा घडतो, इराण-टर्की सीमेवरच्या खुर्दीश भागात.
http://en.wikipedia.org/wiki/Turtles_Can_Fly
आपला सिनेमास्कोप
थॅंक यु फॉर स्मोकिंग (२००६)
दिग्दर्शक - जेसन रिट्मन
सिगरेट आणि तंबाकू सेवनाच्या परिणामाबद्दल तिरकस विनोदी अंगाने भाष्य करणारा ’थॅंक यु फॉर स्मोकिंग’ पाहण्यासारखा आहे.
कथासार: ऍकाडमी ऑफ टोबको स्टडीज चा वाइस प्रेसिडेंट आणि स्पोकपर्सन निक नेलर स्मोकर्सच्या अधिकारांबद्दल काम करत असतो.
बोलण्यात अतिशय हुशार निक सार्वजनिक कार्यक्रमात आणि टिवी प्रोग्राम मध्ये तंबाकू सेवनाच्या अनुकुल बोलतो.
सिनेटर सिनेटमधे एका बिल पास करण्याच्या मागे असतात ज्यात सिगारेट पॅक वर "डेंजर" (कवटी) चिन्ह लावण्याची सक्ती असते.
याच्यामुळे सिगरेट खपात होणारी तुट भरुन काढण्याकरीता निक असे सुचवतो की हॉलीवुड सिनेमा मध्ये ऍक्टर्सनी ऑन-स्क्रीन सिगरेट ओढली तर खप वाढेल...
त्यासाठी तो हॉलीवूड सुपर ऍजंट ला भेटतो आणि या ट्रीप मध्ये आपल्या मुलाबरोबर त्याला संवाद साधण्याचा वेळ मिळतो.
एका टिवी कार्यक्रमामध्ये निक ला जिवे मारण्याची धमकी येते, पण त्याला न घाबरता निक सेक्युरिटी न बाळगण्याचे ठरवतो, त्यातच त्याच अपहरण करुन त्याच्या सर्वांगाला निकोटीन पट्ट्या चिकटवल्या जातात जेणेकरुन त्याला तंबाकू आणि सिगारेट बद्द्ल बोलण्याची शिक्षा मिळावी, त्यातुन दैवयोगाने तो वाचतो त्याचे शरीर निकोटीन सहन करु शकते कारण त्याची सिगरेट ओढण्याची सवय, पण आता तो एकही सिगरेट ओढु शकणार नसतो. या अपहरण नाट्यामुळे निक ला पब्लिक सिंपथी मिळते.
एक टिवी रिपोर्टर निक सोबत अफेअर करते व त्याच्याकडुन ऍकाडमी आणि सिगरेट कंपन्याची बरीचशी सिक्रेट्स निक तिला सांगतो, त्याला वाटते की हे ऑफ रिकॉर्ड आहे पण ती सगळं छापते, आणि ऍकाडमी निक ला काढुन टाकते, त्याच्यावरची सिंपथी मावळते.
निक नाराज होतो पण त्याचा मुलगा त्याला दिशा देतो. त्यानंतर तो प्रेस ला मुलाखत देतो आणि सिनेट समोर बिल वर बोलायचे असल्याचे सांगतो. सिनेट मध्ये आपल्या वाक:चातुर्याने तो आपला मुद्दा पटवुन देतो.
सिनेमाचे बलस्थान म्हणजे स्क्रिनप्ले आणि डायलॉग्स. टिवी शो आणि शेवटचा सिनेट मधील प्रसंग तर मस्तच!
सविस्तर परिक्षण - आपला सिनेमास्कोप
ए वल्ड विदाउट थिव्ज (२००४) - चाइनिज
दिग्दर्शक - Feng Xiaogang
अत्यंत सुंदर असा हा चाइनिज सिनेमा काल पाहण्यात आला.
जगात फक्त चांगले लोकं असतात आणि चोर अस्तित्वात नसतात अशी याची धारणा असणारा मुलगा जो लग्न करण्यासाठी घरी जात असतो, आणि त्याच ट्रेन मध्ये चोरांच्या दोन टोळ्या त्याच्या पैशावर डोळे ठेवुन असतात. माणुसकी, चांगुलपणा आणि चोरांच्या टोळ्यांमधील संघर्ष, त्यांचे कायदे, स्पर्धा, धोका अश्या अनेक घटनांतुन सिनेमा घडतो. मिळाला तर जरुर पहा.
३ इडीयट्स (२००९)
३ इडीयट्स (२००९)
दिग्दर्शक - राजकुमार हिरानी.
२००९ वर्षीचा सर्वाधिक प्रतिक्षा असलेला सिनेमा म्हणुन ’३इडीयट्स’ चे नाव होते.
चेतन भगतांच्या ’फाइव पॉइण्ट्स समवन’ वर बेतलेला (सद्ध्या वाद चालु आहे यावरुन).
मुन्नाभाई सिरिजचे यशस्वी दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आमीर खान...
सिनेमाची कथा तर सर्वांना एव्हाना माहीत आहेच. सिनेमाचा कंसेप्ट छान आहे, बर्याच गोष्टी छान आहेत आणि आपल्याला शिकवतात,
या ब्लॉगवर डिटेल्स आहेत...
आमीर खान, करीना कपुन आणि बोमन इरानी यांचा अभिनय उत्तम आहे. शर्मन जोशी छान, पण त्याच्यासाठी नेहमिचीच भुमिका, माधवन ठिकठाक.
पण माझ्या मते तरी हा सिनेमा ब्रेकथ्रु वगैरे नाहीये, मुन्नाभाई एम.बी.बी.एस च्या चौकटीबाहेर काही जात नाही.
मेडीकल सोडुन इंजीनीरिंग कॅम्पस आहे, बाकी सगळे सारखेच. शाळा/कॉलेज चा हुकुमी प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवुन पटकथा रचल्यामुळे बरेचशे व्रात्य जोक्स, काही अतिशयोक्तीपुर्ण सिन्स मुळे सिनेमा बर्याच जागी सुटतो. करीनाच्या बहीणीची डिलिवरी सारखे सिन तर अतिशय पाचकळ वाटले. बोमन इराणीला खलनायक करायचे म्हणुन त्याची हास्यास्पद आव्रुत्ती, त्यामुळे त्याला करावा लागलेली ओवर ऍक्टींग काही वेळाने नकोशी वाटते.
माझ्या अपेक्षेपेक्षा बराच खाली... :(
दिग्दर्शक - राजकुमार हिरानी.
२००९ वर्षीचा सर्वाधिक प्रतिक्षा असलेला सिनेमा म्हणुन ’३इडीयट्स’ चे नाव होते.
चेतन भगतांच्या ’फाइव पॉइण्ट्स समवन’ वर बेतलेला (सद्ध्या वाद चालु आहे यावरुन).
मुन्नाभाई सिरिजचे यशस्वी दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आमीर खान...
सिनेमाची कथा तर सर्वांना एव्हाना माहीत आहेच. सिनेमाचा कंसेप्ट छान आहे, बर्याच गोष्टी छान आहेत आणि आपल्याला शिकवतात,
या ब्लॉगवर डिटेल्स आहेत...
आमीर खान, करीना कपुन आणि बोमन इरानी यांचा अभिनय उत्तम आहे. शर्मन जोशी छान, पण त्याच्यासाठी नेहमिचीच भुमिका, माधवन ठिकठाक.
पण माझ्या मते तरी हा सिनेमा ब्रेकथ्रु वगैरे नाहीये, मुन्नाभाई एम.बी.बी.एस च्या चौकटीबाहेर काही जात नाही.
३ इडियट्स @ मोगरा फुलला |
माझ्या अपेक्षेपेक्षा बराच खाली... :(
Subscribe to:
Posts (Atom)